Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
����� >> +?vɺ��S�x�� - Display
Note : To obtain an aligned printout please download the (129.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 11/11/2016
विद्यमान रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - अहवाल व देखरेख

आरबीआय/2016-17/125
डीसीएम(पीएलजी)क्र.1264/10.27.00/2016-17

नोव्हेंबर 11, 2016

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी/
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी बँका/
प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/सहकारी बँका

महोदय,

विद्यमान रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - अहवाल व देखरेख

कृपया, विद्यमान रु.500 व रु.1000 च्या नोटांचे वैध चलन लक्षण बाद करण्यावरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 च्या डीसीएम.सीओ च्या परिच्छेद 4 चा संदर्भ घ्यावा. त्यानुसार, एसबीएसच्या अदलाबदलीच्या दैनिक स्थितीचा अहवाल बँकांनी आरबीआयकडे पाठविणे आवश्यक आहे. ह्या बाबतीत बँकांना सांगण्यात येते की, ह्या अहवालात रोख रकमेची अदलाबदल तसेच खात्यात केलेली जमा ह्या बाबतची माहितीही समाविष्ट असावी. दैनंदिन धर्तीवर नकली/खोट्या नोटा आढळण्याचे प्रसंगही कळविणे गरजेचे आहे. त्यानुसार, जोडपत्रे 66 अ सुधारित करुन जोडण्यात आली आहेत. एकत्रिकृत अहवाल - 6 अ हा पुढील दिवसाच्या कामकाजाच्या अखेरीस मेल केला जावा.

(2) ह्याशिवाय, वरील 2016 च्या परिपत्रकात निर्देशित केलेल्या परिच्छेद 8 च्या संदर्भात, नोडल अधिका-यांचा संपर्क तपशील, ई-मेलने, खाली दिलेल्या नमुन्यात, नोव्हेंबर 11, 2016 च्या कामकाजाच्या अखेरीस पाठविला जावा :

बँकेचे नाव नोडल अधिका-याचे नाव टेलिफोन क्रमांक फॅक्स क्रमांक मोबाईल क्रमांक मेल आयडी.
           

(एक्सेल फॉरमॅटमध्ये सादर करावा)

आपली विश्वासु,

(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक


जोडपत्र - 6

रु.500/- व रु.1000/- मूल्यामधील एसबीएनची दैनिक प्राप्ती नियंत्रक कार्यालयाला कळविण्याचा नमुना

बँकेचे नाव : ________________________

शाखेचे नाव : ________________________ आयएफसी कोड : ________________________

________________________ रोजी शाखेला मिळालेल्या/स्वीकारलेल्या एसबीएन पुढीलप्रमाणे आहेत :

तपशील रु.500 (नगा मध्ये) रु.1000 (नगा मध्ये) एकूण मूल्य रु.
रोख बदलून दिलेल्या      
खात्यात जमा केलेल्या      
एकूण      
सापडलेल्या नकली नोटा      

शाखा-प्रभारीचे नाव व हुद्दा _______________________________

शाखा प्रभारीची सही___________________________________

दिनांक ______________ स्थळ ________________________


जोडपत्र 6 अ

रु.500/- व रु.1000/- च्या मूल्यामधील एसबीएनची दैनिक प्राप्ती, आरबीआय, डीसीएम, केंद्रीय कार्यालय ह्यांना कळविण्याचा नमुना

बँकेचे नाव :

व्यवहारांची तारीख :

मिळालेल्या एसबीएनचा तपशील :

तपशील रु.500 (नगा मध्ये) रु.1000 (नगा मध्ये) एकूण मूल्य रु.
रोख बदलून दिलेल्या      
खात्यात जमा केलेल्या      
एकूण      
सापडलेल्या नकली नोटा      
 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��