आरबीआय/2016-17/37
एफआयडीडी.सीओ.प्लान.बीसी.10/04.09.01/2016-17
ऑगस्ट 11, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (प्रादेशिक ग्रामीण बँका सोडून)
महोदय/महोदया,
फॅक्टरायझिंग व्यवहारांसाठी प्राधान्य क्षेत्रातील कर्जाचा दर्जा/स्थिती
कृपया, ट्रेड रिसीव्हेबल्स डिसकाऊंटिंग सिस्टिम (टीआरईडीएस) स्थापन करणे व चालविणे ह्याबाबत रिझर्व बँकेने डिसेंबर 3, 2014 रोजी दिलेल्या प्राधान्य क्षेत्रातील कर्जे (पीएसएल) व मार्गदर्शक तत्वे ह्यावरील आमचे महानिदेश एफआयडीडी.सीओ.प्लान. 1/04.09.01/2016-17 जुलै 7, 2016 चा संदर्भ घ्यावा.
(2) एमएसएमई क्षेत्रासाठी लिक्विडिटी आधार वाढविण्यासाठी असे ठरविण्यात आले आहे की, ‘विथ रिकोर्स’ धर्ती वरील फॅक्टरिंग व्यवहार हे, विभागीय रितीने फॅक्टरिंगचा व्यवसाय करणा-या बँकांसाठी प्राधान्य क्षेत्रात वर्गीकृत केले जाण्यास पात्र असतील. टीआरईडीएस मार्फत केले जाणारे फॅक्टरिंग व्यवहारही, हा मंच कार्यान्वित झाल्यावर, प्राधान्य क्षेत्रात वर्गीकृत केले जाण्यास पात्र असतील.
(3) जेथे फॅक्टरिंग व्यवहारातील ‘असायनर’ हा एक मायक्रो, लघु किंवा मध्यम उद्योग आहे (कारखाने/यंत्रसामग्रीमधील गुंतवणुक व प्राधान्य क्षेत्रात वर्गीकरण होण्यासाठी लागु असलेल्या इतर विद्यमान मार्गदर्शक तत्वानुसार) तेथे, जुलै 7, 2016 रोजीच्या, पीएसएलवरील महानिदेशांच्या तिस-या भागातील परिच्छेद 7 नुसार, बँका, अहवाल पाठविण्याच्या तारखेस त्यांचे आऊटस्टँडिंग फॅक्टरिंग खाती एमएसएमई ह्या वर्गात वर्गीकृत करु शकतात.
(4) ह्या बाबतीत, येथे पुनः सांगण्यात येते की, बँकांद्वारे फॅक्टरिंग सेवा पुरविणे - पुनरावलोकन वरील परिपत्रक डीबीआर.क्र.एफएसडी.बीसी.32/24.01.007/2015-16 दिनांक जुलै 30, 2015 ह्या बँकिंग रेग्युलेशन विभागाने दिलेल्या परिपत्रकाच्या परिच्छेद 9 अनुसार, दोन वेळा वित्तसहाय्य/मोजणी टाळण्यासाठी, कर्जदाराची बँकही, त्या कर्जदाराकडून, फॅक्टर्ड रिसिव्हेबल बाबतची नियतकालिक प्रमाणपत्रे मिळवू शकते. ह्या शिवाय, अशा ‘फॅक्टर्स’ नीही दोन वेळा वित्तसहाय्य केले जाणे टाळण्यासाठी, कर्जदारांना मंजुर केलेली मर्यादा व फॅक्टरिंग केलेली कर्जे ह्याची माहिती संबंधित बँकांना कळविण्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे.
आपला
(ए.उदगाता)
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक. |