आरबीआय/2016-17/40
एफआयडीडी.एफएलसी.बीसी.क्र.12/12.01.018/2016-17
ऑगस्ट 25, 2016
अध्यक्ष/एमडी/सीईओ,
अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबीसह)
महोदय/महोदया,
वित्तीय साक्षरता केंद्रे - अहवालाचा सुधारित नमुना
कृपया, वित्तीय साक्षरता केंद्रे (एफएलसी) - सुधारित मार्गदर्शक तत्वे वरील आमचे परिपत्रक एफआयडीडी.एफएलसी.बीसी.क्र.18/12.01.018/2015-16 दिनांक, जानेवारी 14, 2016 चा संदर्भ घ्यावा. त्यासोबत, एफएलसी व बँकांच्या ग्रामीण शाखा ह्यांच्यासाठी अहवाल पाठविण्याची यंत्रणा(जोडपत्र 3 - भाग अ, ब व क) देण्यात आली आहे.
ह्या बाबतीत, अहवाल पाठविण्याचा नमुना जोडपत्रानुसार (भाग अ, ब, क आणि ड) बदलण्याचे ठरविण्यात आले आहे. मार्गदर्शनासाठी ह्या नमुन्यात, नमुना एंट्रीज करण्यात आल्या आहेत. सप्टेंबर 2016 अखेरीस संपलेल्या तिमाहीपासून, त्या तिमाहीची समाप्ती झाल्याच्या 20 दिवसांच्या आत, एसएलबीसी/युटीएलबीसी, सोबत दिलेली एक्सेल शीट, तिमाही धर्तीवर, आरबीआयच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाकडे सादर करतील.
आपला
(ए.उदगाता)
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक
सोबत - वरील प्रमाणे. |