आरबीआय/2016-17/135
डीसीएम(पीएलजी) क्र.1287/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 16, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी
बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका
महोदय,
विहित बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे –
आय कर अधिनियम 1962 च्या 114 ब च्या तरतुदींचे अनुपालन
कृपया, वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी) क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 चा संदर्भ घ्यावा. आय कर नियम, 1962 च्या 114ब च्या तरतुदींचे अनुपालन करण्यासाठी बँकांना पुढीलप्रमाणे सांगण्यात येत आहे.
(1) रु.50,000/- पेक्षा अधिक रोख रक्कम आपल्या खात्यात जमा करणाराला, त्याच्या खात्याबाबत पॅन नोंदवलेला नसल्यास, त्याचे पॅन कार्ड सादर करण्यास सांगण्यात यावे.
(2) वरील तरतुदी व्यतिरिक्त त्याचा आयटी नियमांमध्ये, इतर व्यवहारांसाठीही पॅन कळविणे आवश्यक आहे. बँकांनी त्याबाबत आग्रह धरला पाहिजे.
(2) ह्यासाठी बँकांना सांगण्यात येत आहे की, त्यांनी वरील बाबींची नोंद घेऊन त्यांनी आय कर नियम, 1962 च्या 114ब मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. आय कर नियम 1962 च्या 114 ब ची संबंधित तरतुद सोबत जोडली आहे.
आपली विश्वासु,
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक
सोबत : वरील प्रमाणे |