Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (127.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 13/07/2017
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग म्हणून वर्गीकरण करण्यासाठी, कारखाना व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणुक :- विश्वासपात्र कागदपत्र

आरबीआय/2017-18/21
एफआयडीडी.एमएसएमई अँड एनएफएस.बीसी.क्र.10/06.02.31/2017-18

जुलै 13, 2017

सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (प्रादेशिक ग्रामीण बँका सोडून)

महोदय/महोदया

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग म्हणून वर्गीकरण करण्यासाठी, कारखाना व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणुक :- विश्वासपात्र कागदपत्र

कृपया ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला कर्ज’ ह्यावरील आमचे महानिदेश एफआयडीडी.एमएसएमई अँड एनएफएस.3/06.02.31/2016-17 दिनांक जुलै 21, 2016 आणि भारत सरकार नवी दिल्ली येथील एमएसएमई मंत्रालयाने दिलेल्या अधिसूचना क्र. एस.ओ.1722(E) दिनांक ऑक्टोबर 5, 2006 चा संदर्भ घ्यावा. ह्या अधिसूचनेच्या परिच्छेद 2 अनुसार, कारखाना व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणुक काढताना, तो कारखाना व यंत्रसामुग्री जुनी असो किंवा नवी असो, केवळ त्यांची मूळ किंमतच हिशेबात घेण्यात यावी.

(2) ह्या संदर्भात, एमएसएमई मंत्रालय, भारत सरकार ह्यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र (ओएम) एफ.क्र.12(4)/2017-एसएमई दि. मार्च 8, 2017 अन्वये स्पष्ट केले होते की, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग म्हणून वर्गीकृत करण्याबाबत, त्या उद्योगाची कारखाना व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणुक पडताळण्यासाठी पुढील कागदपत्रे विश्वासार्ह मानावीत.

(1) कारखाना व यंत्रसामुग्रीच्या खरेदीच्या इनव्हॉईसची प्रत. किंवा

(2) ऑडिटेड अकाऊंट्समधील, कारखाना व यंत्रसामुग्री मधील गुंतवणुकीसाठीचा ग्रॉस ब्लॉक किंवा

(3) कारखाना व यंत्रसामुग्रीच्या खरेदीच्या किंमतीबाबत चार्टर्ड अकाऊंटंटने दिलेले प्रमाणपत्र.

(3) ह्याशिवाय, मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सूक्ष्म, लघु किंवा मध्यम उद्योग म्हणून वर्गीकृत करण्यासाठीच्या कारखाना व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणुकीसाठी त्यांची खरेदीची किंमत हिशेबात घेतली जावी - पुस्तकी मूल्य नव्हे. (खरेदीची किंमत वजा घसारा)

(4) वरील मंत्रालयाने दिलेल्या पत्र ओएम एफ.क्र 12(4) / 2017 – एसएमई दि. मे 31, 2017 अन्वये, वरील तरतुदीची जारी होणारी तारीख ही, एमएसएमईडी अधिनियम 2006 जारी होण्याच्या तारखेपासून असेल व सुरुवातीपासून (प्रॉस्पेक्टिवली) नसेल. ह्याशिवाय, वरील तरतुदी, एमएसएमईडी अधिनियम, 2006 च्या कलम 7(1)(अ) व कलम 7(1)(ब) ह्यांनाही (म्हणजे माल उत्पादन करणा-या व सेवा देणा-याही) लागु असतील.

आपली विश्वासु

(उमा शंकर)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä