आरबीआय/2016-17/149
डीसीएम(पीएलजी)क्र.1346/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 22, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी
बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका
महोदय,
रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान विहित बँक नोटांचे (एसबीएन) वैध चलन लक्षण काढून टाकणे - विवाह समारंभासाठी रोख रक्कम काढणे - सुधारणा/बदल
कृपया आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र.1320/10.27.00/2016-दि. नोव्हेंबर 21, 2016 चा संदर्भ घ्यावा. वरील परिपत्रकातील परिच्छेद 2.6 (क) मधील सूचनांमध्ये पुढीलप्रमाणे बदल/सुधारणा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
जेथे अशी रोख रक्कम रु.10,000/- किंवा अधिक असेल तेथे, काढलेली रोकड ज्यांना द्यावयाची आहे अशा व्यक्तींची सविस्तर यादी, आणि अशा व्यक्तींनी दिलेले त्यांचे बँक खाते नसल्याबाबतचे घोषणापत्र. प्रस्तावित प्रदान कोणत्या हेतुसाठी करण्यात येत आहे हे देखील त्या यादीमध्ये निर्देशित केले असावे
आपली विश्वासु
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक
|