क्र.1 एनबीएफसी - पी2पी निर्देश 2017 च्या परिच्छेद 4 (1)(4) मध्ये निर्देशित केलेल्या ‘व्यक्ती’ ह्या शब्दाचा अर्थ काय ? यात बँका / एनबीएफसींचा समावेश असेल ?
उत्तर :- वरील निर्देशांच्या परिच्छेद 4 (4) साठी, ‘व्यक्ती’ ह्या संज्ञेमध्ये, एक व्यक्ती, व्यक्तींची एक संस्था, एक एचयुएफ, एक कंपनी, एक सोसायटी किंवा कृत्रिम संस्था समाविष्ट आहे मग ती सुसंस्थापित (कॉर्पोरेटेड) असो अथवा नसो.
क्र.2 - बँकांसाठी आणि किंवा एनबीएफसींसाठी थेट सेवा एजंट्स (डीएसए) म्हणून काम करणारे इलेक्ट्रॉनिक मंच, एनबीएफसी-पी2पी निर्देशांच्या टप्प्यामध्ये येतात काय ?
उत्तर :- केवळ बँका, एनबीएफसी व इतर नियमन केलेले एआयएफआय ह्यांना मदत करणारे इलेक्ट्रॉनिक मंच ह्यांना पी2पी मंचांची वागणुक दिली जात नाही. तथापि, बँका किंवा एनबीएफसी किंवा एआयएफआय सोडून, इतर रिटेल धनको हा मंच कर्ज देण्यासाठी वापरत असल्यास त्या मंचाला एक एनबीएफसी-पी2पी म्हणून वेगळ्याने पंजीकरण करणे आवश्यक आहे.
क्र.3 :- एनबीएफसी-पी2पी कर्जदारी मंचाच्या बाबतीत ‘लिव्हरेज’ची व्याख्या कशी केली जाते ?
उत्तर :- लिव्हरेज रेशोचा संदर्भ/संबंध, एखाद्या एनबीएफसी-पी2पी मंचाच्या ताळेबंदावरील त्या उभ्या करु शकत असलेल्या बाहेरील उत्तरदायित्व(लायबिलिटीज) भागिले तिचा निधी ह्याच्याशी असतो. हा मंच वापरुन, ग्राहकांचा निधी कर्जाऊ देऊन/उधार घेऊन मिळविलेला/दिलेला निधी ह्या मंचावर बाहेरील जबाबदारी समजला जात नाही.
क्र.4 :- निवेशक्षम निधी म्हणजे काय ?
उत्तर :- निवेशक्षम फंडाचा संदर्भ व्यवसाय-धंद्यात गुंतविलेला निधी व एनबीएफसी पी2पीच्या व्यवसायातून निर्माण झालेला अतिरिक्त निधी ह्याच्याशी असतो. एसक्रो खात्यांमधून येणा-या, धनको व ऋणकोंचा निधी ह्यात समाविष्ट नाही. ह्या मंचाचा वापर करुन ग्राहकांचा निधी कर्जाऊ देणे/उधार घेणे, ह्यासाठी हा मंच वापरला जाऊ शकत नाही.
क्र.5 :- एनबीएफसी-पी2पी चे पंजीकरण करणा-या अर्जदारांना, अर्ज करतेवेळीच रु.2 कोटींचा एनओएफ असणे आवश्यक आहे काय ?
उत्तर :- अर्जदाराने प्रायोजकांची यादी व किमान रु.2 कोटींच्या भांडवलासाठीचे निधी - स्त्रोत देणे आवश्यक आहे. सीओआर दिले जाण्यापूर्वी हे भांडवल प्रत्यक्ष जमा केलेले असावे. ह्या इंटर-रेग्नममध्ये प्रायोजकांमध्ये कोणताही बदल करण्यास परवानगी नाही.
क्र.6 :- विद्यमान असलेली एनबीएफसी, एनबीएफसी-पी2पी म्हणून काम करु शकेल काय ?
उत्तर :- नाही. |