आरबीआय/2016-17/146
डीसीएम(पीएलजी)क्र.1323/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 21, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी
बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका/
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका
महोदय,
रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून घेणे - सुधारणा
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक क्र.डीसीएम(पीएलजी)क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 चा संदर्भ घ्यावा.
2. पुनरावलोकन केल्यानंतर, बँक खात्यांमधून निकासी करण्यासाठीच्या मर्यादांमध्ये काही सुधारणा/बदल करण्यात आले आहेत, ते पुढीलप्रमाणे.
(1) शेतक-यांसाठी
शेतक-यांची खाती, विद्यमान केवायसी निकषांचे अनुपालन केलेली असल्यास, त्यांच्या कर्ज खात्यातून (किसान क्रेडिट कार्ड मर्यादेसह) किंवा ठेव खात्यामधून, त्या शेतक-यांना, प्रति सप्ताह रु.25,000/- काढण्यास परवानगी दिली जावी.
(2) एपीएमसी मार्केट्स/मंडी मध्ये पंजीकृत असलेल्या व्यापा-यांसाठी
सध्या, सर्व चालु खातेधारकांना त्यांच्या चालु खात्यांमधून, काही अटी व शर्तींवर, एका आठवड्यात रु.50,000/- रोखीने काढण्यास परवानगी आहे. आणि ही परवानगी, एपीएमसी मार्केट्स/मंडी मध्ये पंजीकृत असलेल्या व्यापा-यांनाही देण्यात येत आहे. अशा व्यापा-यांना त्यांच्या चालु खात्यामधून रु.50,000/- पर्यंत निकासी करण्यास परवानगी आहे. मात्र, अशा खात्यांबाबत केवायसी निकषांचे पालन केले गेले असले पाहिजे. तसेच ती खाती गेले तीन महिने किंवा अधिक काळ कार्यरत असली पाहिजेत.
3. कृपया पोच द्यावी.
आपली विश्वासु
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक |