भारत सरकार
वित्त मंत्रालय
आर्थिक व्यवहार विभाग
नवी दिल्ली, दि. एप्रिल 19, 2017
अधिसूचना
प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना, अधिसूचना क्र. एसओ 4061 ई मध्ये सुधारणा
(1) एसओ - वित्त अधिनियम, 2016 (2016 चा 28) च्या (ह्यानंतर ह्याला हा अधिनियम म्हटले आहे) कलम 199 ब च्या खंड (क) ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारत सरकार येथे, अधिसूचना क्र. एसओ 204 (ई) दि. जानेवारी 19, 2017 ने सुधारित केलेल्या (व त्यानंतर अधिसूचना क्र. एसओ 365 (ई) दि. फेब्रुवारी 7, 2017 ने सुधारित केलेल्या), अधिसूचना क्र. एसओ 4061 (ई) दि. डिसेंबर 16, 2016 अन्वये अधिसूचित करण्यात आलेल्या, प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजनाच्या खंड 5 मध्ये विहित केलेल्या अटी सुधारित करत आहे.
(2) मूळ अधिसूचनेमधील खंड 5 च्या ऐवजी पुढील मजकुर घातला जाईल :
“(5) ठेवीची परिणामकारक तारीख - बाँड्स लेजर अकाऊंट उघडण्याची तारीख ही ज्याबाबत देय कर, अधिभार व दंड, 31 मार्च 2017 पर्यंत मिळाला आहे अशा ठेवी अधिकृत बँकेकडून, रिझर्व बँकेला प्राप्त झाल्याची तारीख असेल.
मात्र ह्याशिवाय, अशा ठेवींची तारीख कोणत्याही बाबतीत 30 एप्रिल 2017 पलिकडे असणार नाही.”
|