आरबीआय/2015-16/383
आरइएफ.डीबीएस.सीओ.पीपीडी.बीसी.क्र.10/11.01.005/2015-16
एप्रिल 28, 2016
अध्यक्ष/मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी सोडून)
महोदय/महोदया,
जिलानी समितीच्या शिफारशींचे अनुपालन
बँकांमधील फसवणुकी व गैरव्यवहार ह्यावरील जिलानी समितीच्या शिफारशींवरील आमचे परिपत्रक डीबीएस.सीओ.पीपीडी.बीसी.क्र.39/11.01.005/99-2000 दिनांक जून 28, 2000 कडे आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो. तसेच संचालक मंडळाची लेखापरीक्षण समिती (एसीबी) कॅलेंडर ऑफ रिव्ह्युज वरील आमचे परिपत्रक डीबीएस.एआरएस.बीसी.क्र.4/08.91.020/2010-11 दिनांक नोव्हेंबर 10, 2010 कडेही आपले लक्ष वेधण्यात येत आहे. ह्या परिपत्रकानुसार, जिलानी समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची (स्थिती) स्तर, संचालक मंडळाच्या लेखा परिक्षण समितीला सादर करणे आवश्यक आहे.
2. निरनिराळ्या बँकांमधील, ह्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या स्तराचा आढावा घेतल्यावर असे ठरविण्यात आले आहे की, ह्यापुढे/ह्यानंतर, जिलानी समितीच्या शिफारशींच्या अनुपालनाचा अहवाल एसीबीकडे पाठविण्याची आवश्यकता नाही. तथापि, बँकांनी पुढील गोष्टींची खात्री करुन घेणे आवश्यक आहे.
(1) ह्या शिफारशींचे पूर्णपणे अनुपालन करण्यात आले आहे आणि त्यात सातत्य ठेवण्यात येत आहे,
(2) बँकांच्या अंतर्गत तपासणी/लेखापरीक्षण प्रक्रियेमध्ये, ह्या शिफारशी सुयोग्यपणे समाविष्ट केल्या गेल्या असून, त्या त्यांच्या पुस्तिकेत (मॅन्युअल)/सूचनांमध्ये लेखी स्वरुपात ठेवण्यात आल्या आहेत.
आपली
(पार्वथी व्ही सुंदरम)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक |