Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (119.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 08/11/2016
एटीएम्स - उच्च मूल्याच्या जुन्या नोटा देणे बंद - कार्यकृती बंद केल्या जाणे

आरबीआय/2016-2017/111
डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र./02.10.002/2016-2017

नोव्हेंबर 08, 2016

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी सह)/नागरी सहकारी बँका/
राज्य सहकारी बँका/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका/प्राधिकृत एटीएम नेटवर्क ऑपरेटर्स/
कार्ड पेमेंट नेटवर्क ऑपरेटर्स/व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स.

महोदय/महोदया

एटीएम्स - उच्च मूल्याच्या जुन्या नोटा देणे बंद - कार्यकृती बंद केल्या जाणे

भारत सरकारने ताबडतोबीने (8 नोव्हेंबर 2016 च्या मध्य रात्रीपासून), रु.500 व रु.1000 च्या विद्यमान आणि इतर कोणत्याही मालिकेतील बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकले आहे. त्यामुळे, नोव्हेंबर 8, 2016 च्या मध्यरात्रीपासून, ह्या उच्च मूल्याच्या जुन्या (ओएचडी) बँक नोटा, बँकांकडून त्यांच्या एटीएम्समधून दिले जाणे बंद करणे आवश्यक आहे.

(2) ह्यासाठी तयारी करण्यास बँकांना साह्य करण्यास, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील/खाजगी क्षेत्रातील/विदेशी बँका, आरआरबी, नागरी सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँका ह्यांना, नोव्हेंबर 9, 2016 रोजी सार्वजनिक व्यवहारांसाठी त्यांच्या बँका बंद ठेवण्यासाठी आधीच सांगण्यात आले आहे.

(3) वरील गोष्टी विचारात घेता असे ठरविण्यात आले आहे की, नोव्हेंबर 8, 2016 च्या मध्यरात्रीपासून सर्व एटीएम्स बंद ठेवण्यात येतील. कारण तसे केल्याने त्यांच्यामधून बाद केलेल्या जुन्या उच्च मूल्याच्या बँक नोटा (ओएचडी) वितरित केल्या जाणार नाहीत. नोव्हेंबर 11, 2016 पासून ही एटीएम्स रिकॅलिब्रेट केल्यावर रु.50 व रु.100 च्या बँक नोटा वितरित करण्यासाठी कार्यान्वित केली जाऊ शकतात.

(4) ऑन-अस व ऑफ-अस ह्या दोन्हीही व्यवहारांसाठी, वरील उपाय अंमलात आणण्यासाठी, बँका व एटीएम स्विचेसनी तातडीने पाऊले उचलावीत.

(5) ह्याशिवाय, ग्राहकांच्या सोयीसाठी, डिसेंबर 30, 2016 पर्यंत बँकांच्या एटीएम्समधून केले जाणारे सर्व निकासी व्यवहार निःशुल्क ठेवावेत असेही बँकांना सांगण्यात आले आहे. असेही ठरविण्यात आले आहे की, नोव्हेंबर 18, 2016 पर्यंत त्यांच्या ग्राहकांसाठी एटीएममधील निकासीची मर्यादा, प्रतिदिन, प्रतिकार्ड रु.2000 अशी निश्चित करण्यास बँकांना सांगण्यात आले आहे.

(6) हे निदेश, प्रदान व तडजोड प्रणाली अधिनियम 2007 (2007 चा 51) च्या कलम 18 सह वाचित कलम 10(2) खाली देण्यात आले आहेत. –

आपली विश्वासु,

(नंदा एस. दवे)
मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä