आरबीआय/2015-2016/413
डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र./2895/02.10.002/2015-2016
मे 26, 2016
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व अनुसूचित वाणिक्य बँका आरआरबींसह/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका/जिल्हा केंद्रीय सहकारी बँका/प्राधिकृत एटीएम नेटवर्क ऑपरेटर्स/कार्ड पेमेंट नेटवर्क ऑपरेटर्स/व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स
महोदय/महोदया,
एटीएम्स - कार्ड प्रेझेंट (सीपी) व्यवहारांसाठी सुरक्षा व जोखीम कमी करण्याचे उपाय
मॅग्नेटिक स्ट्राईपकार्ड्स ऐवजी ईएमव्ही चिप व पीआयएन आधारित कार्डे देण्याबाबतच्या कालबंधनाबाबत बँकांना ज्यात सांगण्यात आले असलेली आमची परिपत्रके आरबीआय/2014-15/589 व डीपीएसएस (सीओ) पीडी. सीओ. क्र.2112 / 02.14.003 / 2014-2015 दि. मे 7, 2015 व आरबीआय /2015-16/163 डीपीएसएस (सीओ) पीडी. क्र.448/02.14.003/2015-16 दि. ऑगस्ट 27, 2015 चा कृपया संदर्भ घ्यावा.
(2) ह्या देशामधील पीओएस टर्मिनल सोयी, ईएमव्ही चिप व पीआयएन कार्डे स्वीकारण्यास व प्रक्रिया करण्यास सक्षम करण्यात आली असली तरीही, सरसकट विचार करता, एटीएमची रचना/साचा मात्र मॅग्नेटिक स्ट्राईपवरील डेटावर आधारित कार्ड व्यवहार करणे सुरुच ठेवत असल्याचे दिसत आहे. ह्यामुळे ही कार्डे ईएमव्ही चिप व पिन आधारित असूनही, एटीएम कार्ड व्यवहार, स्किमिंग, क्लोनिंग इत्यादि फसवणुकीचे प्रकार करुन केले जाऊ शकतात. ह्यासाठी, ईएमव्ही चिप व चिपवर आधारित कार्ड स्वीकार व प्रक्रिया एटीएम्समध्येही असणे अत्यावश्यक/अपरिहार्य आहे. ईएमव्ही चिप व पिन कार्डांची, एटीएममध्ये, काँटॅक्ट चिप प्रक्रिया केली गेल्याने, एटीएममधील व्यवहारांची केवळ सुरक्षितता व सुरक्षाच वाढविणार नाही, तर एटीएम व्यवहारांसाठी प्रायोजित केलेल्या ‘ईएमव्ही लायाबिलिटी शिफ्ट’ बाबत, ही प्रणाली अस्तित्वात येईपर्यंत, बँकांना त्यासाठी तयार राहण्यास मदत करील.
(3) भारतामधील बँका व व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स ह्यांना ह्यासाठी सांगण्यात येत आहे की, त्यांच्याद्वारे स्थापन करण्यात आलेली/चालविण्यात येणारी सर्व विद्यमान एटीएम केंद्रे, ईएमव्ही चिप व पिन कार्डांची प्रक्रिया करण्यास, सप्टेंबर 30, 2017 पर्यंत सक्षम केली जातील ह्याची खात्री करुन घ्यावी. सर्व नवीन एटीएम केंद्रे, कोणत्याही परिस्थितीत सुरुवातीपासूनच, ईएमव्ही चिप व पिन प्रक्रियेबाबत सक्षम केलेली असावीत. एटीएम व्यवहारांचे बदल (स्विपिंग) समाशोधन (क्लियरिंग) व समायोजन करण्यासाठी, बँका त्यांच्या संचालक मंडळाच्या मंजुरीने कोणत्याही प्राधिकृत एटीएम/कार्ड नेटवर्क उपलब्ध करणाराशी हातमिळवणी करु शकतात.
(4) ह्याशिवाय, कार्ड प्रदान प्रणाली मध्ये एकसमानता आणण्यासाठी, कार्ड-आधारित प्रदाने हाताळण्यास सक्षम असलेल्या त्यांच्या मायक्रो-एटीएममध्ये देखील वरील आवश्यकतांची अंमलबजावणी बँका करु शकतात.
(5) ह्याबाबतचा तिमाही अहवाल, सोबत दिलेल्या नमुन्यात जून/सप्टेंबर/डिसेंबर/मार्च मध्ये संपणा-या तिमाहींसाठी, तिमाही संपल्यानंतरच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत, मुख्य महाव्यवस्थापक, भारतीय रिझर्व बँक, प्रदान व समायोजन विभाग, केंद्रीय कार्यालय, मुंबई ह्यांच्याकडे पाठविला जावा.
(6) हे निदेश, प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम 2007 (2007 चा 51) च्या कलम 18 सह वाचित, कलम 10(2) खाली देण्यात येत आहे.
आपली,
(नंदा एस. दवे)
मुख्य महाव्यवस्थापक
एटीएम वरील ईएमव्ही चिप व पिन प्रक्रियेवरील अहवाल
बँक/डब्ल्युएलचे नाव : _________________________________________________
_______________________________________रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचा अहवाल.
बँकेने स्थापन केलेल्या एटीएम्सची एकूण संख्या |
तिमाहीत, ईएमव्ही चिप व पिन प्रक्रियेसाठी सक्षम केलेले एटीएम्स |
तिमाहीच्या अखेरीस, ईएमव्ही चिप व पिन प्रक्रियेसाठी सक्षम केलेल्या एटीएम्सची संख्या |
|
|
|
|
|
|
|