आरबीआय/2016-17/270
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.58/12.01.001/2016-17
एप्रिल 6, 2017
अध्यक्ष/सीईओ - सर्व अनुसूचित असलेल्या व अनुसूचित नसलेल्या बँका
महोदय/महोदया,
बँक दरामधील बदल
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.19/12.01.001/2016-17 दि. ऑक्टोबर 4, 2016 चा संदर्भ घ्यावा.
(2) 2017-18 च्या प्रथम द्वैमासिक नाणेविषयक धोरण दि. एप्रिल 6, 2017 मध्ये घोषित केल्यानुसार, एप्रिल 6, 2017 पासून, बँक दर, 6.75 टक्क्यांपासून 25 बेसिस पाँईट्सनी, 6.50 टक्क्यांपर्यंत समायोजित झालेला आहे.
(3) राखीव निधी आवश्यकतेमधील तुटीबाबतचे सर्व दंडात्मक व्याजदर (जे खास करुन बँक दरांशी जोडलेले आहेत) देखील जोडपत्रात दिल्याप्रमाणे सुधारित झालेले आहेत.
आपला विश्वासु,
(सौरव सिन्हा)
मुख्य महाव्यवस्थापक
सोबत – वरीलप्रमाणे
जोडपत्र
बँक दरांशी जोडणी असलेले दंडात्मक व्याजदर
बाब |
विद्यमान दर |
सुधारित दर (अप्रिल 6, 2017 पासून लागु) |
राखीव निधी आवश्यकतांमधील तुटींवरील दंडात्मक व्याजदर (तुटीच्या कालावधीवर अवलंबून) |
बँक दर अधिक 3.0 परसेंटेज पाँईंट्स (9.75 टक्के) किंवा बँक दर अधिक 5.0 परसेंटेज पाँईंट्स (11.75 टक्के). |
बँक दर अधिक 3.0 परसेंटेज पाँईंट्स (9.50 टक्के) किंवा बँक दर अधिक 5.0 परसेंटेज पाँईंट्स (11.50 टक्के). |
|