आरबीआय/2016-17/177
डीबीआर.एएमएल.बीसी.47/14.01.01/2016-17
डिसेंबर 08, 2016
विनियमित केलेल्या सर्व संस्था,
महोदय/महोदया,
तुमचा ग्राहक जाणा वरील महानिदेशांमधील बदल/सुधारणा
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35 अ खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, तुमचा ग्राहक जाणा वरील महानिदेशांमध्ये काही सुधारणा/बदल करण्याचे ठरविण्यात आले आहे. अधिसूचित केलेले दोन मुख्य बदल पुढीलप्रमाणे आहेत.
(1) काही निर्बंधासह, वन टाईम पिन (ओटीपी) वर आधारित ई-केवायसीला परवानगी देण्याचे ठरविण्यात आले आहे.
(2) सर्व अधिसूचित वाणिज्य बँकांनी (एससीबी), जानेवारी 1, 2017 रोजी किंवा त्यानंतर उघडलेल्या सर्व नवीन वैय्यक्तिक खात्यांसंबंधी केवायसीची माहिती, केंद्रीय केवायसी अभिलेख पंजीकडे (रजिस्ट्री) अपरिहार्यपणे अपलोड करणे अत्यावश्यक आहे. तथापि, जानेवारी 1, 2017 दरम्यान उघडण्यात आलेल्या खात्यांची माहिती अपलोड करण्यासाठी, एससीबींना फेब्रुवारी 1,20017 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. एससीबी व्यतिरिक्त असलेल्या आरईंनी, 1 एप्रिल, 2017 रोजी किंवा त्यानंतर उघडण्यात आलेल्या सर्व नवीन व्यक्तिगत खात्यांची केवायसी माहिती सीकेवायसीआरकडे अपलोड करणे आवश्यक आहे.
वरील आवश्यकतेव्यतिरिक्त, विद्यमान सूचनांमधील काही इतर बदल/स्पष्टीकरणे, अधिसूचना क्र. डीबीआर. एएमएल. बीसी. क्र. 18/14.01.001/2016-17 दि. डिसेंबर 8, 2016 मध्ये दिलेल्या अधिसूचनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
आपली विश्वासु
(लिली वडेरा)
मुख्य महाव्यवस्थापक |