आरबीआय/2013-14/450
डीसीएम(सीसी)क्र. जी-16/03.39.01/2013-14
जानेवारी 13, 2014
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/
मुख्य कार्यकारी अधिकारी/
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबींसह),
युसीबी, राज्य सहकारी बँका व जिल्हा केंद्रीय सहकारी बँका महोदय/महोदया,
बँक नोटा व नाण्यांचे वितरण प्रलोभने व दंड ह्यांचे पुनरावलोकन
कृपया, आमचे परिपत्रक डीसीएम(सीसी)क्र.जी-10/03.39.01/2013-14 दि. ऑगस्ट 12, 2013 चा संदर्भ घ्यावा. त्यात आम्ही, आरआरबी व युसीबींसाठी नोट सॉर्टिंग मशीन्स (एनएसएम) स्थापन करण्याबाबतच्या प्रलोभनांची भरपाई, नागरी/महानगरी क्षेत्रात स्थापन करण्याच्या खर्चाच्या 50% आणि अर्ध नागरी/ग्रामीण क्षेत्रात 75% एवढी विस्तारित केली होती.
(2) पुनरावलोकन केल्यानंतर, नोट सॉर्टिंग मशीन्स (एनएसएम) स्थापन करण्यासाठीचे प्रलोभन, सर्व राज्य सहकारी बँका व जिल्हा केंद्रीय सहकारी बँकांनाही देण्याचे ठरविले आहे.
(3) हा बदल ताबडतोब जारी केला जाईल. जुलै 01, 2013 च्या आमच्या महापरिपत्रकात दिलेल्या, कॉईंन व्हेंडिंग मशीन्सची स्थापना करण्याबाबतच्या भरपाईसह असलेल्या इतर सर्व सूचना, एनएसएमसह, सर्व मशीन्ससाठी लागु होतील.
(4) कृपया पोच द्यावी.
आपला,
(बी.पी. विजयेंद्र)
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक |