Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 
 
 
 
 
 
Home >> नोट परतावा नियम
 
MLRBI English Content

भारतीय रिझर्व बँक (नोट परतावा) नियम, 2009

विभाग अनुक्रमणिका
विभाग 1 प्रस्तावना
विभाग 2 आरबीआय (नोट परतावा) नियम, 2009
विभाग 3 कार्यरीतींचे पत्रक
विभाग 4 जोडपत्र-1
विभाग 5 जोडपत्र-2 (सुरक्षा लक्षणे)

विभाग 1
प्रस्तावना

भारतीय रिझर्व बँक, तिच्या सर्व इश्यु ऑफिसमधून व वाणिज्य बँकांच्या धन कोष शाखांमधून, फाटलेल्या व मळक्या नोटा बदलून देण्याची सुविधा जनतेला देत आली आहे. नोट परतावा नियम समजण्यासाठी, सोपे करण्यासाठी व लागु करण्यासाठी ते सर्वसमावेशकतेने सुधारित व सुलभ करण्यात आले आहेत. असेही ठरविण्यात आले आहे की, नेमलेल्या शाखेतील कोणताही अधिकारी त्या शाखेत सादर केलेल्या नोटांबाबत निवाडा करु शकतो. ह्या नियमांच्या सुलभीकरणामुळे व उदारीकरणामुळे, विहित अधिकारी तसेच फाटक्या नोटा सादर करणारे ह्या दोघांनाही, हे नवे नियम समजण्यास आणि विहित अधिका-यांना, कोणत्याही शंकेशिवाय हे नोट परतावा नियम समजण्यास मदतच होईल अशी अपेक्षा आहे.

मळलेल्या नोटा बदलून देण्याची सुविधा, सर्व बँकांनी त्यांच्या सर्व शाखांमधून उपलब्ध करुन द्यावयाची असली तरी, फाटलेल्या नोटा बदलून देण्याची सुविधा, नेमलेल्या बँक शाखांमध्ये (सहकारी बँका व आरआरबी सह), त्या नोटा सादर करणा-या सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध असेल - मग, त्या व्यक्ती खातेधारक असोत किंवा नसोत. संपूर्ण बँकिंग प्रणालीचे, ग्राहकांप्रती हे एक कर्तव्यच आहे. आरबीआय नोट परतावा व त्यांचे सुलभीकरण ह्याचा हेतु जनतेकडे असलेल्या फाटक्या/कापलेल्या नोटा कोणत्याही अडचणीशिवाय बदलून देण्यात मदत करणे हाच आहे. नेमलेल्या बँक शाखांनी ह्याबाबत कृतीशील भूमिका ठेवून खात्री करुन घ्यावी की, ही सुविधा जास्तीत जास्त करुन जनतेच्या हितासाठीच (काही विशिष्ट व्यक्तीगटांसाठी नव्हे) राबविली जात आहे.

ह्या पुस्तिकेमध्ये, ह्या योजनेखाली अनुसरावयाचे नियम व कार्यरीती दिल्या आहेत. फाटलेल्या नोटांचा स्वीकार, निवाडा व त्याबाबत ठेवावयाचे रेकॉर्ड ह्याबाबत अनुसरावयाच्या कार्यकृतीही ह्या पुस्तिकेत दिल्या आहेत. ह्या विषयावर पुढे द्यावयाच्या सर्व सूचना ह्या पुस्तिकेच्या संदर्भातच असतील आणि बँकांच्या शाखा, ही पुस्तिका त्यानुसार दुरुस्त/सुधारित करुन अद्यावत करतील. ह्या योजनेबाबत काही स्पष्टीकरण पाहिजे असल्यास त्याबाबतचा संदर्भ, रिझर्व बँकेच्या कार्यालयांमधील इश्यु विभागाकडे किंवा मुख्य महाव्यवस्थापक, भारतीय रिझर्व बँक, केंद्रीय कार्यालय, चलन व्यवस्थापन विभाग, मुंबई - 400 001 (ई-मेल पाठविण्यासाठी येथे क्लिक करा) ह्यांचेकडे घेण्यात यावा.

विभाग 2
भारतीय रिझर्व बँक (नोट परतावा) नियम, 2009

(अ) भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 मधील तरतुदी

कलम 28 - विपरीत असलेला कोणताही कायदा किंवा नियम ह्यात काहीही दिलेले असले तरी, असलेली कोणतीही व्यक्ती, केंद्र सरकार किंवा ह्या बँकेकडून, कोणत्याही हरविलेल्या, चोरीस गेलेल्या किंवा फाटलेल्या किंवा अपूर्ण बँक नोटांचे मूल्य वसुल करु शकणार नाही - मात्र, ही बँक, केंद्र सरकारच्या पूर्व मंजुरीने, सदिच्छा म्हणून अशा बँक नोटांच्या मूल्याचा परतावा देता येण्यासाठीची परिस्थिती व अटी विहित करु शकते आणि ह्या तरतुदींखाली तयार केलेले नियम संसदेच्या टेबलावर ठेवले जातील.

कलम 58(1) - केंद्र सरकारच्या पूर्व मंजुरीने, केंद्रीय बोर्ड, प्राधिकृत राजपत्रामध्ये दिलेल्या अधिसूचनांच्या अन्वये तरतुद करणे आवश्यक असलेल्या किंवा ह्या अधिनियमाच्या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी सोयिस्कर असलेल्या सर्व बाबींची तरतुद करण्यासाठी, ह्या अधिनियमाशी सुसंगत असलेले विनियम तयार करु शकते.

कलम 58(2) - विशेषतः आणि पूर्वसंकारीत तरतुदींच्या सर्वसामान्यतेच्या विपरीत न जाता, असे विनियम पुढीलपैकी कोणत्याही बाबीसाठी तरतुदी ठेवू शकतात जसे -

(अ)
(ब)
(क)
...............................
(क्यु) भारत सरकारच्या, कोणत्याही हरवलेल्या, फाटलेल्या किंवा अपूर्ण नोटेचे किंवा बँक नोटेचे मूल्य परत करण्यासाठी असलेली परिस्थिती, अटी व मर्यादा.

(ब) नोट परतावा नियम

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या (1934 चा 2) कलम 58 च्या पोटकलम (1) व (2) च्या खंड (क्यु) सह वाचित, कलम 28 च्या तरतुदीने दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, आणि भारतीय रिझर्व बँक (नोट परतावा) नियम, 1975 च्या ऐवजी/रद्द करुन (असे रद्द करण्यापूर्वी केलेल्या किंवा वगळलेल्या बाबी सोडून), केंद्रीय मंडळ, केंद्र सरकारच्या पूर्व मंजुरीने, येथे, सदिच्छा म्हणून, हरवलेल्या, चोरीस गेलेल्या, फाटलेल्या किंवा अपूर्ण असलेल्या नोटांचे मूल्य परत करण्यासाठी असलेली परिस्थिती, अटी व मर्यादा विहित करण्यासाठी पुढील नियम तयार करत आहे :

(1) लघुशीर्षक लागु असणे व सुरुवात

(1) ह्या नियमांना, भारतीय रिझर्व बँक (नोट परतावा) नियम, 2009 म्हणून समजले जावे.

(2) हे नियम, ती नोट बँकेत सादर करण्याच्या तारखेस एक वैध चलन म्हणून असलेल्या नोटेला लागु असतील.

(3) प्राधिकृत राजपत्रात त्यांच्या प्रसिध्दीच्या तारखेस हे नियम जारी होतील.

(2) व्याख्या :

अन्य संदर्भ नसल्यास ह्या नियमांमध्ये

(अ) ‘अधिनियम’ म्हणजे भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 (1934 चा 2)

(ब) ‘बँक’ म्हणजे, ह्या अधिनियमाच्या कलम 2 अन्वये स्थापन झालेली भारतीय रिझर्व बँक.

(क) ‘बँक नोट’ म्हणजे, ह्या बँकेने दिलेली कोणतीही नोट, परंतु ह्यात, एक रुपयाची नोट सोडून (भारत सरकारच्या वित्तमंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने, 28 मार्च 1980 रोजीच्या अधिसूचना जीएसआर 426 अन्वये ही नोट बँक नोट म्हणून मानण्यात आली आहे) अन्य सरकारी नोट समाविष्ट नाही.

(ड) ‘अत्यावश्यक लक्षणे’ म्हणजे, नोटेची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेली (सुरक्षा लक्षणांसह) लक्षणे ती अशी -

(1) देणा-या प्राधिकरणाचे, हिंदी आणि/किंवा इंग्रजीतील नाव; म्हणजेच ही बँक किंवा भारत सरकार (असेल त्यानुसार);

(2) हिंदी आणि/किंवा इंग्रजीमधील गॅरंटी क्लॉज;

(3) हिंदी आणि/किंवा इंग्रजीमध्ये वचननामा;

(4) हिंदी आणि/किंवा इंग्रजीत सही;

(5) असेल त्यानुसार अशोक स्तंभाचे चिन्ह किंवा महात्मा गांधीचे चिन्ह आणि

(6) असेल त्यानुसार अशोक स्तंभाचे चिन्ह किंवा महात्मा गांधीचा वॉटर मार्क.

स्पष्टीकरण

ह्या खंडासाठी -

(अ) नोटेचा खरेपणा किंवा अन्यथा ठरविण्यासाठी एखाद्या नोटेची सुरक्षा चिन्हामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत -

(1) कागदाचा दर्जा

(2) अंकाचे स्वरुप व आकार

(3) सुरक्षा धागा

(4) इंटाग्लिओ छपाई

(5) उभ्या पट्ट्यामधील सुप्त प्रतिमा

(6) इलेक्ट्रो टाईप वॉटरमार्क (वॉटरमार्क खिडकीमध्ये)

(7) सूक्ष्म अक्षरे

(8) फ्ल्युरोसेन्स (अंक फलक व मध्यवर्ती पट्टा)

(9) बदलते रंग असलेली/दिसणारी शाई (रु. पाचशे व रु. एक हजारच्या नोटांमध्ये)

(10) आरपार तंतोतंत दिसणारे रजिस्टर

(11) बँकेने घातलेले इतर कोणतेही सुरक्षा लक्षण.

(ब) एखाद्या फाटलेल्या नोटेचा खरेपणा (किंवा अन्यथा) स्थापित करण्यासाठी विहित अधिका-याला मदत करण्यासाठी एखाद्या नोटेची सुरक्षा लक्षणे दिली आहेत.

(ई) ‘सरकारी नोट’ म्हणजे, केंद्र सरकारने दिलेली किंवा केंद्र सरकारने ह्या बँकेला पुरविलेली व ह्या बँकेने दिलेली कोणतीही नोट - मात्र, अशा नोटेच्या बाबतीत तिचे मूल्य देण्याची जबाबदारी ह्या बँकेवर टाकण्यात आली आहे व ह्या बँकेने ती स्वीकारली आहे.

(फ) ‘अपूर्णत्व असलेली नोट’ म्हणजे, अंशतः किंवा पूर्णतः पुसुन गेलेली, आकुंचन झालेली, धुतली गेलेली, बदललेली किंवा वाचता न येण्यासारखी नोट. परंतु ह्यात फाटलेली नोट समाविष्ट नाही.

(ग) ‘फाटलेली नोट’ म्हणजे, तिचा एखादा भाग नसलेली/तुटला असलेली किंवा जिचे दोन पेक्षा अधिक तुकडे झाले असलेली नोट.

(ह) ‘न जुळणारी नोट’ म्हणजे, एका नोटेचा अर्धा भाग व दुस-याच एका नोटेचा अर्धा भाग मिळून झालेली फाटकी नोट.

स्पष्टीकरण : शंका दूर करण्यासाठी येथे घोषित करण्यात येते की, नंबर, सही इत्यादी आणि/किंवा इतर सुरक्षा लक्षणे तपासून न जुळणारी नोट ओळखता येऊ शकते.

(आय) ‘नोट’ म्हणजे बँक नोट किंवा सरकारी नोट.

(ज) ‘विहित अधिकारी’ म्हणजे, ह्या नियमांखाली निर्णय घेण्यासाठी फाटलेल्या नोटा स्वीकारण्यासाठी ह्याबाबतच्या करारामार्फत व्यवस्था करुन, ह्या बँकेच्या इश्यु विभागाचा कोणताही अधिकारी किंवा ह्या बँकेच्या प्रतिनिधीचा/ह्या बँकेने नेमलेला अधिकारी.

(के) ‘मळलेल्या नोटा’ म्हणजे, वापरल्यामुळे मळलेली/घाण झालेली नोट आणि त्यात दोन तुकडे (त्या एकाच नोटेचे) एकत्र चिकटवून सादर केलेली नोट.

ह्यामध्ये वापरलेल्या, व्याख्या न केलेल्या, परंतु ह्या अधिनियमात व्याख्या केलेल्या शब्दांचे व संज्ञांचे अर्थ, ह्या अधिनियमात त्यांना दिलेल्या अर्थाप्रमाणेच असतील.

(3) फाटलेल्या नोटांच्या निवाड्यावरील निर्णय :- फाटलेल्या नोटांच्या निवाड्या संबंधाने एखादा वाद निर्माण झाल्यास, तो वाद ह्या बँकेकडे निर्णयासाठी पाठविला जाईल आणि तो निर्णय, दावेदार, त्याचे नामनिर्देशित व कायदेशीर वारस किंवा प्रतिनिधींवर (असेल त्यानुसार) बंधनकारक असेल.

(4) दावा सादर करणे व त्याची वासलात :- कोणत्याही नोटेच्या बाबत असलेला दावा, ह्या नियमांखालील निवाडा व मूल्याचे प्रदानासाठी असलेल्या विहित अधिका-यासमोर सादर केला जावा.

(5) माहिती मिळविण्याचा अधिकार किंवा चौकशी करणे :- विहित अधिकारी, त्याला तसे करणे आवश्यक वाटल्यास, ह्या नियमांखाली, त्याच्यासमोर सादर केलेल्या कोणत्याही दाव्याबाबत कोणतीही माहिती मागवू शकतो किंवा चौकशी करु शकतो. जेथे नोटेच्या खरेपणाविषयी शंका आहे तेथे तो, ती नोट तज्ञांचे मत घेण्यासाठी, महाव्यवस्थापक, करन्सी नोट प्रेस, नाशिक रोड ह्यांचेकडे, किंवा ह्याबाबत जारी असलेल्या कोणत्याही कायद्याखाली नेमलेल्या अन्य कोणत्याही प्राधिकरणांकडे पाठवू शकतो.

(6) सर्व दाव्यांबाबत सर्वसामान्य तरतुदी

(1) चोरल्या गेलेल्या, हरवलेल्या किंवा संपूर्णपणे नष्ट झालेल्या नोटेंबाबत कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही.

(2) त्याच्यासमोर सादर केलेली एखादी फाटलेली नोट, ह्या बँकेच्या कोणत्याही कार्यालयाने रद्द केलेल्या नोटांपैकी एक दिसत असल्याबाबत, किंवा त्या दाव्याचे प्रदान, ह्या नियमांखाली आधीच केले गेले असल्याबाबत विहित अधिका-याचे समाधान झाले असल्यास, वरील नियमांखाली चौकशी करुन अशा नोटेबाबतचा दावा फेटाळू शकतो.

(3) पुढील प्रकारच्या नोटांबाबतचे दावे -

(1) ह्या अधिनियमाखाली ह्या बँकेचे दायित्व आहे अशी खरी नोट म्हणून हमखासपणे ओळखता न येऊ शकणारी नोट.

(2) ती अपूर्ण किंवा फाटलेल्या स्वरुपातच तयार करण्यात आली आहे व त्यामुळे ती अधिक मूल्याची दिसत आहे किंवा मुद्दाम कापण्यात, फाडण्यात, खराब करण्यात, बदल करण्यात किंवा अन्य प्रकारे खराब करण्यात आली आहे (दावेदारानेच केली असेल असे नाही), तिचा उपयोग ह्या नियमांखाली खोट्या दाव्यासाठी किंवा ह्या बँकेची किंवा जनतेची फसवणुक करण्यासाठी करण्यात येत आहे अशी नोट.

(3) त्या नोटेवर काही बाह्य मजकुर/शब्द लिहण्यात आले आहेत किंवा राजकीय किंवा धार्मिक स्वरुपाचे संदेश देण्यासाठीचा मजकुर आहे किंवा एखादी व्यक्ती किंवा संस्थेच्या हितवर्धनासाठीचा मजकुर लिहिता आहे अशी नोट.

(4) कोणत्याही कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करुन, दावेदाराने भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणातून भारतात आयात केलेली नोट.

(5) विहित अधिकारी किंव ह्या बँकेने (असेल त्याप्रमाणे) मागविलेली माहिती, ती देण्यासाठी पाठविलेली नोटिस किंवा पत्र मिळाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांत दावेदाराने सादर केली नसल्यास किंवा

(6) विहित अधिका-याच्या मतानुसार, अशा दाव्याबाबत जाणूनबुजुन फसवणुक करण्याचा उद्देश दिसून आल्यास तो दावा फेटाळला जाईल आणि सध्या जारी असलेल्या कोणत्याही कायद्याखाली, तो दावा विचारात घेण्यासाठी पात्र असणार नाही.

(7) अपूर्णत्व असलेली नोट :- नियम क्र. 8 मध्ये दिलेल्या कोष्टकानुसार अपूर्णत्व असलेल्या नोटेचे संपूर्ण/अर्धे मूल्य पुढील अटीवर प्रदान केले जाईल.

(अ) नोटेवर छापलेला मजकुर संपूर्णपणे वाचता न येण्यासारखा झाला असल्यास.

(ब) नोटेवरील वाचता येण्यासारख्या मजकुराच्या बाबतीत, ती नोट खरी असल्याबाबत विहित अधिका-याचे समाधान झाले असल्यास.

(8) फाटलेल्या नोटा

(1) एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये व वीस रुपये मूल्याच्या नोटांचा निवाडा पुढील रितीने केला जाईल -

(1) सादर केलेल्या नोटेच्या सर्वात मोठ्या अखंड तुकड्याचे क्षेत्रफळ, (पुढील चौरस से.मी. पर्यंत राऊंड करुन), त्या मूल्याच्या नोटेच्या क्षेत्रफळाच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास, त्या फाटलेल्या नोटांच्या नोटांचे पूर्ण मूल्य प्रदान केले जाईल.

(2) सादर केलेल्या नोटेच्या अखंड तुकड्याचे क्षेत्रफळ, त्या मूल्याच्या नोटेच्या क्षेत्रफळाच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास त्याबाबतचा दावा फेटाळला जाईल.

स्पष्टीकरण :- ह्या पोटनियमाबाबत येथे स्पष्ट करण्यात येते की, एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये व वीस रुपये मूल्याच्या सादर केलेल्या फाटलेल्या नोटांबाबत, खाली दिलेल्या कोष्टक 1 मध्ये विहित केल्याप्रमाणे, त्या नोटेचा सर्वात मोठा अखंड तुकडा अनुक्रमे, 31, 34, 38, 44 व 47 चौरस से.मी. असल्यास, त्या नोटेचे पूर्ण मूल्य प्रदान केले जाईल.

कोष्टक-1
मूल्य लांबी (से.मी.) रुंदी (से.मी.) - क्षेत्रफळ (से.मी.2) प्रदान करण्यासाठी आवश्यक किमान क्षेत्रफळ * (से.मी2.)
1 9.7 6.3 61 31
2 10.7 6.3 67 34
5 11.7 6.3 74 38
10 13.7 6.3 86 44
20 14.7 6.3 93 47
* एखाद्या विशिष्ट मूल्यामधील नोटेच्या अर्ध्या क्षेत्रफळानंतरच्या पुढील संपूर्ण चौरस से.मी.

(2) रु. पन्नास व त्यापेक्षा अधिक मूल्याच्या नोटांच्या दाव्यांचे प्रदान पुढील प्रकारे केले जाईल -

(1) सादर केलेल्या नोटेच्या सर्वात मोठ्या अखंड तुकड्याचे क्षेत्रफळ, संबंधित मूल्याच्या नोटेच्या क्षेत्रफळाच्या 65 टक्के पेक्षा अधिक (पुढील पूर्ण चौ. से.मी. पर्यंत राऊंड ऑफ करुन) असल्यास, वरील मूल्याच्या फाटलेल्या नोटांचे संपूर्ण मूल्य दिले जाईल.

(2) सादर केलेल्या नोटेच्या सर्वात मोठ्या अखंड तुकड्याचे क्षेत्रफळ (पुढील पूर्ण चौ.से.मी. पर्यंत राऊंड ऑफ करुन), संबंधित मूल्याच्या नोटेच्या क्षेत्रफळाच्या 40 टक्क्यांपेक्षा अधिक व 65 टक्क्यांएवढे किंवा त्यापेक्षा कमी असल्यास, त्या नोटेचे अर्धे मूल्य दिले जाईल.

(3) नोटेच्या सर्वात मोठ्या अखंड तुकड्याचे क्षेत्रफळ, संपूर्ण नोटेच्या क्षेत्रफळाच्या 40 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्याबाबत कोणतेही मूल्य दिले जाणार नाही व तो दावा फेटाळला जाईल.

(4) रुपये पन्नास ते रुपये एक हजार मूल्याच्या फाटलेल्या नोटांच्या दाव्यांमध्ये, त्याच एका नोटेचे दोन तुकडे झाले असून, प्रत्येक तुकड्याचे क्षेत्रफळ, त्या मूल्याच्या नोटेच्या क्षेत्रफळाच्या 40 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास, त्याचे पूर्ण मूल्य देण्यात यावे व त्या अर्ध्या मूल्याच्या दोन नोटा समजल्या जाऊ नयेत.

स्पष्टीकरण : ह्या पोटनियमासाठी येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, पुढील कोष्टक 2 मध्ये दिल्याप्रमाणे -

(अ) सादर केलेल्या रुपये पन्नास, रु. शंभर, रुपये पाचशे व रुपये एक हजारच्या फाटलेल्या नोटांच्या सर्वात मोठ्या अखंड तुकड्याचे क्षेत्रफळ अनुक्रमे, 70, 75, 80 व 84 चौ. से.मी. असल्यास, त्यांचे पूर्ण मूल्य दिले जावे.

(ब) नोटेच्या सर्वात मोठ्या अखंड तुकड्याचे क्षेत्रफळ वर विहित केल्यापेक्षा कमी असल्यास, वरील पोटनियम 8 च्या खंड 2(2) मध्ये दिल्यानुसार, त्या दाव्याबाबत नोटेचे अर्धे मूल्य दिले जावे.

(क) सादर केलेल्या, रु. पन्नास, रु. शंभर, रु. पाचशे व रु. एक हजारच्या फाटलेल्या नोटांबाबत, त्या नोटेच्या सर्वात मोठ्या अखंड तुकड्याचे क्षेत्रफळ अनुक्रमे किमान 43, 46, 49 व 52 चौ.से.मी. किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास, त्यांचे अर्धे मूल्य देण्यात यावे.

(ड) वरील नोटांच्या सर्वात मोठ्या एका अखंड तुकड्याचे क्षेत्रफळ वर विहित केल्यापेक्षा कमी असल्यास तो दावा फेटाळला जाईल.

कोष्टक 2
मूल्य लांबी (से.मी.) रुंदी (से.मी.) क्षेत्रफळ (से.मी2) पूर्ण मूल्य देण्यासाठी आवश्यक क्षेत्रफळ (से.मी2)@ अर्धे मूल्य देण्यासाठी आवश्यक क्षेत्रफळ (से.मी2) **
50 14.7 7.3 107 70 43
100 15.7 7.3 115 75 46
500 16.7 7.3 122 80 49
1000 17.7 7.3 129 84 52
@एखाद्या विशिष्ट मूल्यामधील नोटेच्या 65% क्षेत्रफळानंतरच्या पूढील संपूर्ण चौरस से.मी. पर्यंत
** एखाद्या विशिष्ट मूल्यामधील नोटेच्या 40% क्षेत्रफळानंतरच्या पूढील संपूर्ण चौरस से.मी. पर्यंत किंवा विशिष्ट मूल्याच्या नोटेच्या 40% टक्के क्षेत्रफळापर्यंत.

(9) न जुळणा-या नोटांबाबतच्या दाव्यांचे प्रदान :- न जुळणा-या नोटांच्या दाव्यांची प्रदाने पुढील प्रकारे केली जावीत -

(अ) रु. वीस मूल्याच्या नोटांपर्यंतच्या बाबतीत, सादर केलेल्या दोन तुकड्यांपैकी मोठ्या असलेल्या तुकड्याचे क्षेत्रफळ मोजून, (छोट्या तुकड्याकडे दुर्लक्ष करुन) नियम 8 च्या पोटनियम (1) मधील तरतुदीनुसार निवाडा केला जावा.

(ब) सादर केलेल्या नोटेच्या दोन्हीही तुकड्यांचे प्रत्येकी क्षेत्रफळ, वरील नियम 8 च्या पोटनियम (1) मध्ये विहित केलेल्या किमान क्षेत्रफळाएवढे नसल्यास तो दावा फेटाळला जाईल.

(क) रु. पन्नास व त्यापेक्षा अधिक मूल्याच्या नोटांबाबत, ते दोन्हीही तुकडे दोन वेगळे दावे समजले जावेत व त्यानुसार निवाडा केला जावा.

(10) दावेदारांवर नियमांचे बंधन

(1) ह्या नियमांखाली केलेले कोणतेही प्रदान केवळ सदिच्छा म्हणूनच केले जाईल. आणी ही बँक, विहित अधिका-याला मार्गदर्शन करण्यासाठी, वेळोवेळी, ह्या नियमांच्या तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी, पूरक किंवा सविस्तर सूचना, तिला तसे वाटल्यास देईल.

(2) अपूर्णत्व असलेल्या नोटा किंवा फाटलेल्या नोटांच्या बाबतीत दावा करणा-या कोणत्याही व्यक्तीने, तो दावा, ह्या अधिनियमाच्या कलम 28 च्या तरतुदीखाली व ह्या नियमांतील तरतुदींमधील अटींवर केला असल्याचे समजले जाईल आणि त्या तरतुदी/अटी, सर्व दावेदार व त्यांचे वारस व नेमलेल्या व्यक्तींवर बंधनकारक असतील.

(11) नोटा जतन करणे व नष्ट करणे :- नोटेचे कोणतेही मूल्य असले तरी किंवा दाव्याबाबत विहित अधिका-याचा कोणताही निर्णय असला तरी, दावा करण्यासाठी, विहित अधिका-यासमोर सादर केलेली नोट ठेवली आणि नष्ट केली जाईल किंवा अन्यथा ह्या बँकेकडून तिची पुढीलप्रमाणे वासलात लावली जाईल. -

(अ) संपूर्ण प्रदान करण्यात आले आहे अशा नोटेबाबत, प्रदान केल्यानंतर कोणत्याही वेळी आणि

(ब) जिच्याबाबत, कोणतेही प्रदान करण्यात आलेले नाही किंवा तिचे अर्धे मूल्य देण्यात आले आहे अशा नोटेबाबत तो दावा फेटाळला गेल्याच्या निर्णयाच्या किंवा अर्धे मूल्य देण्याच्या निर्णयापासून तीन महिने समाप्त झाल्यानंतर (असेल त्यानुसार), ह्या कालावधीदरम्यान, ह्या बँकेच्या कोणत्याही कार्यालयाला किंवा नेमलेल्या बँकेच्या शाखेला, ती नोट नष्ट करण्यास किंवा तिची अन्यथा वासलात लावण्यास प्रतिबंध करणारी, एखाद्या सक्षम कोर्टाने ऑर्डर सादर केली नसल्यास.

(12) कायदेशीर वारस व नामनिर्देशितांना प्रदान करणे

(1) ह्या नियमांखाली दावा सादर करणा-या दावेदाराचा मृत्यु झाला असल्यास, त्याचे कायदेशीर प्रतिनिधी, त्या दावेदाराला देय असलेले प्रदान मिळविण्यास पात्र असतील - मात्र त्या दाव्याचा निर्णय विहित अधिका-याने निश्चित केला असला पाहिजे.

(2) ह्यासाठी त्या कायदेशीर प्रतिनिधींनी, ती शाखा किंवा बँकेचे कार्यालय, किंवा ह्या बँकेने त्यासाठी नेमलेल्या अन्य कोणत्याही संस्थेच्या नावे इंडेमिनिटी बाँड केला असल्यासच, ते कायदेशीर प्रतिनिधी, दावेदाराला देय असलेले प्रदान मिळविण्यास पात्र असतील.

मात्र, ह्याबाबत घोषणापत्र दिले असल्यासच, दावेदाराच्या कायदेशीर वारसाला, रु. पाचेशे पर्यंतचे प्रदान केले जावे.

(3) ट्रिपल लॉक रिसेप्टॅकल कव्हर (टीएलआर) द्वारा ह्या बँकेला सादर करण्यात आलेल्या फाटलेल्या नोटेबाबत, सादरर्कत्याने त्या पाकिटावर स्वतःचे नाव व पत्ता, तसेच बँक खाते क्र. इत्यादि माहिती त्या पाकिटावर विहित केल्यानुसार द्यावी, आणि व्यक्तिगत सादरर्कत्यांनी त्यांच्या इच्छेनुसार, त्या दाव्याबाबत त्याला देय म्हणून ठरविण्यात येणारी रक्कम ज्याला देण्यात यावी अशा नामनिर्देशिताचे नाव व पत्ता इंडेमिनिटी शिवाय द्यावा - मात्र त्यासाठी योग्य ओळख पटविली जावी.

(13) छापील फॉर्म्स :- वरील नियम 12 मध्ये निर्देशित केलेला इंडेमिनिटी बाँड, बँकेच्या नावे करावयाचा आहे तेथे, त्या बाँडची एक छापील प्रत दावेदाराला किंवा ह्या नियमाखाली प्रदान मिळविण्यास पात्र असलेल्या व्यक्तीला निःशुल्क दिली जाईल.

(14) मुद्रांक शुल्क :- इंडेमिनिटी बाँडवरील मुद्रांक शुल्क, तो बाँड करणा-या व्यक्तीनेच द्यावयाचे आहे.

(15) आदेशिती बेपत्ता असल्यास कार्यरीत

(1) ह्या बँकेच्या कार्यालयामध्ये नोटेबाबत निर्णय घेतला गेल्यावर, त्या नोटेचे मूल्य किंवा अंशतः मूल्य दावेदाराला देय असते, आणि अशा दावेदाराचा पत्ता/ठावठिकाणा न मिळाल्यास किंवा त्याचा मृत्यु झाला असल्यास, त्याचे कायदेशीर वारस किंवा त्याने विहित केलेले नामनिर्देशितही सापडत नसल्यास, किंवा नोटेबाबत घेण्यात आलेल्या निर्णयानंतर प्रदान मिळविण्यासाठी असलेल्या पाय-या कळविल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत न आल्यास, ती रक्कम ह्या बँकेच्या बँकिंग विभागाकडे दिली जाईल.

(2) नेमलेल्या बँकेत किंवा अन्य संस्थेमध्ये फाटलेल्या नोटेबाबत निर्णय घेतला गेल्यावर, असे प्रदान, त्या नोटेच्या विनियमाचे मूल्य मिळविण्यासाठी सादरर्कत्याने करावयाच्या कार्यरीतींचा निर्णय त्या सादरर्कत्याला कळविण्यात आल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत ह्या बँकेच्या इश्यु कार्यालयात जमा केले जावे.

विभाग 3
नेमलेल्या बँक शाखांमध्ये फाटलेल्या नोटांचा स्वीकार, निर्णय, प्रदान व वासलात ह्यासाठीच्या कार्यरीतींचे पत्रक

(1) सुविधा उपलब्ध असलेल्या शाखा

जनतेच्या हितासाठी व सोयीसाठी, भारतीय रिझर्व बँकेने, बँकांच्या नेमलेल्या शाखांना, भारतीय रिझर्व बँक (नोट परतावा) नियम, 2009 अनुसार, फाटलेल्या नोटांचा स्वीकार, अदलाबदल करण्यास व त्यांचे परवानगी असलेले मूल्य प्रदान करण्यास, किंवा ह्या नियमांखाली मूल्य देता न येण्यासारख्या फाटलेल्या नोटा फेटाळण्यास प्राधिकृत केले आहे.

(2) कोणत्या नोटा स्वीकारल्या जातील ?

ह्या नियमांखाली बदलून देण्यास, बँक शाखा, रु. 1, 2, 5, 10, 20, 50, 100, 500, 1000 च्या (आणि भविष्यकाळात दिल्या जाणा-या अन्य मूल्याच्या) नोटांचा स्वीकार करतील.

ह्याशिवाय, अत्यंत ठिसुळ झालेल्या, किंवा खूप जळलेल्या, जळल्याचे डाग असलेल्या, घट्टपणे चिकटलेल्या व त्यामुळे ह्यापुढे हाताळणे अशक्य असलेल्या, किंवा कालांतराने मूळ स्वरुपाची ओळखच पटू शकणार नाही अशा नोटा बदलून देण्यासाठी ह्या शाखांकडून स्वीकारल्या जाणार नाहीत. अशा नोटा असलेल्या व्यक्तींना सांगण्यात यावे की त्यांनी त्या नोटा, धन कोष ज्याच्या अधिकार क्षेत्राखाली आहे, त्या रिझर्व बँकेच्या इश्यु विभागाच्या प्रभारी अधिका-याकडे पाठवाव्यात - तेथे अशा नोटांची विशेष कार्यकृतीने तपासणी केली जाईल.

(3) ह्या नोटा कोणाकडून घेता येतात ?

शाखांकडून आपल्या फाटलेल्या नोटा बदलून घेण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून शाखा ह्या नोटा मुक्तपणे स्वीकारतील. अधिकतर जनतेला सेवा देण्यासाठी, एखाद्या वैय्यक्तिक सादरर्कत्याकडून सादर केल्या जाणा-या नोटांच्या संख्येवर तसे आवश्यक असल्यास एक वाजवी निर्बंध ती बँक घालू शकते. उभयपक्षी व्यवस्थेने सरकारी विभाग व बँका ह्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर नोटा स्वीकारल्या जाऊ शकतात. शाखांनी ह्याकडे लक्ष द्यावे की, ही अदलाबदल-सुविधा, खाजगी मनी चेंजर्स किंवा सदोष नोटांचे व्यावसायिक व्यापारी ह्यांच्याकडूनच पूर्णतः राबविली जात नाही.

(4) ह्या नोटा कशा प्रकारे स्वीकाराव्यात ?

ह्या नोटा काऊंटरवरुनही स्वीकारता येऊ शकतात. ह्या नोटा स्वीकारल्यानंतर, फॉर्म डीएन-1 मधील दोन प्रतींमध्ये, नोटांच्या नगांची/तुकड्यांची संख्या व प्रत्येकी मूल्य दर्शविणारे एक टोकन तयार केले जावे. स्वीकार करणारा कर्मचारी/अधिका-याने, एकूण तुकडे व मूल्य ह्यांचे सत्यांकन टोकनच्या दोन्हीही प्रतीवर करुन त्यावर आपली सही/आद्याक्षरे करावीत. टोकनची मूळ प्रत सादरर्कत्याला द्यावी. दुसरी प्रत ह्या नोटांना जोडून, नोटांसह असलेले टोकन, निर्णय घेण्यासाठी विहित अधिका-याला द्यावे. निरनिराळ्या टोकन मध्ये मिसळून गोंधळ होऊ नये ह्यासाठी नोटा व टोकन घट्टपणे एकत्रित बांधल्या जाव्यात. विहित अधिका-याकडे पाठवितेवेळी व स्वीकारताना ह्या नोटांना इजा होणार नाही ह्याची खात्री केली जावी. ह्या पेपर टोकनवर धावते अनुक्रमांक टाकले जावेत. फेटाळलेल्या नोटांबाबत, त्या सादर करणारांनी केलेले वाद/तंटे टाळण्यासाठी, सादर केलेल्या सर्व नोटांवर संबंधित टोकन क्रमांक टाकला जावा. प्रत्येक सादरीकरणाचा तपशील फॉर्म डीएन-2 मध्ये, एका रजिस्टर मध्ये नोंद केला जावा.

(5) विहित अधिकारी - निर्णय व प्रदान

आरबीआय (नोट परतावा) नियम, 2009 च्या कलम 2 (जे) मध्ये व्याख्या केल्यानुसार, ह्या नियमांखाली फाटलेल्या नोटांचा निर्णय करण्यासाठी, नेमलेल्या शाखेने प्राधिकृत केलेला अधिकारी म्हणजेच विहित अधिकारी. तो प्रत्येक नोट तिच्या गुणविशेषानुसार/दर्जानुसार तपासून, ह्या नियमांचे काटेकोर पालन करुन त्या नोटेची मूल्य-देयता ठरवील. ह्या नियमांखाली त्याने मूल्य-देय ठरविलेल्या नोटांवर, तो अधिकारी त्यांच्या ‘पे’ ऑर्डर, स्टँप मारुन उठवील व त्यावर त्याची आद्याक्षरे करील. त्याचप्रमाणे, नियम 6(3), 8(1)(2), 8(2)(3) व स्पष्टीकरण (ड) खाली फेटाळण्यात आलेल्या नोटांवर, तो अधिकारी ‘रिजेक्ट’ चा शिक्का मारुन, त्यावर आद्याक्षरे करुन, त्याने त्या नोटा फेटाळल्या असल्याचा निर्णय देईल. अशी पे किंवा रिजेक्शन ऑर्डर नोटांच्या दर्शनी भागांवर असावी व नोटा चिटकवण्याच्या कागदावर किंवा नोटांच्या मागच्या बाजूवर नसावी. विहित अधिका-याने त्याची ऑर्डर, जोडलेल्या टोकनच्या दुस-या प्रतीवर रेकॉर्ड करावी आणि फॉर्म डीएन-3 मध्ये रिजेक्शन अॅडवाईस तयार करावा. अशा टोकनसह त्या नोटा, सादरर्कत्याला प्रदान करण्यासाठी काऊंटरवर परत पाठवाव्यात.

विहित अधिका-याला तसे आवश्यक वाटल्यास, नोटांचा निर्णय करण्यापूर्वी, वाईट प्रकारे जोडलेल्या नोटा पुनः जोडू शकतो. ह्या नियमांखाली मूल्य-देय असलेल्या नोटा फेटाळल्या जाणार नाहीत व मूल्य देय नसलेल्या नोटांसाठी प्रदान केले जाणार नाही ह्याची खात्री करण्यासाठी त्याला ह्या नियमांखाली देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करताना तो योग्य ते परिश्रम घेईल. वरील नियमांखाली मूल्य-देय नसलेल्या परंतु त्यांचे मूल्य प्रदान केले आहे अशा नोटा भारतीय रिझर्व बँकेला आढळून आल्यास, त्यामुळे झालेली हानी ही बँक प्राधिकृत करुन वसुल करील. प्राधिकृत बँक शाखा, ह्याबाबत भारतीय रिझर्व बँकेच्या निर्णयांचे पालन करील/स्वीकारील. कारण ही बँक वरील नियमां अन्वये अंतिम प्राधिकरण असून तिला ह्या नियमांबाबत ते तयार करणे, देणे, सुधारित करणे, अर्थ लावणे व अंमलबजावणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

(6) प्रदान

विहित अधिका-याकडून टोकनसह ह्या नोटा मिळाल्यानंतर, सर्व नोटांवर व पेपर टोकनवर, पे व रिजेक्ट ऑर्डर्स व्यवस्थितपणे नोंदण्यात आल्या असल्याबाबत काऊंटरवरील कर्मचारी खात्री करुन घेईल. त्यानंतर तो, त्या नोटांबाबत प्रदान करण्याच्या आदेशानुसार, सादरर्कत्याला त्याच्याकडील मूळ पेपर टोकन घेऊन (ज्याच्या मागच्या बाजूस सादरर्कत्याचे नाव व पत्ता असेल) नोटांचे विनियम मूल्य प्रदान करील आणि फेटाळलेल्या नोटांबाबत फॉर्म डीएन-3 मधील रिजेक्शन अॅडव्हाईस देईल. त्यानंतर तो, त्या मूल्य दिलेल्या नोटांवर तारीख असलेला ‘पेड’ स्टँप (मागच्या बाजूवर) उमटवील. कोणत्याही परिस्थितीत फेटाळलेल्या नोटा सादरर्कत्याला परत केल्या जाणार नाहीत. प्रदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रदान केलेल्या व फेटाळलेल्या नोटा वेगवेगळ्या केल्या जाव्यात. सादरर्कत्याने दिलेले मूळ टोकन फेटाळलेल्या नोटांना जोडले जावे. येथे काळजीपूर्वक नोंद घेतली जावी की, पूर्ण मूल्या ऐवजी अर्धे मूल्य दिले जाण्याबाबत सादरर्कत्याने प्रश्न उभा करण्याची शक्यता लक्षात घेऊन, त्या सहजतेने परत मिळविण्यासाठी, ज्यांच्याबाबत अर्धेच मूल्य देण्यात आले आहे अशा नोटा, फेटाळलेल्या नोटांबरोबर ठेवण्यात याव्यात. भारतीय रिझर्व बँकेचा धन कोष नसलेल्या बँक शाखांमध्ये प्रदान केलेल्या व फेटाळलेल्या नोटा त्या शाखेच्या कॅश बॅलन्स बरोबर वेगवेगळ्या ठेवल्या जाव्यात. ह्या नोटांच्या योग्य व सर्वसमावेशक सुरक्षेसाठी शाखा व्यवस्थापक जबाबदार असेल. येथे स्पष्ट जाणीव असावी की मूल्य दिलेल्या व फेटाळलेल्या अशा दोन्हीही प्रकारच्या नोटा भारतीय रिझर्व बँकेच्या वतीने ठेवावयाच्या असून त्यांची कोणत्याही प्रकारे वासलात लावली गेल्यास, त्यासाठी, रिझर्व बँकेने त्याबाबत दिलेल्या सूचना लागु होतील.

धन कोष असलेल्या शाखांमध्ये, रु.500/- च्या पटीतच (व किमान रु.1,000/-) ‘पेड’ नोटा त्या धन कोषात जमा केल्या जातील. अर्धे मूल्य दिलेल्या व फेटाळलेल्या नोटा त्या शाखेच्या कॅश बॅलन्स बरोबर ठेवल्या जातील.

(7) निर्णय केलेल्या नोटांबाबत लेखा कर्म

ज्यांचे पूर्ण मूल्य देण्यात आले आहे अशा नोटा, देता न येण्यासारख्या नोटांप्रमाणेच समजल्या जाव्यात, आणि देता न येण्याजोग्या नोटा जमा करण्यासाठी विहित असलेल्या कार्यकृतींचे अनुसरण करुन, त्या नोटा, धन कोष शिल्लकीचा एक भाग म्हणून ठेवल्या जातील. ह्या नोटा, धन कोषाच्या स्लिपमध्ये, न देता येणा-या नोटा म्हणूनच दाखविल्या जाव्यात. पूर्ण मूल्य देण्यात आलेल्या नोटांना, त्या नोटा, रिझर्व बँकेकडे पाठविण्यासाठी असलेल्या मळक्या नोटांपासून स्पष्टपणे वेगळ्या करुन वेगळ्या कप्प्यात ठेवल्या जाव्यात. भारतीय रिझर्व बँकेच्या इश्यु विभागाकडे मळक्या नोटा पाठविताना, ह्या नोटा वेगळ्याने पॅक करुन, त्या मळक्या नोटांबरोबरच पाठविल्या जाव्यात. अर्धे मूल्य दिलेल्या व फेटाळण्यात आलेल्या नोटा, त्या शाखेच्या बॅलन्स बरोबर वेगळ्याने ठेवल्या जाव्यात आणि कोणत्याही परिस्थितीत, त्या धनकोषामधील पूर्ण मूल्य नोटांबरोबर ठेवल्या जाऊ नयेत.

धन कोष नसलेल्या शाखा त्यांनी निवाडा केलेल्या नोटा, त्यांची जोडणी असलेल्या धन कोषांकडे पाठवतील व ते त्या नोटा, मळक्या नोटांसह रिझर्व बँकेकडे पाठवितील.

(8) निवाडा केलेल्या नोटांची पडताळणी व हस्तांतरण

पूर्ण मूल्य देण्याचा निवाडा घेण्यात आलेल्या नोटा, मळक्या नोटांबरोबरच पाठविल्या जाव्यात. ह्या नोटांची गुणात्मक व संख्यात्मक पडताळणी भारतीय रिझर्व बँकेत केली जाईल. अशा नोटांना चेस्ट रेमिटन्स म्हणून समजले जाईल व त्यानुसार त्यांचा हिशेब ठेवला जाईल.

अर्धे मूल्य दिल्या गेलेल्या नोटा, आरबीआयच्या इश्यु विभागाच्या क्लेम विभागाकडे वेगळ्याने पाठविल्या जाव्यात. विहित अधिका-याने खात्री करुन घ्यावी की, त्या नोटा आरबीआयकडे पाठविण्यापूर्वी, ह्या नियमांच्या परिच्छेद 11(ब) मध्ये दिल्यानुसार, नोटा जतन करण्यासाठीचा तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तथापि, डीएन-2 मध्ये देण्यात आलेला सादरर्कत्यांचा तपशील, त्याला प्रदान करण्यासाठी जतन करण्यात यावा. ह्या नोटा, धन कोष ठेवला असलेल्या शाखेकडून मिळाल्या असल्याचे समजले जावे. फेटाळलेल्या नोटांसाठी कोणतेही मूल्य देण्यात आलेले नाही, आणि अर्धेच मूल्य देण्यालायक नोटांबाबत पूर्ण मूल्य देण्यात आलेले नाही ह्याची खात्री करण्यासाठी, रिझर्व बँकेमध्ये ह्या नोटांचे ऑडिट केले जाईल. अर्धे मूल्य दिले गेलेल्या व फेटाळलेल्या नोटांबाबत जतन करण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी आधीच पूर्ण झाला असल्याकारणाने, योग्य वाटेल त्यानुसार, रिझर्व बँकेच्या इश्यु विभागाकडून त्या नोटा नष्ट करण्यात येतील.

(9) नकली/बनावट नोटा

फाटलेल्या नोटांचा निवाडा करण्यादरम्यान एखादी नोट नकली असल्याचे आढळून आल्यास, विहित अधिका-याने त्या नोटेवर ‘काऊंटरफीट नोट इंपाऊंडेड’ असा शिक्का मारुन, त्यावर सही करुन ती नोट जप्त करावी. नकली नोटा हाताळण्याबाबतच्या कार्यरीतींचे येथे अनुसरण केले जावे. नकली नोटा शोधण्यासाठी संदर्भ म्हणून ‘ख-या नोटांची मुख्य लक्षणे’ जोडपत्रात दिली आहेत.

(10) संकीर्ण

(1) विहित अधिका-याने केवळ फाटलेल्या नोटांचीच तपासणी करुन निवाडा करावा. मळलेल्या नोटा (ह्यात मध्यभागी किंवा मध्यभागाजवळ उभ्या/आडव्या फाटून दोन तुकडे झाले आहेत अशा नोटा समाविष्ट आहेत). सर्व शाखांमध्ये व धन कोष शाखांमध्येही मुक्तपणे स्वीकारल्या व बदलून दिल्या जाव्यात.

(2) किमान वेळेमध्ये विनिमयाचे मूल्य देण्याचा हरप्रयत्न केला जावा परंतु कोणत्याही परिस्थितीत ते त्याच दिवशी केले जावे. बँक व्यवहार करण्याची सवय वाढविण्यासाठी, नोटांचे विनिमय मूल्य, ईसीएसने खात्यात जमा केले जावे किंवा बँकर्स चेकने किंवा डिमांड ड्राफ्टने दिले जावे.

(3) विहित अधिका-याने, सादर केलेल्या नोटा काळजीपूर्वक तपासाव्यात. शंकास्पद किंवा मुद्दाम जोडून तयार केल्या आहेत असे वाटणा-या नोटा, त्या नोटेचा सर्वात मोठा अखंड तुकडा कोणता हे ठरविण्यासाठी (नोटा बदलून देण्यासाठीचा हा पायाभूत गुणविशेष आहे) टेबल लँप समोर धरुन तपासल्या जाव्यात.

(4) विहित अधिका-याने त्याची पे ऑर्डर लाल शाईने लिहावी व त्यावर ताबडतोब ‘पे’ स्टँप मारण्यात यावा. दुरुपयोग टाळण्यासाठी ‘पे’ स्टँप त्याने स्वतःकडेच बंदोबस्तात ठेवावा.

(5) दोषयुक्त नोटांच्या प्रदानक्षमतेबाबत मते व्यक्त करण्यासाठीच्या विनंत्या (किंवा अन्यथा) ह्यांना प्रतिसाद दिला जाऊ नये.

(6) नोटांची तपासणी किंवा बदलण्यासाठी सादर केलेल्या नोटा परत करण्याबाबतच्या किंवा त्यासंबंधीच्या माहितीसाठीच्या विनंत्यांना प्रतिसाद देऊ नये.

(11) विहित अधिका-यांसाठी सहाय्यक साधने

सदोष नोटा हाताळताना निर्णय घेण्यासाठी अधिक मदत व्हावी ह्यासाठी, विहित अधिका-यांना पुढील सहाय्यक साधने दिली जावीत.

(1) मध्यम प्रखरतेचा टेबल लँप

(2) बृहद् दर्शक भिंग

(3) मापन करणारी सेंटीमीटर पट्टी (प्लास्टिकची)

(4) सर्व मूल्यांच्या, निरनिराळ्या पॅर्टन्सच्या ख-या नोटांचा संच (शंका आल्यास तुलना करण्यासाठी).

(12) नोटिस बोर्डावर प्रदर्शित करणे

शाखा व्यवस्थापकाने त्याच्या शाखा-कार्यालयाच्या बाहेर, हिंदी, इंग्रजी व स्थानिक भाषेमध्ये, जनतेच्या माहितीसाठी, पुढीलप्रमाणे पाटी लावावी.

‘येथे फाटलेल्या नोटा बदलून दिल्या जातील’

बँकिंग हॉल मध्ये, आणि फाटलेल्या नोटा स्वीकारल्याच्या काऊंटरवर पुढील पाटी लावली जावी.

(1) भारतीय रिझर्व बँक (नोट परतावा) नियमांखाली, येथे बदलून देण्यासाठी फाटलेल्या नोटा स्वीकारल्या जातील.
(2) विनिमयाचे मूल्य (असल्यास) त्याच दिवशी गोळा करण्यात यावे.
(3) विनिमय मूल्य देय नसलेल्या नोटा आमच्याकडून ठेवून घेतल्या जातील.
(4) अडचण आल्यास कृपया शाखा निबंधकांना भेटावे.

विभाग 5
भारतीय नोटांची सुरक्षा लक्षणे

वॉटरमार्क

महात्मा गांधी मालिकेतील बँक नोटांमध्ये, छाया-प्रकाश परिणाम साधणारा महात्मा गांधींचा वॉटरमार्क व वॉटरमार्क खिडकीत निरनिराळ्या दिशांना जाणा-या रेषा असतात.

सुरक्षा धागा

ऑक्टोबर 2000 मध्ये देण्यात आलेल्या रु.1,000 च्या बँक नोटेमध्ये, दर्शनी बाजूस आलटून पालटून दिसणारा वाचता येईल असा भारत हा शब्द (हिंदीत), ‘1000’ व ‘RBI’ हे शब्द असलेला, खिडक्या असलेला, परंतु मागच्या बाजूस संपूर्ण एंबेडेड असा सुरक्षा धागा आहे. रु.500 व रु.100 च्या नोटांमध्ये वरील प्रमाणेच दृष्य लक्षणे व भारत (हिंदीत), व ‘RBI’ हे इन्स्क्रिप्शन आहे. प्रकाशाच्या समोर धरल्यावर रु.1000, रु.500 व रु.100 च्या नोटांमधील सुरक्षा धागा अखंड दिसतो. रु.5, रु.10 व रु.20 व रु.50 च्या नोटांमध्ये, वाचता येईल असा, संपूर्णतः एंबेडेड, खिडक्या असलेला, भारत (हिंदीमध्ये) व ‘RBI’ लिहिलेला सुरक्षा धागा आहे. हा सुरक्षा धागा, महात्मा गांधीच्या चित्राच्या डावीकडे आहे. महात्मा गांधी मालिकेपूर्वी दिल्या गेलेल्या नोटांमध्ये, एक सपाट/साधा, वाचता न येण्याजोगा व संपूर्णतः एंबेडेड सुरक्षा धागा आहे.

सुप्त प्रतिमा

रु.1,000, रु.500, रु.100, रु.50 व रु.20 च्या दर्शनी बाजूवर, महात्मा गांधीच्या चित्राच्या उजव्या बाजूस, असलेल्या एका उभ्या पट्ट्यामध्ये, त्या नोटेचे अंकामधील मूल्य दर्शविणारी एक सुप्त प्रतिमा आहे. ही प्रतिमा केवळ ती नोट डोळ्यांसमोर आडवी धरल्यासच दिसते.

सूक्ष्म अक्षरे

हे लक्षण, उभा पट्टा व महात्मा गांधींचे चित्र ह्यांच्या दरम्यान आहे. रु.5 व रु.10 च्या नोटांमध्ये त्यात ‘RBI’ हा शब्द आहे. रु.20 व त्यापेक्षा अधिक मूल्याच्या नोटांमध्येही, त्या नोटांच्या मूल्याचा अंक सूक्ष्म अक्षरात छापलेला आहे. हे लक्षण, बृहद दर्शक भिंगाखाली अधिक स्पष्टतेने दिसून येते.

इंटाग्लिओ छपाई

महात्मा गांधींचे चित्र, रिझर्व बँकेचे सील, हमी व वचननामा, डाव्या बाजूकडील अशोक स्तंभ चिन्ह, आरबीआयच्या गव्हर्नरांची सही हे सर्व, रु.20, रु.50, रु.100, रु.500 व रु.1000 च्या नोटांवर, इंटाग्लिओ छपाईने (म्हणजे स्पर्शाने जाणवू शकणारी उठावदार छपाई) छापण्यात आले आहेत.

ओळख चिन्ह

रु.10 ची नोट सोडून इतर सर्व नोटांवर, वॉटरमार्क खिडकीच्या डाव्या बाजूस हे विशेष लक्षण इंटालिओ छपाई करुन टाकण्यात आले आहे. निरनिराळ्या मूल्यांसाठी, हे चिन्ह निरनिराळ्या आकारात आहे (रु.20 - उभा आयत, रु.50 - चौरस, रु.100 - त्रिकोण, रु.500 - वर्तुळ, रु.1000 - हिरा) आणि हे चिन्ह दृष्टीहीन व्यक्तींना नोटेची ओळख पटविण्यासाठी मदत करते.

फ्ल्युरोसेन्स

नोटांचे अंक फलक फ्ल्युरोसेंट शाईने छापण्यात आले आहेत. ह्या नोटांमध्ये ऑप्टिकल फायबर्सही आहेत. अल्ट्रा व्हायोलेट दिव्याच्या प्रकाशात ही दोन्हीही लक्षणे दिसून येतात.

बदलत्या रंगांची शाई

रु.1000 व रु.500 च्या नोटांमध्ये हे नवीन सुरक्षा लक्षण, नोव्हेंबर 2000 मध्ये सुधारित रंग योजना करुन टाकण्यात आले आहे. रु.1000 व रु.500 च्या नोटांच्या दर्शनी बाजूंवर, ऑप्टिकली व्हॅरिएबल शाईने (म्हणजे रंग बदलणारी शाई) अनुक्रमे 1000 व 500 हे अंक छापले आहेत. 1000/500 ह्या अंकांचा रंग, ती नोट आडवी/समतल धरल्यास हिरवा दिसतो तर, नोट तिरपी धरल्यास तो निळा होतो.

सी-थ्रु रजिस्टर

वॉटरमार्कच्या जवळील उभ्या पट्ट्यामधील नोटेच्या पुढील (पोकळ) व मागील (भरलेल्या) भागा फुलांचे डिझाईन आरपार तंतोतंत जुळते. प्रकाशासमोर धरल्यास हे केवळ एकच फुलांचे डिझाईन असल्यासारखे दिसते.

 
Top 
 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��