आरबीआय/2016-17/154
डीसीएम(पीएलजी)क्र.1384/10.27.00/2016-17
नोव्हेंबर 24, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी
बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका/
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका
महोदय,
विहित बँक नोटा काढून घेतल्या जाणे - सेवानिवृत्त व्यक्ती व लष्करातील अधिका-यांच्या रोख रकमेच्या गरजा
विहित बँक नोटांचे (एसबीएन) वैध चलन लक्षण काढून टाकण्यात आल्याचे त्यांचे वेतन/पेन्शनच्या इलेक्ट्रॉनिक प्रदानानंतर, सरकारी अधिकारी ह्यांच्याकडून रोख रकमेसाठीची मागणी अपेक्षित आहे.
(2) ह्यासाठी पुढील गोष्टींसाठीची ही रोख रकमेची मागणी पूर्ण करण्यासाठी योग्य पाऊले उचलण्यास बँकांना सांगण्यात येत आहे.
(1) पेन्शनरांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेशी रोकड उपलब्ध असल्याची खात्री करणे.
(2) लष्करी अधिका-यांच्या रोख रकमेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, मिलिटरी आऊटपोस्ट मध्ये पुरेसा पुरवठा होत असल्याची खात्री करणे.
आपली विश्वासु
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक |