रु.500/- व रु.1,000/- च्या बँक नोटांचे (विहित/विशिष्ट बँक नोट) वैध चलन लक्षण काढून टाकले जाणे - विहित बँक नोटा (एसबीएम) बँक खात्यात जमा करणे |
आरबीआय/2016-17/191
डीसीएम (पीएलजी)क्र.1911/10.27.00/2016-17
डिसेंबर 21, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक
क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी बँका/प्रादेशिक ग्रामीण
बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका.
महोदय,
रु.500/- व रु.1,000/- च्या बँक नोटांचे (विहित/विशिष्ट बँक नोट) वैध चलन लक्षण काढून टाकले जाणे - विहित बँक नोटा (एसबीएम) बँक खात्यात जमा करणे
कृपया आमचे परिपत्रक डीसीएम. (पीएलजी)क्र.1859/10.27.00/2016-17 दि. डिसेंबर 19, 2016 चा संदर्भ घ्यावा. वरील परिपत्रकाचे पुनरावलोकन केल्यावर आमच्याकडून सांगण्यात येत आहे की, वरील परिपत्रकाच्या पोट-खंड (1) व (2) मधील तरतुदी, केवायसीचे अनुपालन केले असलेल्या खात्यांना लागु होणार नाही.
2. कृपया पोच द्यावी.
आपली विश्वासु,
(पी. विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक
|
|