आरबीआय/2016-17/205
डीसीएम(पीएलजी)क्र.2170/10.27.00/2016-17
डिसेंबर 31, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/
विदेशी बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/
राज्य सहकारी बँका/जिल्हा केंद्रीय सहकारी बँका
महोदय,
सवलतीच्या काळात विहित बँक नोटा (एसबीएन) बदलून घेण्याची सुविधा - केवायसी व खात्याच्या माहितीची पडताळणी
कृपया, विहित बँक नोटा (दायित्वाची समाप्ती) वरील, जीओआय वटहुकुम क्र. 2016 चा 10 दि. डिसेंबर 30, 2016 चा संदर्भ घ्यावा.
(2) वरील वटहुकुमाच्या परिच्छेद 4.1 अन्वये, डिसेंबर 10 ते डिसेंबर 30, 2016 दरम्यान भारताबाहेर असल्याने त्या काळात नोटा बदलून घेण्याची सुविधा घेता न आलेल्या निवासी व अनिवासी नागरिकांसाठी एसबीएन बदलून घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विशेषतः, ज्यांच्या खात्यांची केवायसी निकष पूर्ण केले आहेत, आणि ज्यांनी नोव्हेंबर 10 ते डिसेंबर 30, 2016 दरम्यान एसबीएन जमा केलेल्या नाहीत, केवळ अशाच सादरर्कत्यांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.
(3) वरील माहिती बँकांना उपलब्ध असल्याने, आरबीआयची विशिष्ट ऑफिसे, ह्या बँकांकडे, (1) केवायसी दर्जाचे सत्यांकन/दुजोरा करण्यासाठी आणि (2) सादरर्कत्यांच्या खात्यांमध्ये जमा केलेल्या (असल्यास) एसबीएनची माहिती घेण्यास येतील. ह्यासाठी बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी अशी विनंती मिळाल्याच्या 7 दिवसांच्या आत आवश्यक ती माहिती देण्याबाबतची व्यवस्था करावी. ह्यासाठी, आमचे कार्यालय ज्याच्याशी संपर्क करु शकेल असा, महाव्यवस्थापकाच्या दर्जाच्या एका नोडल अधिका-याची नेमणुक बँका करु शकतात. नोडल ऑफिसरचे नाव, संपर्क माहिती (ई-मेल आयडीसह) मेलने पाठवावी.
(4) कृपया पोच द्यावी.
आपली विश्वासु,
(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक
सवलतीच्या काळात विहित बँक नोटा बदलून देण्यासाठी सुविधा
भारत सरकारच्या, दि. 30 डिसेंबर, 2016 रोजीच्या, विहित बँक नोटा (दायित्वाची समाप्ती) वटहुकुम 2016 च्या कलम 4(1) अन्वये व, त्याखालील त्यांची अधिसूचना एसओ 4251(ई) दि. डिसेंबर 30 2016 अन्वये, नोव्हेंबर 9, 2016 ते डिसेंबर 30, 2016 च्या दरम्यान ह्या देशाबाहेर असल्याने, ह्यापूर्वीच्या सुविधेमध्ये एसबीएन बदलून घेण्याची संधी न मिळालेल्या भारतीय नागरिकांना ही संधी मिळावी ह्यासाठी, रिझर्व बँकेने वरील सुविधा तयार केली आहे.
ह्या सुविधेमधील तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत :
(2) बदलून देण्याच्या जागा
ही सुविधा, रिझर्व बँकेच्या मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता व नागपुर येथील पाच कार्यालयांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
(3) पात्र असलेल्या व्यक्ती
(3.1) ही सुविधा केवळ भारतीय नागरिकांना त्यांच्या वैय्यक्तिक क्षमतेमध्ये आणि ह्या कालावधीत केवळ एकदाच उपलब्ध असेल. ह्या सुविधेखाली तृतीय पक्षाने नोटांचे सादरीकरण करण्यास परवानगी नाही.
(3.2) भारतीय नागरिकांमध्ये, एसबीएन जवळ ठेवणा-या दोन प्रकारच्या व्यक्ती ह्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
(1) नोव्हेंबर 9 ते डिसेंबर 30, 2016 दरम्यान विदेशात असलेल्या निवासी भारतीय व्यक्ती आणि
(2) नोव्हेंबर 9 ते डिसेंबर 30, 2016 दरम्यान भारतात नसलेल्या/भारताबाहेर असलेल्या अनिवासी भारतीय (एनआरआय) व्यक्ती.
(3.3) नेपाळ, भूतान, पाकिस्तान व बांगलादेश येथे निवास करणा-या भारतीय नागरिकांना ही सुविधा उपलब्ध नसेल.
(3.4) वरील दोन अर्हताप्राप्त वर्गांसाठी असलेल्या ह्या सुविधेच्या अटी/शर्ती व बदल पुढीलप्रमाणे आहेत.
(अ) निवासी भारतीय
(1) केवळ नोव्हेंबर 9 ते डिसेंबर 30, 2016 ह्या दरम्यान विदेशात असलेल्या निवासी व्यक्ती आणि ह्या सुविधेच्या मुदतीत केवळ एकदाच ह्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
(2) सादर करतेवेळी एसबीएन सादर करण्यात कोणतीही रकमेची मर्यादा नाही.
(3) वरील कालावधीमध्ये ह्या व्यक्ती विदेशात होत्या ह्याबाबतच्या कागदोपत्री पुराव्यासह, जोडपत्र 1 मधील टेंडर फॉर्म भरुन एसबीएन सादर केल्या जाव्यात.
(4) नोव्हेंबर 9 ते डिसेंबर 30, 2016 ह्या कालावधीत ती व्यक्ती देशात नव्हती ह्याचा पुरावा म्हणून, इमिग्रेशन स्टँपसह पारपत्राची प्रत सादर केली जावी. मूळ पारपत्र आरबीआयच्या काऊंटरवर पडताळणीसाठी दिला जावा.
(5) नोव्हेंबर 10, 2016 ते डिसेंबर 30, 2016 दरम्यानच्या काळात, एसबीएन जमा केल्यानसल्याबाबतचा पुरावा म्हणून, सर्व बँक खात्यांची लेखा विवरणपत्राच्या प्रती सादर कराव्यात.
(6) अर्जदाराचे खाते केवायसी निकष पूर्ण केलेले असल्याच्या बँक माहितीसह, वैध आयडी पुरावा व आधार नंबर एसबीएन सादर करतेवेळी दिले जावेत.
(7) आयटी अधिनियमच्या कलम 114ब 1962 च्या तरतुदीनुसार आवश्यक ते कागदपत्र देणे आवश्यक असेल.
(8) परवानगीप्राप्त रक्कम जमा केली जाण्यापूर्वी, सादरर्कत्यांना पोचपावती दिली जाईल.
(9) नोव्हेंबर 9, 2016 ते डिसेंबर 30, 2016 ह्या कालात सादरकर्ता विदेशात होता, आणि त्याच्या खात्याने केवायसी निकष पूर्ण केले आहेत, इतर अटीही पूर्ण केल्या आहेत आणि सादर केलेल्या नोटांचा खरेपणा ह्यांची खातरजमा केल्यानंतर, सादरर्कत्याच्या खात्यात परवानगीप्राप्त रक्कम जमा केली जाईल व त्याला तसे कळविण्यात येईल.
(ब) अनिवासी भारतीय (एनआरआय)
(1) केवळ, नोव्हेंबर 9, 2016 ते डिसेंबर 30, 2016 ह्यादरम्यान भारतात उपस्थित नसलेले एनआरआय, ह्या सुविधेच्या मुदतीदरम्यान केवळ एकदाच ह्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
(2) अशा एसबीन, जोडपत्र 2 मध्ये दिलेल्या टेंडर फॉर्मसह सादर केल्या जाव्यात.
(3) संबंधित फेमा नियमांना अनुसरुन त्या नोटा भारताबाहेर केव्हा नेण्यात आल्या होत्या ह्यावर अवलंबून, असे सादरीकरण, प्रति व्यक्ती कमाल रु.25,000/- पर्यंत निर्बंधित असेल.
(4) नोव्हेंबर 9, 2016 ते डिसेंबर 30, 2016 ह्यादरम्यान ती व्यक्ती भारतात गैरहजर होती ह्याचा पुरावा म्हणून, इमिग्रेशन स्टँपसह पारपत्राची प्रत सादर केली जावी. मूळ पासपोर्ट पडताळणीसाठी, आरबीआयच्या काऊंटरवर सादर केला जावा.
(5) डिसेंबर 30, 2016 नंतर रेड चॅनलमधून आल्यानंतर भारतीय कस्टम्सने दिलेले प्रमाणपत्र (एसबीएन्सची आयात व मूल्य ह्यांच्या माहितीसह) सादर केले जावे.
(6) नोव्हेंबर 10, 2016 ते डिसेंबर 30, 2016 ह्यादरम्यान, एसबीएन जमा केल्या नसल्याचा पुरावा म्हणून, भारतामध्ये ठेवलेल्या सर्व बँक खात्यांच्या विवरणपत्रांच्या प्रती सादर केल्या जाव्यात.
(7) आय कर नियमांच्या कलम 114 ब 1962 च्या तरतुदीनुसार आवश्यक ते कागदपत्रे सादर केली जावीत.
(8) परवानगीप्राप्त रक्कम जमा केली जाण्यापूर्वी पोचपावती दिली जाईल.
(9) नोव्हेंबर 9, 2016 ते डिसेंबर 30, 2016 ह्यादरम्यान नोट-सादरकर्ता विदेशात होता; त्याच्या खात्याने केवायसी निकष पूर्ण केले आहेत, इतर अटीही पूर्ण केल्या आहेत आणि सादर केलेल्या नोटांचा खरेपणा ह्यांची खातरजमा केल्यानंतर, परवानगीप्राप्त रक्कम त्याच्या खात्यात जमा केली जाईल व त्याबाबत त्याला कळविले जाईल.
(4) कालावधी/मुदत
ही सुविधा, निवासी व्यक्तींसाठी जानेवारी 2, 2017 ते मार्च 31, 2017 पर्यंत, आणि अनिवासी व्यक्तींसाठी जानेवारी 2, 2017 ते जून 30, 2017 पर्यंत खुली/उपलब्ध असेल.
(5) सादरीकरण
सादर केलेल्या एसबीएनचे मूल्य जमा/क्रेडिट करण्यास रिझर्व बँकेने नकार दिल्यामुळे बाधित झालेली कोणतीही व्यक्ती, त्याला असा नकार कळविण्याच्या चौदा दिवसांच्या आत, रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळाकडे त्याबाबत सादरीकरण करु शकते. अशी सादरीकरणे, केंद्रीय मंडळ, भारतीय रिझर्व बँक, सचिव विभाग, केंद्रीय कार्यालय बिल्डिंग, 16 वा मजला, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई – 400 001 ह्यांचेकडे पाठवावीत. असे सादरीकरण ई-मेलनेही पाठविता येईल. |