आरबीआय/2013-14/526
डीजीबीए.सीडीडी.क्र.5342/15.02.001/2013-14
मार्च 21, 2014
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक / व्यवस्थापकीय संचालक,
मुख्य कार्यालय, सरकारी लेखा विभाग - भारतीय स्टेट बँक / स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपुर /
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद / स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पतियाला / स्टेट बँक ऑफ त्रावणकोर,
आंध्र बँक / अलाहाबाद बँक / बँक ऑफ बडोदा / बँक ऑफ इंडिया / बँक ऑफ महाराष्ट्र /
कॅनरा बँक / सेंट्रल बँक ऑफ इंडिया / कॉर्पोरेशन बँक / देना बँक / इंडियन बँक / इंडियन ओव्हरसीज बँक /
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स / पंजाब नॅशनल बँक / पंजाब अँड सिंध बँक / सिंडिकेट बँक / युकोबँक /
युनियन बँक ऑफ इंडिया / युनायटेड बँक ऑफ इंडिया / विजया बँक/आयडीबीआय बँक लि. /
आयसीआयसीआय बँक लि.
महोदय/महोदया,
सार्वजनिक भविष्यनिधी योजना, 1968 (पीपीएफ स्कीम, 1968) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना, 2004 (एससीएसएस, 2004) - व्याजदरांमध्ये सुधारणा
कृपया, लघु बचत योजनेवरील आमचे परिपत्रक आरबीआय/2011-12/359 दि. जानेवारी 20, 2012 चा संदर्भ घ्यावा. त्यात सांगण्यात आले होते की, लघु बचत योजनांवरील व्याजदरांवरील सरकारच्या निर्णयानुसार, प्रत्येक वित्तीय वर्षासाठीच्या निरनिराळ्या लघु बचत योजनांवरील व्याजदर, त्या वर्षाच्या 1 एप्रिल पूर्वी सरकारकडून अधिसूचित केले जातील
आता भारत सरकारने, त्यांच्या ऑफिस मेमोरँडम (ओएम) क्र. 6-1/2011-12 एनएस-2 दि. 4 मार्च 2014 अन्वये, वित्तीय वर्ष 2014-15 साठीचे, निरनिराळ्या लघुबचत योजनांवरील व्याजदर कळविले आहेत. त्यानुसार, 2014-15 ह्या वित्तीय वर्षासाठी 1 एप्रिल 2014 पासून, पीपीएफ 1968 व एससीएसएस 2004 वरील व्याजदर, चक्रवाढ व्याजाने/त्या योजनांमध्ये अंतर्भूत प्रदानांनुसार पुढीलप्रमाणे असतील :
योजना |
1.4.2013 पासून लागु व्याजदर |
1.4.2014 पासून लागु व्याजदर |
5 वर्षे एससीएसएस, 2004 |
द.सा. 9.2% |
द.सा. 9.2% |
पीपीएफ, 1968 |
द.सा. 8.7% |
द.सा. 8.7% |
ह्या परिपत्रकातील मजकुर, पीपीएफ 1968 व एससीएसएस 2004 योजना राबविणा-या आपल्या बँक शाखांच्या नजरेस आणावा. त्याचप्रमाणे, पीपीएफ 1968, व एससीएसएस, 2004 च्या वर्गणीदारांच्या माहितीसाठी, तो आपल्या शाखांच्या नोटिस बोर्डांवरही प्रदर्शित केला जावा
आपला,
(श्रीकांत हमीये)
व्यवस्थापक
|