आरबीआय/2016-17/189
डीसीएम(पीएलजी)क्र.1859/10.27.00/2016-17
डिसेंबर 19, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/
विदेशी बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/
राज्य सहकारी बँका
महोदय,
रु.500/- व रु.1000 च्या विद्यमान बँक नोटांचे (विहित बँक नोटा) वैध चलन लक्षण काढून टाकणे - विहित बँक नोटा (एसबीएन) खात्यांमध्ये जमा करणे
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 चा संदर्भ घ्यावा. एसबीएनचे मूल्य बँक खात्यात क्रेडिट करण्याबाबत, परिच्छेद 3 च्या क मधील तरतुदी 2,3 व 4 ह्यांचे पुनरावलोकन केल्यावर, असे ठरविण्यात आले आहे की, बँक खात्यांमध्ये एसबीएन जमा करण्यावर निर्बंध घालण्यात यावेत, तर टॅक्सेशन अँड इनवेस्टमेंट रेजिम फॉर प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना, 2016 खाली ह्या ठेवी ठेवण्यास प्रोत्साहन देण्यात यावे, ते पुढीलप्रमाणे.
(i) रु.5,000 पेक्षा अधिक मूल्याच्या एसबीएन जमा करणे, डिसेंबर 30, 2016 पर्यंत, उर्वरित कालावधीत केवळ एकदाच स्वीकारले/केले जावे. अशा बाबतीत जमा/क्रेडिट रक्कम, ह्या आधीच का जमा केली नाही हा प्रश्न विचारुन व त्याचे समाधानकारक उत्तर मिळाल्यावरच (बँकेच्या किमान दोन अधिका-यांच्या उपस्थितीत) त्याचे रेकॉर्ड ठेवून जमा केली जावी. हे स्पष्टीकरण, पुढील काळात ऑडिट करण्यासाठी रेकॉर्डवर ठेवले जावे. त्यानुसार, ह्यापेक्षा अधिक रक्कम जमा करण्यास परवानगी नसल्याचे कळण्यासाठी, सीबीएसमध्ये एक फ्लॅग ठेवले जावे.
(ii) सर्वसामान्यतः काऊंटरवर दिलेल्या रु.5,000/- पर्यंत मूल्याच्या एसबीएन, डिसेंबर 30, 2016 पर्यंत बँक खात्यांमध्ये जमा केल्या जाण्यास परवानगी आहे. रु.5,000/- पेक्षा कमी रक्कमा एखाद्या खात्यात जमा केल्या गेल्या आणि अशी जमा केलेली संबंधित रक्कम रु.5,000/- च्या वर असल्यासही, त्याबाबत, रु.5,000/- पेक्षा अधिक रक्कम जमा केली जाण्याबाबतची कार्यरीत अनुसरली जावी (म्हणजे त्यानंतर, डिसेंबर 30, 2016 पर्यंत कोणतीही रक्कम स्वीकारली जाणार नाही).
(iii) ह्याचीही खात्री करुन घेतली जावी की, रु.5,000/- पेक्षा अधिक रक्कम सादर केली गेल्यास तिचे संपूर्ण मूल्य, केवळ केवायसी निकष पूर्ण केलेल्या खात्यातच जमा केले जाईल आणि ती खाती केवायसी निकष पूर्ण केलेली नसल्यास केवळ रु.50,000/- पर्यंतच रक्कम क्रेडिट केली जावी, मात्र त्याबाबत अशा खात्यांबाबतच्या अटी त्यासाठी लागु होतील.
(iv) टॅक्सेशन अँड इनवेस्टमेंट रेजिम फॉर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, 2016 खाली एसबीएन जमा करणारांना वरील निर्बंध लागु असणार नाहीत.
(v) सादर केलेल्या विहित बँक नोटांचे सममूल्य, कोणत्याही बँकेत सादरर्कत्याने ठेवलेल्या खात्यात, प्रमाणभूत बँकिंग रीती व ओळखीचा वैध पुरावा सादर केला असल्यास जमा केले जावे.
(vi) सादर केलेल्या विहित नोटांचे सममूल्य एखाद्या तृतीय पक्षाच्या खात्यातही जमा केले जाऊ शकते - मात्र, आमच्या अपरिनिर्दिष्ट परिपत्रकातील जोडपत्र 5 मध्ये दिल्याप्रमाणे, प्रमाणभूत बँकिंग कार्यरीतींचे अनुसरण करुन, तसेच त्या तृतीय पक्षाने विशिष्ट/नेमके प्राधिकृतीकरण आणि एसबीएन प्रत्यक्ष सादर करणाराच्या ओळखीचा वैध पुरावा बँकेला सादर केल्यासच तसे केले जाऊ शकते.
(2) कृपया पोच द्यावी.
आपली विश्वासु
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक
संबंधित लिंक्स |
Dec 16, 2016 |
प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस), 2016 |
Dec 16, 2016 |
प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस), 2016 |
Dec 16, 2016 |
प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस), 2016 -कार्यकारी मार्गदर्शक तत्वे |
Dec 16, 2016 |
प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस) वरील एफएक्युज |
|