आरबीआय/2016-17/229
डीबीआर.आरआरबी.बीसी.क्र. 53/31.01.001/2016-17
फेब्रुवारी 16, 2017
सर्व प्रादेशिक ग्रामीण बँका
महोदय/महोदया,
सुवर्ण कर्जाची परतफेड
कृपया आमचे परिपत्रक आरपीसीडी.सीओ.आरआरबी.बीसी.क्र.22/03.05.34/2010-11 दि. सप्टेंबर 22, 2010 चा संदर्भ घ्यावा. त्यामध्ये, बुलेट पुनर् प्रदान पर्यायासह, रु.1.00 लाख पर्यंतची सुवर्ण कर्जे देण्यास, प्रादेशिक ग्रामीण बँकांना परवानगी देण्यात आली होती.
(2) ह्याबाबत आढावा घेतल्यानंतर, ह्या योजनेखाली देता येण्याजोग्या कर्जाची रक्कम पुढील अटींवर, रु.1.00 लाखांवरुन रु.2.00 लाख करण्याचे ठरविण्यात आले आहे.
(1) ह्या कर्जाची मुदत ते मंजुर केलेल्या तारखेपासून बारा महिन्यापेक्षा अधिक नसावी.
(2) कर्ज-खात्यावर एक महिन्याच्या अवकाशाने व्याज आकारले जाईल. परंतु ते, मंजुर केल्याच्या तारखेपासून 12 महिन्याच्या अखेरीसच, मुद्दलासह देय असेल.
(3) आरआरबींनी, सातत्याने कर्जाच्या थकित रकमेवर व्याजासह 75% कर्ज-मूल्य (एलटीव्ही) गुणोत्तर ठेवावे. तसे न केल्यास ते कर्ज अकार्यकारी अॅसेट (एनपीए) समजले जाईल.
(4) सोन्याचे मूल्यांकन, परिपत्रक आरपीसीडी.आरआरबी.आरसीबी.बीसी.क्र.08/03.05.33/2014-15 दि. जुलै 1, 2014 मधील परिच्छेद 3 मध्ये दिलेल्या सूचनांनुसार केले जाईल.
(3) येथे स्पष्ट करण्यात येते की, सोने/सोन्याचे अलंकार ह्यांच्या तारण प्रतिभूतीविरुध्द मंजुर केलेली पीक-कर्जे, अशा कर्जाबाबतच्या उत्पन्न ओळख, अॅसेट वर्गीकरण व तरतुदीकरण नॉर्म्सनेच नियंत्रित केली जातील.
आपला विश्वासु,
(सौरव सिन्हा)
मुख्य महाव्यवस्थापक |