आरबीआय/2016-17/235
आयडीएमडी.सीडीडी.क्र.2188/14.04.050/2016-17
फेब्रुवारी 23, 2017
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
(आरआरबी सोडून),
नेमलेली पोस्ट ऑफिसे, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसएचसीआयएल),
नॅशनल स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. आणि बाँबे स्टॉक एक्सचेंज लि.
महोदय/महोदया,
सार्वभौम सुवर्ण रोखे, 2016-17 - मालिका 4 - कार्यकारी मार्गदर्शक तत्वे
कृपया, सार्वभौम सुवर्ण रोखे - 2016-17 मालिका 4 वरील जीओआय अधिसूचना एफ क्र 4(16)-B(W&M)/2016 व आरबीआयचे परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.2187/14.04.050/2016-17 दि. फेब्रुवारी 23, 2017 चा संदर्भ घ्यावा. ही पत्रके आमच्या वेबसाईटवर (www.rbi.org.in) टाकण्यात आली असून ह्या योजनेबाबतची मार्गदर्शक तत्वे खाली देण्यात आली आहेत.
(1) अर्ज
निवेशकांकडून अर्जाचे फॉर्म्स, बँकिंगच्या नियमित कालामध्ये, फेब्रुवारी 27, 2017 ते मार्च 3, 2017 दरम्यान, शाखांमध्ये स्वीकारले जातील. स्वीकारर्कत्या कार्यालयांनी खात्री करुन घ्यावी की हे फॉर्म्स सर्व बाबतीत पूर्णपणे भरले गेले आहेत, कारण अपूर्ण फॉर्म्स फेटाळले जाऊ शकतात. आवश्यक तेथे अर्जदाराकडून अतिरिक्त माहिती मिळविण्यात यावी. अधिक चांगली ग्राहक सेवा मिळविण्यासाठी, स्वीकारर्कत्या कार्यालयांनी, निवेशकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व्यवस्था कराव्यात.
(2) संयुक्त धारण व नामनिर्देशन
अनेक संयुक्त धारक व नामनिर्देशित (प्रथम धारकाचे) ठेवण्यास परवानगी आहे. रीतीनुसार, अर्जदारांकडून आवश्यक तो तपशील घेता येईल.
(3) तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) आवश्यकता
ह्यासाठीचे तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) नॉर्म्स हे, प्रत्यक्ष स्वरुपात सोने-खरेदी ही लागु असणारेच असतील. पारपत्र, पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन) कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड ह्यासारखे ओळख पटविणारे कागदपत्र आवश्यक असतील. केवळ अल्पवयीन व्यक्तींसाठी, बँक खाते क्रमांकही वैध केवायसी पडताळणीसाठी विचारात घेतला जाऊ शकतो. ही केवायसी प्रक्रिया देणा-या बँका/एसएचसीआयएल कार्यालये/पोस्ट ऑफिसांकडून केली जाईल.
(4) अर्जाच्या पैशांवरील व्याज
प्रदान प्रत्यक्ष जमा होण्याच्या तारखेपासून ते समायोजनाच्या तारखेपर्यंत, म्हणजे ते निधीहीन असलेल्या कालावधीसाठी, अर्जदारांना प्रचलित असलेल्या बचत बँक दराने व्याज दिले जाईल. अर्जदाराचे खाते स्वीकारर्कत्या बँकेत नसल्यास, ते व्याज, अर्जदाराने दिलेल्या तपशीलानुसार असलेल्या खात्यात इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरणाने जमा केले जाईल.
(5) रद्दीकरण
इश्यु बंद होण्याच्या तारखेपर्यंत (म्हणजे मार्च 3, 2017) अर्ज रद्द करण्यास परवानगी आहे. सुवर्ण रोखे खरेदी करण्याच्या सादर केलेल्या विनंतीचे अंशतः रद्दीकरण करण्यास परवानगी नाही. अर्ज रद्द केल्यास अर्जांसाठीच्या पैशांवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
(6) लिएन तयार करणे
हे रोखे, सरकारी प्रतिभूती असल्याकारणाने, त्याबाबत लिएन मेकिंग इत्यादिसाठी, सरकारी प्रतिभूती अधिनियम, 2006 व त्याखाली तयार केलेल्या नियमांच्या तरतुदी लागु होतील.
(7) एजन्सी व्यवस्था
अनुसूचित वाणिज्य बँका, त्यांच्या वतीने अर्जाचे फॉर्म्स गोळा करण्यासाठी, एनबीएफसी, एनएससी एजंट्स व इतरांची नेमणुक करु शकतात. ह्या बँका, अशा संस्थांबरोबर काही व्यवस्था किंवा हातमिळवणी करु शकतात. वितरणासाठीची दलाली, स्वीकारर्कत्या कार्यालयांना मिळालेल्या व मिळालेल्या अर्जांबाबतच्या एकूण वर्गणीच्या रु. एक प्रतिशत दराने दिले जाईल आणि स्वीकारकर्ती कार्यालये, दलालीची किमान 50% रक्कम, एजंट किंवा सब-एजंट्सबरोबर, त्यांनी आणलेल्या व्यवसायासाठी शेअर करतील.
(8) आरबीआयच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत प्रक्रिया करणे
सार्वभौम सुवर्ण रोखे, आरबीआयच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत, अनुसूचित वाणिज्य बँकांच्या शाखा व नेमलेली पोस्ट ऑफिसे येथे वर्गणी आणण्यासाठी उपलब्ध असतील. ई-कुबेर प्रणालीमध्ये, इनफिनेट किंवा इंटरनेट मार्फत प्रवेश मिळविता येऊ शकतो. स्वीकारर्कत्या कार्यालयांनी, त्यांना मिळालेल्या वर्गणीसाठी डेटा एंटर करावा किंवा बल्क अपलोड करावे. अनवधानाने झालेल्या चुका टाळण्यासाठी, त्यांनी केलेल्या डेटा-एंट्रीच्या बिनचुकपणाची खात्री करुन घ्यावी. अर्जाच्या पोचपावतीबाबत त्यांना ताबडतोब दुजोरा दिला जाईल. ह्याशिवाय, स्वीकारर्कत्या कार्यालयांना, त्यांचा डेटा बेस अद्यावत करण्यासाठी, अपलोड केलेल्या फाईल्सचा कन्फर्मेशन स्क्रोलही दिला जाईल. वाटप करण्याच्या तारखेस, म्हणजे, मार्च 17, 2017 रोजी, सर्व वर्गण्यांसाठी, एकल/प्रमुख धारकांच्या नावाने धारण-प्रमाणपत्रे निर्माण केली जातील. स्वीकारर्कत्या कार्यालये ती प्रमाणपत्र डाऊनलोड करुन प्रिंट आऊट घेऊ शकतात. ज्यांनी ई-मेल अॅड्रेस दिला आहे अशा निवेशकांनाही ही धारण-प्रमाणपत्रे ई-मेलने पाठविली जातील. अर्जांमध्ये दिलेला तपशील, डिपॉझटरीमधील तपशीलाशी जुळत असण्याच्या अटीवर, त्यांच्या डिमॅट खात्यात ह्या प्रतिभूती वाटपा नंतर 2-3 दिवसात जमा केल्या जातील.
(9) धारण प्रमाणपत्रांची छपाई
ही धारण-प्रमाणपत्रे, 100 जीएसएमच्या ए4 आकाराच्या कागदांवर छापणे आवश्यक आहे.
(10) सेवा व पाठपुरावा
स्वीकारकर्ती कार्यालये (म्हणजे, अनुसूचित वाणिज्य बँकांच्या शाखा, नेमलेली पोस्ट ऑफिसे, एसएचसीआयएल व स्टॉक एक्सचेंजेस (एनएसई लि. व बीएसई)) ही ग्राहकांचे ‘मालक’ असतील व ह्या रोख्यांबाबत आवश्यक त्या सेवा पुरवितील (उदा. संपर्क तपशील अद्यावत करणे, मुदतपूर्व रोखीकरणासाठीच्या विनंत्या स्वीकारणे इत्यादि) हे रोखे परिपक्व होऊन त्यांचे पुनर् प्रदान केले जाईपर्यंत स्वीकारर्कत्या कार्यालयांनी अर्ज जपून ठेवणे आवश्यक आहे.
(11) व्यापार क्षमता
भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केलेल्या तारखेस, हे रोखे ट्रेडिंग करण्यासाठी पात्र असतील (नोंद घेतली जावी की, केवळ डिमॅट स्वरुपात धारण केलेले व डिपॉझीटरीमध्ये ठेवलेले रोखेच, स्टॉक एक्सचेंजेसमध्ये ट्रेड केले जाऊ शकतील).
(12) संपर्क तपशील
प्रश्न/स्पष्टीकरणासाठी पुढीलप्रमाणे ई-मेल करावा.
(अ) सार्वभौम सुवर्ण रोखे संबंधित - ई-मेल पाठविण्यासाठी येथे क्लिक करा.
(ब) आयटी संबंधित - ई-मेल पाठविण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला विश्वासु,
(राजेंद्र कुमार)
महाव्यवस्थापक |