आरबीआय/2016-17/201
डीसीएम(पीएलजी)क्र.2103/10.27.00/2016-17
डिसेंबर 30, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/
विदेशी बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/
राज्य सहकारी बँका/जिल्हा केंद्रीय सहकारी बँका
महोदय,
डिसेंबर 30, 2016 पासून बँकांमध्ये, विहित बँक नोटांची (एसबीएन) अदलाबदलीच्या योजनेची समाप्ती-लेखा कर्म/हिशेब
कृपया, ‘रु.500/- व रु.1,000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे’ ह्या विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र. 1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 च्या परिच्छेद 3(क) चा संदर्भ घ्यावा.
(2) डिसेंबर 30, 2016 रोजी व्यवहार बंद केल्यावर एसबीएन बदलून देण्याची सुविधा बंद झाल्यावर, सर्व बँकांनी, डिसेंबर 30, 2016 रोजीच, एसबीएन गोळा करण्यावरील माहिती ई-मेलने पाठविणे आवश्यक आहे. त्यानुसार बँकांनी ही माहिती त्यांच्या सर्व शाखांमधून गोळा करण्याची व्यवस्था करावी.
(3) डिसेंबर 30, 2016 रोजी व्यवहार बंद होतेवेळी एसबीएनचा साठा केला असलेल्या सर्व बँक शाखांनी (डीसीसीबीच्या शाखा सोडून), डिसेंबर 31, 2016 रोजीच त्या नोटा, रिझर्व बँकेच्या कोणत्याही इश्यु कार्यालयात किंवा एखाद्या धन कोषामध्ये जमा करणे आवश्यक आहे.
(4) डिसेंबर 31, 2016 रोजी बँक व्यवहार समाप्त झाल्यावर, जमा झालेल्या एसबीएन्स ह्या, त्या बँकेच्या रोख शिल्लकेचा एक भाग असू शकणार नाहीत.
(5) तथापि, पुढील सूचना मिळेपर्यंत, नोव्हेंबर 10 ते नोव्हेंबर 14, 2016 दरम्यान मिळालेल्या एसबीएन्स, डीसीसीबी ठेवून देऊ शकतात. (कृपया ह्याबाबत आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र. 1294/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 17, 2016 चा संदर्भ घ्यावा).
(6) धन कोष ठेवणा-या बँकांनी, जोडणी केलेल्या शाखा/बँकांच्या इतर शाखा/पोस्ट ऑफिसे ह्यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या एसबीएन जमा करण्यास मदत करण्यासाठी व्यवस्था कराव्यात. सर्व नोटा मिळेपर्यंत व त्यांचा हिशेब लावला जाईपर्यंत, त्या व्यवहारांचा अहवाल रात्री 9.00 वाजेनंतरही आयसीसीओएमएस कडे पाठविला जावा.
(7) एसबीएन्स साठविण्यास साह्य करण्यासाठी, धनकोष ठेवणा-या बँका, त्यांच्या विद्यमान धनकोषातील अतिरिक्त जागा वापरु शकतात किंवा त्या धनकोषाएवढीच सुरक्षित असल्याची खात्री करुन, त्याच केंद्रामध्येच साठा करण्यासाठी, अतिरिक्त जागेचा वापर करु शकतात. ह्याबाबत, कृपया आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र. 1294/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 17, 2016 चा संदर्भ घ्यावा.
(8) कृपया पोच द्यावी.
आपली विश्वासु,
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक |