Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ���E�ɴɽ�ɮ�
 Sɱ�x�
 ���n����� Sɱ�x�
 �ɮ�E�ɮ�� ����J�� ���V�ɮ�{��`�
 Bx� ��� B�� ���V�
 |�n��x� |�h�ɱ��
����� >> B�� B C���V� - Display
Date: 29/05/2019
बाह्य वाणिज्य कर्जे (ईसीबी) आणि ट्रेड क्रेडिट

(मे 29, 2019 रोजी अद्यावत)

भाग 1 - बाह्य वाणिज्य कर्जे

अ. मुलभुत प्रश्न

(1) विद्यमान ईसीबी रचना आणि ट्रेड क्रेडिट ची सविस्तर माहिती कोठे मिळू शकेल?

ईसीबी व टीसी वरील विद्यमान साचावरील मार्गदर्शनासाठी, ‘बाह्य वाणिज्य कर्जे, ट्रेड क्रेडिट्स व स्ट्रक्चर्ड ऑबलिगेशन्स’ वरील महानिर्देश, क्र.5, दि. मार्च 26, 2019 चा संदर्भ घेतला जावा. ह्या पूर्वीच्या साचाखाली उभारण्यात आलेली ईसीबी व टीसी, ह्यांनी ती ईसीबी व टीसी मिळवितेवेळी लागु असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन करणे सुरुच ठेवावे.

(2) एडी वर्ग 1 बँकांनी दिलेली एफसीएनआर(बी) कर्जे ईसीबी साचाखाली येतात काय?

नाही. एफसीएनआर(बी) ठेवींच्या उत्पन्नामधून, एडी वर्ग 1 बँकांनी देशांतर्गत दिलेली विदेशी मुद्रेतील कर्जे ईसीबी साचाखाली येत नाहीत.

(3) अनिवासी व्यक्तींकडून कर्ज घेताना कोण-कोणत्या सावधानता ठेवाव्यात?

विदेशातून घेतलेली/उभी केलेली कर्जे, वेळोवेळी सुधारित केलेल्या अधिसूचना क्र. फेमा 3 (आर)/2018-आरबी दि. डिसेंबर 17, 2018 अन्वये दिलेल्या, विदेशी मुद्रा व्यवस्थापन (विदेशी मुद्रेत कर्ज घेणे व देणे) विनियम 2018 मध्ये दिलेल्या ईसीबी मार्गदर्शक तत्वांचे/तरतुदींचे अनुपालन केलेली असणे आवश्यक आहे.

(4) ईसीबी मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन केल्याची खात्री करणे ही कोणाची जबाबदारी आहे?

लागु असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन करुनच कर्ज घेतले असल्याची खात्री करुन घेण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित कर्जदाराचीच आहे. ईसीबी मार्गदर्शक तत्वांना कोणत्याही प्रकारे वळसा घालणा-या/बायपास करणा-या रचना, आणि/किंवा परवानगी नसलेल्या अन्य कोणत्याही रितीने कर्जे उभी करणे/व्यवहाराच्या निराळ्याच प्रकाराखाली कर्ज लपविणे आणि/किंवा विदेशी व्यवस्थापन (विदेशी मुद्रेत कर्ज घेणे व देणे) विनियम 2018 च्या तरतुदींचे उल्लंघन करणे ह्यासाठीही फेमाखाली दंडात्मक कारवाई केली जाईल.

(ब) ईसीबी उभे करण्यासाठीची पात्रता

(5) ईसीबी उभे करण्यासाठी एलएलपी पात्र आहेत काय?

एफडीआय मिळविण्यासाठी सर्व एलएलपी पात्र नाहीत, ते ईसीबी उभे करु शकत नाहीत.

(क) ईसीबीचे चलन (मुद्रा)

(6) आयएनआर मूल्यातील ईसीबींचे विदेशी मुद्रेतील ईसीबींमध्ये रुपांतर करता येऊ शकते काय?

आयएनआर चलनातील ईसीबी उभे करणा-या कोणत्या संस्थेला आयएनआर ईसीबी मधून निर्माण होणारे दायित्व, कोणत्याही प्रकाराने, किंवा एखादे डेरिवेटिव काँट्रॅक्ट करुन किंवा अन्यथा विदेशी मुद्रा जोखीम घेऊन, विदेशी मुद्रा दायित्वामध्ये रुपांतरित करण्यास परवानगी नाही.

(ड) (ओळखप्राप्त धनको/निवेशक)व

(7) जेथे अंतिम उपयोग हा सर्वसाधारण कॉर्पोरेट हेतु/कार्यकारी भांडवल/रुपयांमधील कर्जांची परतफेड ह्यापेक्षा निराळा आहे तेथे, विदेशी इक्विटी धारकासाठी (थेट/अप्रत्यक्ष) किमान इक्विटी धारण लागु आहे काय?

‘बाह्य वाणिज्य कर्जे, ट्रेड क्रेडिट्स व स्ट्रक्चर्ड ऑब्लिगेशन्स’ वरील, महानिर्देश क्र.5, दि. मार्च 26, 2019 (एमडी) च्या परिच्छेद 1.11 मध्ये व्याख्या केलेले विदेशी इक्विटी धारक, त्या एमडींच्या परिच्छेद 2.1.viii(डी), 2.1.viii(ई) and 2.1.viii(एफ) मध्ये दिलेल्या अंतिम उपयोगासाठी कर्ज देण्यास पात्र आहेत, नकारात्मक यादीत दिल्या व्यतिरिक्त अंतिम उपयोगांसाठी असलेले ओळख/मान्यता प्राप्त धनको त्या एमडीच्या परिच्छेद 2.1.4 मध्ये दिले आहेत.

(8) कर्जदार संस्थेंमध्ये किमान 25% थेट इक्विटी धारण करणारा, किंवा कर्जदार संस्थेंमध्ये किमान 51% अप्रत्यक्ष धारण करणारा विदेशी इक्विटी धारक हा एक ओळखप्राप्त धनको आहे. एकदा ईसीबीचे काँट्रॅक्ट झाल्यावर विदेशी इक्विटी धारक त्याच्या धारणाची वासलात लावू शकतो काय?

नाही. किमान इक्विटी धारणासह ईसीबीची सर्व मार्गदर्शक तत्वे त्या ईसीबीच्या संपूर्ण मुदतीमध्ये पूर्ण करावयाची आहेत - केवळ ईसीबी काँट्रॅक्ट करतेवेळी नाही.

(9) रुपये मूल्यामधील बाँड्स विदेशात देण्याच्या प्रक्रियेत भारतीय बँका अन्य कोणत्याही प्रकारे भाग घेऊ शकतात काय?

विदेशात प्रायमरी मार्केटमध्ये दिलेल्या आरडीबीज् मध्ये भारतीय बँका वर्गणी देऊ शकत नाहीत परंतु त्यांनी प्रुडेंशियल नॉर्म्सचे पालन केले असल्यास त्या अरेंजर्स/अंडररायटर्स/मार्केट मेकर्स/ट्रेडर्स होऊ शकतात.

(10) ईसीबी साचामध्ये परवानगी दिल्याप्रमाणे, भारतामधील निवासी व्यक्ती, विदेशातील केंद्रात किंवा आयएफएससी मधील पात्र असलेल्या ईसीबी कर्जदारांनी दिलेल्या बाँड्समध्ये (विदेशी मुद्रा/आयएनआर) वर्गणी देऊ शकतात काय?

नाही. एडी बँकांनी खात्री करुन घ्यावी की, भारतीय बँकांच्या विदेशातील शाखा/दुय्यम संस्था किंवा अन्य परवानगीप्राप्त संस्था सोडल्यास, भारतातील निवासी व्यक्तींना, ह्या साचाखाली, पात्र असलेल्या संस्थांनी घेतलेल्या कर्जांबाबत, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असे कोणतेही एक्सपोझर असू नये. ह्याशिवाय, ह्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन/भंग करणा-या कर्ज घेणा-या रचना/मोडॅलिटीज स्थापन करणे ह्यासाठी, फेमाखाली विहित केल्याप्रमाणे त्या दंडात्मक कारवाईसाठी पात्र असतील.

(11) विदेशी इक्विटी धारक असल्यास किंवा विदेशात सूचिबध्द केलेल्या बाँड्स/रोख्यांमध्ये वर्गणी दिलेली असल्यास त्या व्यक्ती धनको म्हणून ओळखल्या जातात. एफएटीएफ/आयओएससीओ चे अनुपालन केलेल्या अधिकार क्षेत्रांमधूनही असे धनको असावेत काय?

होय.

(ई) सरासरी परिपक्वता कालावधी/रक्कम

(12) सरासरी परिपक्वता कालावधी कसा काढला जातो?

उदाहरणादाखल आपण https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/12EC160712_A6.pdf चा संदर्भ घेऊ शकता.

(13) सरासरी परिपक्वतेच्या ऐवजी डोअर-टु-डोअर परिपक्वता वापरता येऊ शकते काय?

नाही.

(14) सर्वसाधारण कॉर्पोरेट हेतूसाठी ट्रॅक 1 खाली उभ्या केलेल्या ईसीबीसाठी, त्या ईसीबीच्या मुद्दलची परतफेड, 5 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच सुरु करता येते काय?

होय. तथापि, ईसीबीचा किमान सरासरी परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा असावा.

(फ) (सर्वसमावेशक खर्च)

(15) ईसीबी दायित्व - इक्विटी गुणोत्तरासाठी, प्रायोजित ईसीबी सर्व आऊटस्टँडिंग ईसीबींमध्ये मिळवावी काय?

होय. दोन वेळा मोजले जाणे टाळण्यासाठी प्रायोजित ईसीबी रक्कम हिशेबात घेतली जाणार नाही तेथे, पुनर् अर्थसहाय्यासाठी उभे केलेल्या ईसीबी व्यतिरिक्त

(16) ‘ईसीबी लायाबिलिटी - इक्विटी गुणोत्तरातील’ इक्विटीमध्ये अपरिवर्तनीय प्रिफरन्स भांडवल समाविष्ट आहे काय?

नाही.

(17) ईसीबी उभे करण्यासाठीची वैय्यक्तिक मर्यादा काढण्यासाठी प्रायोजित ईसीबी, सर्व आऊटस्टँडिंग ईसीबींमध्ये मिळवावे काय?

स्वयंचलित मार्गाखाली ईसीबी उभे करण्यासाठीची वैय्यक्तिक मर्यादा, प्रायोजित ईसीबीसह, त्या वित्तीय वर्षात उभी केलेली सर्व ईसीबी हिशेबात घेईल. तथापि, प्रति वित्तीय वर्षासाठी वैय्यक्तिक मर्यादा काढण्यासाठी, ईसीबी रकमेचे पुनर्-वित्तीकरण हिशेबात घेतले जाणार नाही. तसेच ही मर्यादा नवीन वित्तीय वर्षात पुनश्च घातली जाईल.

(18) ईसीबी लायाबिलिटी-इक्विटी गुणोत्तर काढतेवेळी, पात्र असलेल्या कर्जदाराला झालेल्या तोट्यासाठीचा, नफा-तोटा लेखेमधील डेबिट बॅलन्स, मुक्त राखीव निधीमधून वजा करणे आवश्यक आहे काय?

होय. पात्र असलेल्या कर्जदाराच्या ऑडिट केलेल्या अगदी अलिकडील ताळेबंदानुसार, नफा-तोटा लेखेतील कोणताही डेबिट बॅलन्स, ईसीबी लायाबिलिटी - इक्विटी गुणोत्तर काढण्यासाठी इक्विटीमधून वजा केला पाहिजे.

(19) एखादा पात्र असलेला कर्जदार एकाच वेळी विदेशी मुद्रेतील व आयएनआरमधील अशी दोन्हीही ईसीबी उभी करु शकतो काय?

होय. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्या ईसीबी, संबंधित चलनांसाठी असलेल्या ईसीबी मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन करत आहेत तो पर्यंत. वैय्यक्तिक मर्यादेंमध्ये, उभी केलेली सर्व ईसीबी समाविष्ट असतील - मग ती विदेशी मुद्रेत असोत की आयएनआरमध्ये असोत.

(20) देण्यात आलेल्या अधिकारामध्ये ईसीबी रक्कम वाढविण्यास परवानगी आहे काय?

होय. मात्र वाढीव रक्कम विद्यमान वित्तीय वर्षासाठी, स्वयंचलित मार्गासाठी लागु असलेल्या मर्यादेचा भंग करणारी नसावी व त्या ईसीबीचे इतर पॅरामीटर्स देखील विद्यमान ईसीबीच्या मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन करणारे असावेत.

(फ) (सर्वसमावेशक खर्च)

(21) सर्व-समावेशक खर्चाची मर्यादा सातत्याने लागु आहे की ती एका सरासरी धर्तीवरही काढता येते?

सर्व-समावेशक खर्च हा नेहमीच लागु असलेल्या मर्यादेतच असावा. म्हणजे, पहिल्या वर्षात सर्व-समावेशक खर्चाच्या मर्यादेचे उल्लंघन करणे व सरासरी पाळण्यासाठी दुस-या वर्षात सर्व-समावेशक खर्च खूप कमी ठेवण्यास परवानगी नाही.

(22) बांधणीच्या टप्प्यामधील व्याज ईसीबी कर्जामधून देता येते काय?

ईसीबीच्या उत्पन्नाचा उपयोग व्याज/आकार देण्यास मनाई करणारी सर्व-समावेशक खर्चाची व्याख्या, प्रकल्प वित्तासाठी उभारण्यात आलेल्या व इमारत बांधणीदरम्यान हमी शुल्क (ईसीए प्रिमियम सारखे) व व्याज देण्यासाठी लागु नाही - मात्र, हे घटक त्या प्रकल्प खर्चाचे एक भाग असले पाहिजेत व कर्जदाराने भांडवल पुरविले असावे.

(ग) (अंतिम उपयोग)

(23) ईसीबी साचाखाली भूतकाळात केलेल्या खर्चाची भरपाई करणे हा परवानगीप्राप्त अंतिम उपयोग आहे काय?

ईसीबी साचाखाली भूतकाळात केलेल्या खर्चाची भरपाई करणे हा परवानगीप्राप्त अंतिम उपयोग नाही.

(24) देशांतर्गत इक्विटी गुंतवणुक करण्यासाठी किंवा गुडविल विकत घेण्यासाठी ईसीबी मिळविता येते काय?

नाही. थेटपणे किंवा अप्रत्यक्षरितीने (गुडविल विकत घेण्याद्वारे) इक्विटी गुंतवणुक करण्यास परवानगी नाही.

(25) एलएलपीमध्ये वर्गणी देण्यासाठी ईसीबी मिळविता येते काय?

नाही. तसे करण्यास परवानगी नाही.

(26) रुपये मूल्यातील विद्यमान ईसीबीचे पुनर्-प्रदान/परतफेड करण्यासाठी एखादा पात्र असलेला कर्जदार नवीन विदेशी मुद्रेतील ईसीबी उभी करु शकतो काय?

रुपये मूल्यामधील ईसीबीचे पुनर् वित्तीकरण विदेशी मुद्रेतील ईसीबीने करण्यास परवानगी नाही.

(27) विद्यमान विदेशी गुंतवणुक मार्गदर्शक तत्वांनुसार, पात्र असलेल्या निवासी कर्जदारांकडून, ईसीबीचे उत्पन्न त्यांच्या विदेशातील जेव्ही/डब्ल्युओएस मध्ये गुंतवणुक करण्यासाठी वापरता येऊ शकते काय?

होय. विदेशातील गुंतवणुक मार्गदर्शक तत्वानुसार, ईसीबीचे उत्पन्न, विदेशातील गुंतवणुकीसाठी वापरण्यास परवानगी आहे.

(28) ऑन लोडिंग व्यवसाय करणा-या कर्जदारांसाठी ऑन लोडिंग हे कार्यकारी भांडवल समजण्यात येते काय?

ईसीबीच्या हेतूसाठी ऑन लोडिंग व्यवसाय करणा-या कर्जदारांसाठी ऑन लोडिंग हे कार्यकारी भांडवल समजण्यात येत नाही. ह्याशिवाय ह्याबाबतीत कर्जदारांनी संबंधित क्षेत्रीय किंवा प्रुडेंशियल विनियामकाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करणे गरजेचे आहे.

(29) भारत सरकारने अधिसूचित केलेल्या, हार्मोनाइज्ड मास्टर लिस्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर सबसेक्टर्स मध्ये व्याख्या केलेल्या, परवडणा-या गृहनिर्माण प्रकल्पामधील केवळ सदनिका/एकके ह्यांच्यासाठी वैय्यक्तिक कर्जदारांना ऑन लोडिंग करण्यासाठी गृह वित्त कंपन्या ईसीबी उभारु शकतात काय?

होय.

(एच) ईसीबीचे पुनर् वित्तीकरण

(30) विद्यमान ईसीबी साचाखाली, उभ्या केलेल्या ईसीबीद्वारे, पूर्वीच्या ईसीबी साचाखाली उभ्या केलेल्या ईसीबीला पुनर्वित्त सहाय्य/अंशतः पुनर्वित्त सहाय्य देता येऊ शकते काय?

होय. मात्र त्यासाठी, विद्यमान ईसीबी साचाखाली ईसीबी उभे करण्यास तो कर्जदार पात्र राहिला असला पाहिजे, विद्यमान ईसीबीच्या सर्व-समावेशक खर्चापेक्षा त्या ईसीबीचा सर्व-समावेशक खर्च कमी असला पाहिजे, शेष परिपक्वता कमी झालेली नसावी आणि नवीन ईसीबी देखील विद्यमान ईसीबी साचाचे अनुसरण करणारी असावी.

(31) मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन केले गेले असल्यास, मंजुरी मार्गाखाली उभ्या केलेल्या ईसीबीसाठीही, स्वयंचलित मार्गाखाली पुनर्वित्तीकरण/अंशतः पुनर्वित्तीकरण करता येऊ शकते काय?

होय.

(32) विदेशी इक्विटी धारकांकडून उभ्या करण्यात आलेल्या व कार्यकारी भांडवल/सर्वसाधारण कॉर्पोरेट हेतु/रुपयांमधील कर्जांची परतफेड ह्यासाठी वापरलेल्या ईसीबींचे पुनर् वित्तीकरण करण्यास परवानगी आहे काय?

होय. तथापि, ईसीबी साचा व लागु असलेली मार्गदर्शक तत्वे ह्यात व्याख्या केल्यानुसार, नवीन ईसीबी धनकोंनी, विदेशी इक्विटी धारकही असले पाहिजे.

(आय) ईसीबी साचाखाली हेजिंग करणे

(33) विदेशात रुपये मूल्यातील बाँड्स देण्यासह, आयएनआर ईसीबी उभी करणारी संस्था, अशा ईसीबींमुळे निर्माण होणा-या जबाबदारांसाठी विदेशी चलन जोखीम घेऊ शकते काय?

आयएनआर ईसीबी उभ्या करणा-या (विदेशात रुपये मूल्यातील बाँड देण्यासह) कोणत्याही संस्थेला, अशा ईसीबींमुळे निर्माण झालेल्या जबाबदारीने रुपांतरण, कोणत्याही प्रकारे विदेशी मुद्रा जबाबदारीमध्ये करण्यास किंवा एखादे डेरिवेटिव काँट्रॅक्ट करुन किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे विदेशी मुद्रा जबाबदारी घेण्यास परवानगी नाही.

(34) ईसीबींसाठीचे विद्यमान हेजेस, आऊटस्टँडिंग ईसीबीच्या 100 टक्क्यांपर्यंत रोल ओव्हर करता येऊ शकतात काय?

होय. विहित केलेली अट किमान अनिवार्य हेजची आहे.

(35) ईसीबीचे हिजिंग करण्यासाठी परवानगी असलेले डिरिवेटिव उत्पाद कोणते?

उपयोग करणारांनी, वेळोवेळी सुधारित केलेल्या, जुलै 5, 2016 रोजीच्या, जोखीम व्यवस्थापन व आंतर बँकीय व्यवहार वरील महानिर्देशाचा संदर्भ घ्यावा.

(जे) रिपोर्ट पाठविणे

(36) ईसीबीच्या बाबतीत फॉर्म ईसीबी दाखल करतेवेळी कोणत्या काळज्या घ्याव्यात?

ईसीबीच्या बाबतीत असलेला कोणताही ड्रॉ-डाऊन हा, संचालक, बाह्य वाणिज्य कर्जे विभाग, सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग (डीएसआयएम), भारतीय रिझर्व बँक, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई - 400051 ह्यांचेकडे प्रमाणित फॉर्म ईसीबी फाईल करुन, आरबीआयकडून कर्ज पंजीकरण क्रमांक (एलआरएन) मिळविल्यानंतरच व्हावा. त्या ईसीबीच्या सर्व अटी व शर्ती फॉर्म ईसीबीमध्ये बिनचुकपणे रिपोर्ट केल्याची व कोणतेही स्तंभ रिकामे न ठेवल्याची (कर्ज घेण्यासाठी लागु नसलेले किंवा ठनिलʆ माहिती भरावयाचे स्तंभाकडेही योग्य लक्ष द्यावे) खात्री करुन घ्यावी. ईसीबी पॅरामीटर्स मधील बदल - मग ते प्राधिकृत डीलर वर्ग 1 बँकांच्या मंजुरीसह स्वयंचलित मार्गाखालील असोत किंवा आरबीआयच्या पूर्व मंजुरीसह मंजुरी मार्गाखालील असोत - देखील सुधारित फॉर्म ईसीबी मार्फत, लवकरात लवकर व कोणत्याही परिस्थितीत, बदल केल्यापासून 7 दिवसांच्या आत डीएसआयएमला कळविण्यात यावेत. सुधारित फॉर्म ईसीबी सादर करताना सोबतच्या पत्रात, केलेले बदल खासकरुन निर्देशित केले जावेत. एखाद्या ईसीबीसाठीच्या फॉर्म ईसीबीबाबतच्या रिपोर्टिंग मार्गदर्शक तत्वांचे पालन न केले गेल्यास, त्यासाठी फेमाखाली दंडात्मक कारवाई केली जाईल.

(37) एखाद्या ईसीबीचे प्रत्यक्ष व्यवहार आरबीआयला कसे कळविले जातात?

आरबीआयने कळविलेल्या नियतकालिकतेनुसार, कर्जदारांनी प्रत्यक्षातील ईसीबी व्यवहार, संपूर्णपणे व बिनचुकपणे, प्रमाणित केलेल्या फॉर्म ईसीबी 2 द्वारे, प्राधिकृत डीलर वर्ग 1 बँकेमार्फत, डीएसआयएमला कळविणे आवश्यक आहे. फॉर्म ईसीबी 2 मधील कोणतेही स्तंभ रिकामे ठेवले जाऊ नयेत (त्या कर्जासाठी लागु नसलेले स्तंभ किंवा ज्यांच्याबाबत निल माहिती द्यावयाची आहे अशा स्तंभांकडेही लक्ष द्यावे). हा फॉर्म ईसीबी 2 संबंधित महिना समाप्त झाल्यापासून सात कामकाजांच्या दिवसांच्या आत डीएसआयएमकडे पोहोचला पाहिजे. ईसीबी पॅरामीटर्समध्ये बदल असल्यास तेही ईसीबी 2 फॉर्म मध्ये सुयोग्यतेने समाविष्ट करावेत. फॉर्म ईसीबी 2 बाबतच्या रिपोर्टिंग मार्गदर्शक तत्वांचे, रिपोर्टिंगच्या नियतकालिकतेसह अनुपालन केले न गेल्यास, त्यासाठी फेमाखाली दंडात्मक कारवाई लागु होईल.

(38) नवीन ईसीबी साचाच्या दृष्टिकोनातून कर्जदाराने सुधारित फॉर्म ईसीबी दाखल करणे आवश्यक आहे काय?

नाही. ईसीबीच्या अटी व शर्तींमध्ये कोणतेही बदल केलेले नसल्यास, सुधारित फॉर्म ईसीबी (पूर्वीचा फॉर्म 83) सादर करणे गरजेचे नाही.

(39) जुन्या ईसीबी 2 रिर्टन्ससाठीही एलएसएफ लागु आहे काय?

नाही. फेब्रुवारी 2019 पासून सादर केलेल्या ईसीबी 2 रिर्टन्सना एलएसएफ तरतुदी लागु असतील, म्हणजे, जानेवारी 2019 ह्या महिन्यात केलेल्या व्यवहारांसाठी फेब्रुआरी महिन्यात सादर केलेला ईसीबी 2.

(40) प्रत्येक फॉर्म ईसीबी 2 आणि निल रिर्टन्स साठीही एलएसएफ लागु आहे काय?

होय. प्रत्येक फॉर्म ईसीबी 2 व निल रिर्टन्स सादर न केल्यास एलएसएफ लागु आहे.

(के) संकीर्ण

(41) विद्यमान नॉर्म्स खाली ईसीबीवर उपवर्जित झालेले व्याज इक्विटीमध्ये रुपांतरित करता येऊ शकते काय?

होय. विद्यमान नॉर्म्सनुसार, ईसीबी भांडवल व व्याज ह्यांचे इक्विटीमध्ये रुपांतरण करण्यास, ‘बाह्य वाणिज्य कर्जे, ट्रेड क्रेडिट्स व स्ट्रक्चर्ड ऑब्लिगेशन्स’ वरील मार्च 26, 2019 च्या महानिर्देश क्र.5 च्या परिच्छेद 7.4 खाली दिलेल्या लागु असलेल्या अटींवर परवानगी आहे.

(42) ईसीबीचे इक्विटीमध्ये अंशात्मक रुपांतरण केल्यास, उर्वरित ईसीबी रकमेने सर्व ईसीबी मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे काय?

होय. ईसीबी म्हणून उरलेली रक्कम लागु असलेल्या सर्व ईसीबी नॉर्म्सचे पालन करत असल्यासच, ईसीबीचे इक्विटीमध्ये अंशत: रुपांतरण करण्यास परवानगी दिली जाईल.

(43) ईसीबीच्या उत्पन्नातून निर्माण केलेल्या व वापरण्यात न आलेल्या स्थिर ठेवी, परवानगीप्राप्त कमाल कालावधी पूर्ण झाल्यावर नूतनीकृत केल्या जाऊ शकतात काय?

नाही.

विभाग 2 : व्यापारी कर्जे (टीसी)

(44) विदेशातील धनकोंकडून विदेशी मुद्रेमध्ये लघु मुदतीचे व्यापारी अर्थसहाय्य मिळविण्यासाठी, एडी बँकांकडून, त्यांच्या ग्राहकांच्या वतीने एसएलबीसी दिले जाऊ शकते काय?

विदेशातील धनकोंकडून विदेशी मुद्रेमध्ये लघु मुदतीचे व्यापारी अर्थसहाय्य मिळविण्यासाठी, एडी बँकांकडून, त्यांच्या ग्राहकांच्या वतीने एसएलबीसी देऊ शकतात. मात्र त्यासाठी, “हमी व सह स्वीकार” ह्यावरील वेळोवेळी सुधारित केलेले, बँकिंग रेग्युलेशन विभागाचे महपरिपत्रक क्र. डीबीआर.क्र.बीसी.11/13.03.00/2015-16 दि जुलै 1, 2015 मध्ये दिलेल्या तरतुदींचे पालन अशा एसएलबीसींनी केले असले पाहिजे.

(45) नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, एडी बँकांनी लागु असलेल्या कार्यरीतीनुसार, विलंबित आयात ड्युज चे समायोजन करण्यासाठी दिलेल्या परवानग्या कळविणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे, त्याच धर्तीवर रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयाकडूनही, विलंबित आयात ड्युज चे समायोजन करण्यासाठी दिल्या गेलेल्या परवानग्या कळविणे एडी बँकेसाठी आवश्यक आहे. हे अनिवार्य रिपोर्टिंग, भांडवली नसलेल्या/ भांडवली असलेल्या मालंसाठी दिलेल्या अनुक्रमे एक वर्ष/तीन वर्षे मुदतवाढींसाठी मंजुरींसाठीच आहे काय?

मुदत वाढीचा कितीही विस्तार मागण्यात आला असला तरीही, एडी बँका / रिझर्व्ह बँकेची प्रादेशिक कार्यालये ह्यांनी, विलंबित आयात ड्युज चे समायोजन करण्यासाठीच्या सर्व परवानग्या एडी बँकांनी कळविणे आवश्यक आहे.

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��