आरबीआय/2016-17/136
डीसीएम(पीएलजी)क्र. 1291/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 16, 2016
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी बँका/
प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका
महोदय,
रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - दैनंदिन अहवाल पाठविणे
कृपया, वरील विषयावरील, डीसीएम सीओ परिपत्रक, डीसीएम(पीएलजी)क्र. 1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 च्या परिच्छेद (4) चा संदर्भ घ्यावा. त्यात, विहित बँक नोटांचा (एसबीएन) दैनिक अहवाल आरबीआयकडे पाठविण्यास बँकांना सांगण्यात आले होते. वरील अहवाल बँका, लक्षणीय विलंबाने पाठवत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, तपशीलवार माहितीचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आरबीआयमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
(2) ह्यासाठी बँकांना सांगण्यात येते की त्यांनी प्रत्येक दिवशी रात्री 11.00 वाजेपर्यंत दैनंदिन माहिती जोडपत्र 6ए मध्ये, आरबीआय, सीडीएम, सीओ ह्यांचेकडे ई-मेलने पाठवावी.
आपली विश्वासु,
(सुमन रे)
महाव्यवस्थापक |