आरबीआय/2015-16/194
डीबीआर क्र. आरईटी बीसी.42/12.01.001/2015-16
सप्टेंबर 29, 2015
अध्यक्ष/सीईओ - सर्व अनुसूचित वाणिज्य बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/सर्व प्राथमिक (नागरी) सहकारी बँका/राज्य केंद्रीय सहकारी बँका (एसटीसीबी/सीसीबी)
महोदय/महोदया,
बँक दरामधील बदल
कृपया वरील विषयावरील आमची परिपत्रके, डीबीआर क्र आरईटी बीसी.99/12.01.001/2014-15, दिनांक जून 2, 2015 आणि डीसीबीआर बीपीडी.(पीसीबी/आरसीबी) सीआयआर क्र.37/16.11.00/2014-15, दिनांक जून 2, 2015 चा संदर्भ घ्यावा.
(2) चैाथे द्वैमासिक नाणेविषयक धोरण 2015-16, दिनांक सप्टेंबर 29, 2015 यात घोषित केल्यानुसार बँकांचा दर, सप्टेंबर 29, 2015 पासून, 50 बेसिस पॉईंट्सने कमी (तडजोडित) केला जाऊन 8.25 टक्क्यांपासून 7.75 टक्के करण्यात आला आहे.
(3) राखीव निधी-आवश्यकतांमधील कमतरतेसाठीचे सर्व दंडात्मक व्याजदर (जे बँकदराशीच जोडलेले असतात) देखील जोडपत्रात दिल्यानुसार सुधारित केले आहेत.
आपली
(लिली वढेरा)
मुख्य महाव्यवस्थापक
सोबत : वरीलप्रमाणे
जोडपत्र
बँकदराशी जोडलेले दंडात्मक व्याजदर
बाब |
विद्यमान दर |
सुधारित दर
(सप्टेंबर 29, 2015 पासून) |
राखीव निधी आवश्यकतांमधील तुटीसाठीचे दंडात्मक व्याजदर (तुटीच्या कालावधीवर अवलंबून) |
बँकदर, अधिक 3.0 प्रतिशत पॉईंट्स (11.25 टक्के) किंवा बँकदर, अधिक 5.0 प्रतिशत पॉईंट्स (13.25 टक्के) |
बँकदर अधिक 3.0 प्रतिशत पॉईंट्स (10.75 टक्के) किंवा बँकदर अधिक 5.0 प्रतिशत पॉईंट्स (12.75 टक्के) |
|