भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि.’ चा समावेश |
आरबीआय/2017-18/54
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.85/12.07.150/2017-18
सप्टेंबर 7, 2017
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
महोदय,
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि.’ चा समावेश
येथे कळविण्यात येते की, ऑगस्ट 25, 2017 च्या भारतीय राजपत्रात (भाग 3 - विभाग 4) प्रसिध्द केल्यानुसार व अधिसूचना डीबीआर.पीएसबीडी.क्र.467/16.02.006/2017-18 दि. जुलै 3, 2017 अन्वये ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा समावेश, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये करण्यात आला आहे.
आपला विश्वासु,
(एम.जी.सुप्रभात)
उप महाव्यवस्थापक |
|