आरबीआय/2016-17/172
डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1431/02.14.003/2016-17
डिसेंबर 06, 2016
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी/
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका - आरआरबींसह/नागरी सहकारी बँका/
राज्य सहकारी बँका/जिल्हा केंद्रीय सहकारी बँका/प्राधिकृत कार्ड पेमेंट नेटर्वक्स/
पेमेंट बँका व लघु वित्त बँका
महोदय/ महोदया,
कार्ड नॉट प्रेझेंट व्यवहार - कार्ड नेटवर्क असलेल्या/दिल्या गेलेल्या सत्यांकन उपायांसाठी रु.2,000/- पर्यंतच्या प्रदानांसाठीच्या अतिरिक्त सत्यांकन घटकामध्ये शिथिलता
फुटकळ प्रदान प्रणालीची सुरक्षितता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी, सर्व ग्राहकांच्या सहयोगाने, भारतीय रिझर्व बँक, अनेक पुढाकार घेत आली आहे. ह्या बाबतीत, ऑनलाईन अॅलर्ट्स आणि सत्यांकनाचे अतिरिक्त घटक ह्यावरील सूचनांसह, सुरक्षितता व जोखीम टाळण्यावर, वेळोवेळी निरनिराळ्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. ह्या उपायांमुळे, कार्डांद्वारे प्रदाने करण्यात ग्राहकांचा विश्वास वाढण्यास मदतच झाली आहे.
(2) उद्योग क्षेत्रातील काही विभागांकडून, कमी मूल्याच्या, ऑन लाईन कार्ड नॉट प्रेझेंट (सीएनपी) व्यवहारांसाठीच्या एएफए आवश्यकतांचे पुनरावलोकन केले जाण्यासाठी, रिझर्व बँकेकडे विनंती अर्ज येत आहेत. ह्यापैकी बहुतेक विनंती अर्ज हे, व्यापारी-विशिष्ट अशा एएफए आवश्यकतांबाबतच असल्याने ते प्रणाली स्तरावर योग्य नव्हते. कमी मूल्याच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना अपेक्षित असलेले, पुरेशा सुरक्षेसह ग्राहक सोयीसाठीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, पर्यायी उपाय, प्राधिकृत कार्ड नेटर्वक्सकडून अपेक्षित आहे. ह्या मॉडेलमध्ये, कार्ड देणा-या बँका, संबंधित कार्ड नेटर्वक्सचे पेमेंट ऑथेटिकेशन उपाय, त्यांच्या ग्राहकांना पर्यायी धर्तीवर देतील. हा पर्याय निवडणा-या ग्राहकांना कार्डाच्या तपशीलाची नोंद व कार्ड देणा-या बँकेचा एएफए ह्यांचे पंजीकरण केवळ एकदाच करावे लागेल.
त्यानंतर, पंजीकृत ग्राहकांना, हा उपाय देऊ करणा-या व्यापार-ठिकाणी केलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी कार्डाचा तपशील पुनः नोंदवावा लागणार नाही व त्यामुळे वेळ व प्रयासांची बचत होईल. ह्या मॉडेलमध्ये, आधीच पंजीकृत केलेला कार्डाचा तपशील प्रथम घटक असेल. तर उपायाशी लॉगइन करण्यासाठी वापरलेली ओळख (उपाय देणा-या कार्ड नेटवर्कने दुजोरा दिलेला) ही, सत्यांकनाचा अतिरिक्त घटक असेल.
(3) त्यानुसार, कार्ड नेटर्वक्सने, संबंधीत कार्ड देणा-या व मिळविणा-या बँकांच्या सहभागाने, उपलब्ध केलेल्या पेमेंट ऑथेंटिकेशन सोल्युशन्ससाठीच्या, रु.2,000/- पर्यंतच्या ऑनलाईन सीएनपी व्यवहारांसाठीची एएफए-आवश्यकता, पुढील अटींवर शिथिल करण्यात येत आहे.
(1) कार्डे देणा-या व मिळविणा-या बँकांच्या सहभागानेच, केवळ प्राधिकृत कार्ड नेटर्वक्सद्वारा असे प्रदान सत्यांकन उपाय उपलब्ध केले जातील.
(2) हा उपाय ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी ग्राहकांची सहमती घेतली जाईल.
(3) अशा उपायांखालील एएफए साठीची शिथिलता, सर्व व्यापारी वर्गांमध्ये, प्रति व्यवहार रु.2,000/- ह्या कमाल मूल्यासाठीच्या कार्ड नॉट प्रेझेंट व्यवहारांना लागु असेल. प्रति व्यवहार ह्याहीपेक्षा कमी मर्यादा ठेवण्यासाठी, त्यांच्या ग्राहकांना साह्य करण्याचे स्वातंत्र्य बँका व कार्ड नेटर्वक्सना देण्यात आले आहे.
(4) रु.2,000/- ह्या व्यवहार-मर्यादेच्या पलिकडे/वर, कार्ड नॉट प्रेझेंट व्यवहार हा, अपरिहार्य एएफएच्या विद्यमान सूचनांनुसारच केला जावा; ह्या मर्यादेच्या खालील व्यवहार-मूल्यांसाठी, पूर्वी एएफएच्या पूर्वीप्रमाणे असलेल्या इतर स्वरुपांचा उपयोग करण्याची निवड ग्राहक करु शकतात.
(5) बँकांना/कार्ड नेटर्वक्सना योग्य वाटत असल्यानुसार त्यांनी सुयोग्य अशा गती-तपासण्या (म्हणजे, प्रति दिवस/सप्ताह/महिना अशा कमी मूल्याच्या किती व्यवहारांना परवानगी द्यावी) ठेवाव्यात.
(6) विद्यमान चार्ज बॅक प्रक्रियेत कोणताही बदल नाही.
(4) ह्याशिवाय, ग्राहक जाणीव संरक्षणाच्या हित-संबंधात, असे उपाय देऊ करणा-या बँकांना व प्राधिकृत कार्ड नेटर्वक्सना पुढील प्रमाणे सांगण्यात येत आहे.
(1) ग्राहकांना जाणीव करुन द्यावी की, हा उपाय, केवळ रु.2,000/- पर्यंतच्या कार्ड नॉट प्रेझेंट व्यवहारांसाठीची एक पर्यायी सुविधा असून, इतर एएफएचा पूर्वीप्रमाणेच उपयोग करुन प्रदाने करण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे.
(2) ह्याचा उपयोग, जोखीम व ग्राहक तक्रार निवारणासाठीची यंत्रणा आणि निरनिराळ्या वाहिन्यांमार्फत (वेबसाईट, फोन बँकिंग, एसएमएस, आय व्ही आर) मार्फत तक्रार कळविण्याबाबत ग्राहकांना शिक्षण द्यावे.
(3) ग्राहकाची नोंदणी/पंजीकरण करतेवेळी, ग्राहकावर येणारे कमाल दायित्व (असल्यास) तसेच व्यवहार करत असताना झालेली फसवणुक कळविण्याची जबाबदारी ग्राहकाला निदेशित करावी.
(4) सुरक्षेमध्ये भंग किंवा प्राधिकृत कार्ड नेटवर्कमध्ये तडजोड झाल्याचे आढळून आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी घेतली जावी.
(5) प्राधिकृत कार्ड नेटवर्क ऑपरेटर्स, सुयोग्य नेटवर्क स्तरीय व्यवस्था/करार ह्यांच्यामार्फत, इतर प्राधिकृत कार्ड नेटर्वक्स मधील कार्ड धारकांच्या सहभागाला सहाय्य करु शकतात.
(6) हे निदेश, प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम, 2007 (2007 चा 51) च्या कलम 18 सह वाचित कलम 10(2) खाली देण्यात आले आहेत.
आपली विश्वासु,
(नंदा एस दवे)
मुख्य महाव्यवस्थापक
|