आरबीआय/2016-17/169
डीसीएम(पीएलजी)क्र. 1508/10.27.00/2016-17
डिसेंबर 02, 2016
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी
अधिकारी (चलन भांडार ठेवणा-या सर्व बँका)
महोदय,
बँक नोटांचे वाटप
“कृपया, रब्बी पीक हंगामासाठी रोकड उपलब्ध करणे- बँकांना सल्ला” वरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी) क्र.1345/10.27.00/2016-17 ,दि. नोव्हेंबर 22, 2016 चा संदर्भ घ्यावा.
(2) वरील परिपत्रकाबरोबर सातत्य राखून आणि ग्रामीण शाखांना तसेच पोस्ट ऑफिसे व डीसीसीबी ह्यांना पुरेशा प्रमाणात बँक नोटांचे वाटप होत असल्याची खात्री करुन घेण्यासाठी, बँकांना सांगण्यात येते की, चलन भांडारांमधून चलनी नोटांच्या वितरणाची योजना/साह्य करण्यासाठी त्यांनी, राज्य स्तरीय बँकर्स समितीखाली (एसएलबीसी) कार्य करणा-या जिल्हा समन्वयकांनाही (लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर्स) ह्यात समाविष्ट करावे.
(3) असेही दिसून येत आहे की, चलन भांडार असलेल्या बँका, रोकड देण्याबाबत, त्यांच्या स्वतःच्याच बँक शाखांना प्राधान्य देत आहेत. ह्यासाठी, चलन भांडार असलेल्या ह्या बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी, इतर बँका व त्यांच्या स्वतःच्या शाखांबाबत असमान वाटप होत असल्याची भावना दूर करण्यास डोळस प्रयत्न करावेत.
आपली विश्वासु
(सुमन रे)
महाव्यवस्थापक |