आरबीआय/2016-17/57
डीसीबीआर.बीपीडी(पीसीबी).बीसी.क्र.3/12.05.001/2016-17
सप्टेंबर 1, 2016
मुख्य कार्यकारी अधिकारी, सॅलरी अर्नर्स
प्राथमिक (नागरी) सहकारी बँका.
महोदय/महोदया,
सभासद नसलेल्या व्यक्तींच्या मुदत ठेवीं विरुध्द अग्रिम राशी
आमचे परिपत्रक युबीडी.क्र.बीएल.(एसइबी)5ए/07.01.00-2001/02ऑगस्ट 8, 2001 च्या अन्वये, शाखा उघडण्यासाठीच्या परवानग्या मागण्यास अर्ज करणा-या सॅलरी अर्नर्स प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांनी (एसईबी) खात्री करुन घ्यावी की, त्यांनी, बाहेरील व्यक्तींना (कर्मचारी नसलेल्या) व्यक्तींना सभासद/नाममात्र सभासद म्हणून नोंदणी करुन त्यांना कर्ज देण्याची तरतुद त्यांच्या पोटनियमांमध्ये ठेवण्यात आलेली नाही.
(2) डिसेंबर 14, 2015 रोजी घेण्यात आलेल्या 32 व्या स्थायी सल्लागार समितीच्या शिफारशींनुसार, असे ठरविण्यात आले आहे की, सभासद नसलेल्या व्यक्तींच्या मुदत ठेवींवर, पुढील अटींवर अग्रिम राशी देण्यास एसईबींना परवानगी देण्यात यावी.
(1) आमची परिपत्रके युबीडी.सीओ.एलएस.(पीसीबी)परिपत्रक क्र.20/07.01.000/2014-15 व डीसीबीआर. सीओ.एलएस.(पीसीबी)परिपत्रक क्र.4/07.01.000/2014-15 अनुक्रमे दि. ऑक्टोबर 13, 2014 व जानेवारी 28, 2015 मध्ये दिल्यानुसार, त्या एसईबीने, फायनान्शियली साऊंड व वेल मॅनेज्ड (एफएसडब्ल्युएम) युसीबी साठीचे सर्व निकष पूर्ण केले असले पाहिजेत.
(2) त्या एसईबीकडे, संचालक मंडळाची एक ऑडिट समिती असावी व तिची स्थापना व कार्यवाही, आमचे परिपत्रक युबीडी.क्र.प्लान.(पीसीबी).9/09.06.00-94/95 दि.जुलै 25, 1994 मध्ये दिलेल्या सूचनांनुसार केली जावी.
(3) त्या एसईबीच्या पोट नियमांमध्ये, सभासद नसलेल्या व्यक्तींनी त्यांच्या स्वत:च्या नावे किंवा इतर सभासद/सभासद नसलेल्यांसह संयुक्तपणे ठेवलेल्या मुदत ठेवींवितुध्द कर्जे देण्याची तरतुद ठेवलेली असावी.
(4) संचालक मंडळाने मंजुर केलेल्या धोरणानुसार, त्या एसईबीने सर्व काळ, अशा अग्रिम राशींविरुध्द वाजवी मार्जिन ठेवावे.
(5) सभासद नसलेल्या व्यक्तींना, मुदत ठेवींविरुध्दच्या अग्रिम राशींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कर्ज सुविधा दिल्या जाऊ नयेत.
(3) परिपत्रक युबीडी.क्र.बीएल(एसइबी)5ए/07.01.00-2001/02ऑगस्ट 8, 2001 मध्ये विहित केलेल्या इतर अटींमध्ये कोणताही बदल नाही.
आपला
(ए.जी. रे)
प्रभारी महाव्यवस्थापक |