आरबीआय/2013-14/453
डीबीओडी.बीपी.बीसी क्र.86/21.01.023/2013-14
जानेवारी 20, 2014
सर्व अधिसूचित वाणिज्य बँका
(आरआरबी सोडून)
महोदय,
सुवर्ण अलंकार ठेवून कर्ज देणे
वैद्यकीय खर्च व आकस्मिक जबाबदा-या पूर्ण करण्यासाठी सुवर्ण अलंकार ठेवून अग्रिम राशी वरील आमचे परिपत्रक डीबीओडी.बीसी क्र.138/21.01.023/94, दि. 22 नोव्हेंबर 1994 चा कृपया संदर्भ घ्यावा. त्यात बँकांना सांगण्यात आले होते की, सुवर्ण अलंकार व जडजवाहीर ह्यांच्याविरुध्द अग्रिम राशी मंजुर करतेवेळी त्यांनी, आवश्यक त्या व नेहमीच्या सावधानता ठेवण्यात आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या मंजुरीने ह्याबाबत एक सुयोग्य धोरण तयार करावे.
(2) एक प्रुडेंशियल उपाय म्हणून, सुवर्ण अलंकारांविरुध्द बँकांनी दिलेल्या कर्जांच्या (सुवर्ण अलंकारांच्या गहाणवटी विरुध्दच्या बुलेट रिपेमेंटसह) 75 टक्क्यांपेक्षा अधिक नसलेला कर्ज#मूल्य रेशो (एलटीव्ही) विहित करण्याचे ठरविण्यात आले आहे. ह्यासाठी ह्यापुढे, बँकांनी मंजुर केलेली कर्जे, सुवर्णालंकार व जडजवाहिराच्या मूल्याच्या 75 टक्क्यांपेक्षा अधिक असू नयेत.
(3) असे मूल्यांकन प्रमाणभूत करण्यासाठी आणि कर्जदाराला व्यवहार पारदर्शक करण्यासाठी असे ठरविण्यात आले आहे की, प्रतिभूती/तारण म्हणून स्वीकारलेल्या सुवर्ण अलंकारांचे मूल्यांकन, इंडिया बुलियन ऍंड ज्युवेलर्स असोशिएशन लि. (पूर्वीचे बाँबे बुलियन असोशिएशन लि. (बीबीए)) ने घोषित केलेल्या, 22 कॅरट सोन्याच्या, मागील 30 दिवसांच्या बंद भावाच्या सरासरी किंमतीनुसार केले जावे. ते सोने 22 कॅरटपेक्षा कमी शुध्दतेचे असल्यास, बँकांनी त्या तारणाचे रुपांतर 22 कॅरटच्या स्वरुपात करुन त्या तारणाच्या अचूक वजनाचे मूल्य काढावे. दुस-या शब्दात, कमी शुध्दतेच्या अलंकाराचे मूल्यांकन त्या प्रमाणात केले जावे.
(4) येथे पुनश्च सांगण्यात येत आहे की, बँकांनी आवश्यक व नेहमीच्या सावधानता ठेवाव्यात आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या मंजुरीने, सुवर्ण अलंकारांविरुध्द कर्ज देण्यासाठी एक सुयोग्य धोरण तयार करावे.
आपला
(राजेश वर्मा)
मुख्य महाव्यवस्थापक |