आरबीआय/2015-16/168
डीपीएसएस(सीओ)आरटीजीएस क्र. 492/04.04.002/2015-16
सप्टेंबर 1, 2015
आरटीजीएसमध्ये भाग घेणा-या बँकांचे अध्यक्ष/
व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
महोदय/महोदया,
आरटीजीएसच्या टाईम विंडोमधील बदल
कृपया, भारतीय रिझर्व बँकेने, ऑगस्ट 28, 2015 रोजी दिलेल्या, ‘सप्टेंबर 1, 2015 पासून दुस-या व चैाथ्या शनिवारी बँकांची रजा :- कामकाजाच्या शनिवारीही आरबीआय तिच्या आधार-सेवा देणार’ ह्यावरील, वृत्तपत्र निवेदन क्र. 2015-2016/528 चा संदर्भ घ्यावा.
(2) त्यानुसार, दुस-या व चैाथ्या शनिवारी, संपूर्ण दिवस, आरटीजीएस कार्यान्वित असणार नाही, परंतु कामकाजाच्या शनिवारी ती संपूर्ण दिवस कार्यान्वित असेल. दुस-या व चैाथ्या शनिवारी मूल्याधिष्ठित तारीख असलेल्या भविष्यातील/भावी मूल्याधिष्ठित तारखेने व्यवहारांची प्रक्रिया आरटीजीएसखाली केली जाणार नाही.
(3) 1 सप्टेंबर, 2015 पासून जारी होणारी आरटीजीएस टाईम-विंडो खालीलप्रमाणे असेल.
अनुक्रमांक |
टाईम इव्हेंट |
दुसरा व चैाथा शनिवार सोडून शनिवारांसह नित्यनियमित दिवस |
(1) |
व्यवहारासाठी खुली |
सकाळी 08.00 वाजता |
(2) |
सुरुवातीचा कट ऑफ (ग्राहकांचे व्यवहार) |
दुपारी 4.30 |
(3) |
अंतिम कट ऑफ (आंतर बँकीय व्यवहार) |
संध्याकाळी 7.45 |
(4 |
आयडीएल रिव्हर्सल |
संध्याकाळी 7.45 ते 8.00. |
(5) |
दिवसाची समाप्ती |
संध्याकाळी 8.00. |
(4) हे परिपत्रक, प्रदान व तडजोड प्रणाली अधिनियम, 2007 च्या, कलम 10(2) खाली देण्यात येत आहे.
(5) कृपया पोच द्यावी.
आपली
नीलिमा रामटेके
महाव्यवस्थापक |