आरबीआय/2016-17/260
डीपीएसएस.सीओ.सीएचडी.क्र./2720/03.01.03/2016-17
मार्च 29, 2017
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (प्रादेशिक ग्रामीण बँकांसह)/नागरी सहकारी बँका/
राज्य सहकारी बँका/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका/स्थानिक वित्तीय बँका.
महोदय/महोदया,
एप्रिल 1, 2017 रोजी सर्व प्रदान प्रणाली बंद राहणार
आमचे अलिकडील परिपत्रक आरबीआय/2016-17/257 डीपीएसएस.सीओ.सीएचडी.क्र./2695/03.01.03/2016-17 दि. मार्च 25, 2017 चा संदर्भ घ्यावा. त्यात सांगण्यात आले होते की, आरटीजीएस व एनईएफटी सह सर्व प्रदान प्रणाली, कामकाजाच्या सामान्य दिवसांप्रमाणेच, मार्च 25 ते एप्रिल 1, 2017 दरम्यान (शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवसासह) कार्यरत असतील. तथापि, पुनर्विचार केल्यावर ठरविण्यात आले आहे की, एप्रिल 1, 2017 रोजी सर्व प्रदान प्रणाली बंद राहतील. ह्याबाबतचा एक वेगळा रेडियो संदेश, संबंधित प्रणाली द्वारा सभासद बँकांना पाठविला जाईल.
ह्या संदर्भात येथे स्पष्ट करण्यात येते की, आमचे परिपत्रक आरबीआय/2016-17/255 डीपीएसएस.सीओ.सीएचडी.क्र 2656/03.01.03/2016-17 दि. मार्च 23, 2017 अन्वये (मार्च 30 व 31, 2017 रोजी विशेष समायोजन प्रक्रिया करण्याबाबत) दिलेल्या सूचनांमध्ये कोणताही बदल नाही.
आपली विश्वासु,
(नंदा एस दवे)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक |