आरबीआय/2016-2017/79
एफआयडीडी सीओ.प्लान.सीओ.बीसी.क्र.17/04.09.001/2016-17
ऑक्टोबर 6, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
(सर्व अनुसूचित वाणिज्य बँका) (प्रादेशिक ग्रामीण बँका सोडून)
महोदय/महोदया,
प्राधान्य क्षेत्रातील कर्जे - सुधारित अहवाल प्रणाली
आमचे परिपत्रक एफआयडीडी सीओ.प्लान.बीसी.54/04.09.01/2014-15 दिनांक, एप्रिल 23, 2015 अन्वये प्राधान्य क्षेत्रासाठीची मार्गदर्शक तत्वे सुधारित करण्यात आली होती. त्यानुसार, प्राधान्य क्षेत्रातील कर्जांचे तिमाही व वार्षिक अहवाल पाठविण्यासाठीचे नमुनेही परिपत्रक एफआयडीडी सीओ.प्लान.बीसी.क्र.58/04.09.001/2014-15 दिनांक, जून 11, 2015 अन्वये देण्यात आले होते.
(2) पुनरावलोकन केल्यानंतर, प्राधान्य क्षेत्रातील कर्जाचे तिमाही व वार्षिक अहवाल पाठविण्याचे नमुनेही सुधारित करण्यात आले. ह्यासाठी बँकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी प्राधान्य क्षेत्रातील अग्रिम राशींवरील माहिती सोबत जोडलेल्या सुधारित नमुन्यांत पाठवावी. ही सुधारित तिमाही व वार्षिक विवरणपत्रे, अनुक्रमे तिमाहीची अखेर झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत व वित्तीय वर्षाची अखेर झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत, भारतीय रिझर्व बँक, वित्तीय समावेशन व विकास विभाग सांख्यिकी विभाग, केंद्रीय कार्यालय, 3 रा मजला, अमर बिल्डिंग, फोर्ट, मुंबई - 400 001 ह्यांच्याकडे पाठवावीत.
(3) ह्याशिवाय बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी, जून 2016 व ऑक्टोबर 2016 अखेरीस समाप्त होणा-या तिमाहींसाठीचे अहवाल, केवळ सुधारित नमुन्यांमध्येच, ऑक्टोबर 21, 2016 पर्यंत पाठवावेत,
आपला
(ए.उदगाता)
(प्रधान मुख्य महाव्यवस्थापक),
सोबत - वरील प्रमाणे. |