आरबीआय/2013-14/636
युबीडी.बीपीडी(पीसीबी) सीआयआर.क्र.69/14.01.062/2013-14
जून 10, 2014
मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व प्राथमिक (नागरी) सहकारी बँका
महोदय/महोदया,
तुमचा ग्राहक जाणा(केवायसी)/मापदंड/ऍंटी-मनी-लाँडरिंग (एएमएल) मानके/वित्तीय दहशतवादाचा सामना करणे (सीएफटी)/प्रिव्हेंशन ऑफ ऍंटी-मनी-लाँडरिंग अधिनियम (पीएमएलए) 2002 खाली बँकांचे दायित्व पत्त्याबाबतच्या पुराव्यावरील स्पष्टीकरण प्राथमिक (नागरी) सहकारी बँका (युसीबीस्)
व्यक्तींद्वारे बँक खाते उघडतेवेळी पत्त्याबाबतचा पुरावा च्या संबंधाने, युबीडी.बीपीडी (पीसीबी) एमसी.क्र. 16/ 12.05. 001/2013-14 दि. जुलै 1, 2013 द्वारा देण्यात आलेल्या, तुमचा ग्राहक जागा (केवायसी)/मापदंड/ऍंटी-मनी-लाँडरिंग (एएमएल) मानके/वित्तीय दहशतवादाचा सामना करणे (सीएफटी)/प्रिव्हेंशन ऑफ ऍंटी-मनी-लाँडरिंग अधिनियम (पीएमएलए) 2002 खाली बँकांचे दायित्व वरील भारतीय रिझर्व बँकेच्या, महापरिपत्रकाच्या, परिच्छेद 2.4(ई), परिच्छेद 2.5 (7) (अ व ब) आणि (9), आणि जोडपत्र 1 चा कृपया संदर्भ घ्यावा.
(2) निरनिराळया प्रवर्गामधून, विशेषतः, स्थलांतरित कामगार, बदली झालेले कर्मचारी इ. ह्यांच्याकडून बँक खाते उघडतेवेळी विद्यमान/कायम पत्त्यासंबंधाने पुरावा सादर करण्यासाठी येणा-या अडचणी रिझर्व बँकेकडे कळविल्या जात आहेत. प्रिव्हेंशन ऑफ मनी-लाँडरिंग रुल्स (मेंटेनन्स ऑफ रेकॉर्डस), 2005 ची दुरुस्ती विचारात घेऊन ह्या बाबीचे परीक्षण केले गेले असून, पत्त्याबाबतचा पुरावा सादर करण्याची आवश्यकता पुढीलप्रमाणे सुलभ करण्याचे ठरविण्यात आले आहे.
(अ) ह्यापुढे, बँक खाते उघडतेवेळी किंवा ते नियतकालिक अद्यावत करतेवेळी, पत्त्याचा पुरावा म्हणून, ग्राहक केवळ एकच कागदपत्र सादर करु शकतात. पत्त्याचा पुरावा मध्ये निर्देशित केलेल्या पत्त्यामध्ये बदल झाल्यास, सहा महिन्याच्या आत, बँकेला नवीन पत्त्याचा पुरावा सादर केला जावा.
(ब) ग्राहकाने सादर केलेला पत्त्याचा पुरावा हा स्थानिक पत्ता नसल्यास किंवा ग्राहक सध्या राहत नसलेला पत्ता असल्यास, ग्राहकाबरोबर सर्व पत्रव्यवहार करता येईल. अशा स्थानिक पत्त्याबाबतचे घोषणापत्र, युसीबींनी ग्राहकाकडून घ्यावे. पत्रव्यवहारासाठी अशा पत्त्याबाबत कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नाही. अशा पत्त्याचे सत्यांकन बँका, (1) पत्रे, चेकबुके, एटीएम कार्ड ह्यांची पोचपावती (2) फोनवरुन संभाषण (3) भेट देणे ह्यासारख्या सकारात्मक दुजो-या ने करु शकतात. जागा बदलल्यामुळे किंवा अन्य कारणांनी ह्या पत्त्यातही बदल झाल्यास, ग्राहक, अशा बदल झाल्यानंतर दोन आठवडयांच्या आत पत्रव्यवहारासाठी असलेला नवीन पत्ता, युसीबींना कळवू शकतात.
(3) प्रधान अधिका-याने ह्या अधिसूचनेची पोच आमच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाकडे द्यावी.
आपला
(पी. के. अरोरा)
महाव्यवस्थापक.
|