आरबीआय/2016-17/6
डीजीबीए.जीएडी.13/15.02.005/2016-17
जुलै 7, 2016
अध्यक्ष/मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक भविष्यनिधी,
किसान विकास पत्र - 2014, सुकन्या समृध्दी अकाऊंट,
ज्येष्ठ नागरिक बचत योजना हाताळणा-या एजन्सी बँका
लघु बचत योजनांसाठी व्याज दरातील सुधारणा
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीजीबीए.जीएडी.3175/15.02.005/2015-16 दिनांक एप्रिल 7, 2016 चा संदर्भ घ्यावा. भारत सरकारने, 2016-17 सालासाठीच्या आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीसाठी, त्यांचे कार्यालयीन पत्र (ओएम) क्र..एफ.क्र.1/04/2016 –एनएस II दिनांक जून 20, 2016 अन्वये, निरनिराळ्या लघु बचत योजनांवरील व्याज दर सुधारित केला आहे (सोबत प्रत जोडली आहे).
(2) ह्या परिपत्रकावरील मजकुर, सरकारी लघु बचत योजना चालवीत असलेल्या, आपल्या बँकेच्या शाखांना आवश्यक ती कारवाई करण्यासाठी नजरेस आणला जावा. ह्या योजनांच्या वर्गणीदारांच्या/सभासदांच्या माहितीसाठी हा मजकुर आपल्या शाखांच्या नोटिस बोर्डांवरही प्रदर्शित करावा.
आपला
(व्ही.एस.प्राजिश)
सहाय्यक महाव्यवस्थापक
सोबत (वरील प्रमाणे) |