आरबीआय/2016-2017/84
एफआयडीडी.एफएसडी.बीसी.क्र.18/05.05.010/2016-17
ऑक्टोबर 13, 2016
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/सीईओ,
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी सोडून).
महोदय/महोदया,
सुधारित किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना
कृपया, वरील विषयावरील आमचे परिपत्रक आरपीसीडी एफएसडी.बीसी.क्र.23/05.05.09/2012-13 दिनांक ऑगस्ट 7, 2012 चा संदर्भ घ्यावा.
(2) सुधारित केसीसीच्या परिच्छेद 13 मध्ये जोडण्यात दिल्यानुसार काही बदल करण्याचे ठरविण्यात आले आहे. सर्व बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी बदललेल्या सूचनांची नोंद घ्यावी आणि त्या ताबडतोब अंमलात आणाव्यात.
आपली,
(उमा शंकर)
(मुख्य महाव्यवस्थापक),
सोबत - वरील प्रमाणे.
जोडपत्र
तपशील |
परिपत्रक आरपीसीडी.एफएसडी.बीसी.क्र.23/05.05.09/2012-13 दिनांक, ऑगस्ट 7, 2012 नुसार असलेल्या सूचना |
सुधारित सूचना |
परिच्छेद 13 – इतर लक्षणे कॉलम |
13.2. अनिवार्य असलेल्या पीक-विम्या व्यतिरिक्त, केसीसी धारकाला, अॅसेट विमा, व्यक्तिगत अपघात विमा योजना (पीएआयएस) आणि स्वस्थ्य विमा (जेथे हा उत्पाद उपलब्ध आहे तेथे) ह्यांचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध असावा, आणि त्याचा हप्ता केसीसी कार्ड मार्फत भरलेला असावा. बँक व शेतकरी ह्या उभयतांनी संमत केलेल्या गुणोत्तरावर आधारित असा आवश्यक हप्ता, विमा कंपन्यांना, केसीसी खात्यांमधूनच दिला जाणे आवश्यक आहे. शेतक-यांच्या लाभार्थींना उपलब्ध असलेल्या विमा छत्राची जाणीव करुन दिली जावी आणि त्याबाबतची त्यांची सहमती (पीक-विमा सोडून कारण तो अपरिहार्य आहे) अर्ज करतेवेळीच घेतली जावी. |
13.2 - अपरिहार्य असलेल्या पीक-विम्या व्यतिरिक्त केसीसी धारकाला, कोणत्याही प्रकारचा अॅसेट विमा, अपघात विमा (पीएआयएस सह) आणि स्वास्थ्य विमा (हा उत्पाद उपलब्ध असेल तेथे) ह्यांचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध असावा आणि त्याचा हप्ता, त्याच्या केसीसी खात्यामधून दिला गेलेला असावा. शेतकरी/बँक ह्यांनी तो हप्ता ह्या योजनेच्या अटीनुसार सोसावयाचा/द्यावयाचा आहे. उपलब्ध असलेल्या विमा-छत्रांबाबत, शेतक-यांच्या लाभार्थींना जाणीव करुन दिली जावी आणि त्या बाबतची त्यांची सहमती (पीक विमा सोडून, कारण तो अपरिहार्य आहे) अर्ज करते वेळीच घेतली जावी |
|