Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (366.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 24/11/2016
बँकिंग कंपन्यांसाठी उपयुक्त खास ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव

आरबीआय/2016-17/152
डीबीआर.एपीपीटी.बीसी.क्र.39/29.39.001/2016-17

नोव्हेंबर 24, 2016

सर्व वाणिज्य बँका-आरआरबी सोडून.

महोदय,

बँकिंग कंपन्यांसाठी उपयुक्त खास ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव

बँकिंग व तंत्रज्ञान ह्यामधील नाविन्यपूर्ण शोधांची पार्श्वभूमी विचारात घेता, वाणिज्य बँकांच्या (आरआरबी सोडून) संचालक मंडळावरील संचालकांसाठीच्या निरनिराळ्या वैधानिक तरतुदीखाली दिलेले ह्या क्षेत्राविषयीचे ज्ञान व अनुभव, त्या बँकांना, त्यांचा वैविध्यपूर्ण व्यवसाय व जोखमींचे व्यवस्थापन करण्यात मार्गदर्शन करण्यासाठी, इतर क्षेत्रातील ज्ञान व अनुभव ह्यांच्याद्वारे वाढविण्याची आवश्यकता आहे. ह्यासाठी असे ठरविण्यात आले आहे की, बँकांमध्ये संचालक म्हणून नेमणुक केली जाण्यासाठी विचारात घ्यावयाच्या व्यक्तींबाबत, (1) माहिती तंत्रज्ञान (2) प्रदान व तडजोड प्रणाली (3) मानवी स्त्रोत (4) जोखीम व्यवस्थापन (5) व्यवसाय व्यवस्थापन ह्यांना समाविष्ट करुन विशेष ज्ञानाची (स्पेशलायझेशन) क्षेत्रे अधिक रुंद करण्यात यावीत.

(2) संबंधित अधिसूचना डीबीआर.एपीपीटी.बीसी.क्र 38/29.39.001/2016-17 दि. नोव्हेंबर 24, 2016 ची एक प्रत सोबत जोडण्यात आली आहे.

आपला विश्वासु,

(अजय कुमार चौधरी)
मुख्य महाव्यवस्थापक

सोबत – अधिसूचना


डीबीआर.एपीपीटी.बीसी.क्र.38/29.39.001/2016-17

नोव्हेंबर 24, 2016

बँकिंग कंपन्यांसाठी उपयुक्त विशेष ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव

बँकिंग विनियम अधिनियम, 1949 चे कलम 10अ(2)(अ)(9); भारतीय स्टेट बँक अधिनियम, 1955 चे कलम 19 अ(1)(अ)(8); भारतीय स्टेट बँक (दुय्यम बँका) अधिनियम, 1959 चे कलम 25अ(1)(अ)(8) आणि बँकिंग कंपन्या (उपक्रमांची प्राप्ती व हस्तांतरण) अधिनियम 1970/1980 चे कलम 9(3अ)(अ)(8) ह्यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे अधिसूचित करत आहे की, (1) माहिती तंत्रज्ञान (2) प्रदान व तडजोड प्रणाली (3) मानवी स्त्रोत (4) जोखीम व्यवस्थापन आणि (5) व्यवसाय व्यवस्थापन ह्यांच्याशी संबंधित क्षेत्रामधील विशेष ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव, बँकिंग कंपनी, भारतीय स्टेट बँक, सहाय्यक/दुय्यम बँक आणि संगत नवीन बँक (असेल त्यानुसार) ह्यांना उपयुक्त असेल.

(सुदर्शन सेन)
कार्यकारी संचालक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä