आरबीआय/2017-18/79
डीजीबीए.जीबीडी.क्र.1007/15.04.001/2017-18
ऑक्टोबर 17, 2017
सर्व एजन्सी बँका
महोदय/महोदया,
सुवर्ण मुद्रीकरण योजना 2015
कृपया वरील विषयावरील आरबीआयचे महानिदेश क्र.डीबीआर. आयबीडी.क्र.45/23.67.003/2015-16, दि. ऑक्टोबर 22, 2015 (मार्च 31, 2016 पर्यंत अद्यावत) सह वाचित, आमचे डीजीबीए परिपत्रक डीजीबीए.जीएडी.क्र.2294/15.04.001/2016-17, दि. मार्च 6, 2017 चा संदर्भ घ्यावा.
(2) असे ठरविण्यात आले आहे की, मध्यम व दीर्घ मुदतीच्या सरकारी ठेवींबाबत (एमएलटीजीडी) च्या बँकांनी केलेल्या प्रदानांची भरपाई, आरबीआयच्या नागपुर येथील केंद्रीय लेखा विभागा (सीएएस) कडून केली जाईल.
(3) त्यानुसार, बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी ठेवीदारांना देय असलेल्या व्याजाची रक्कम ताबडतोब द्यावी आणि नोंद घ्यावी की, भविष्यकालातही, ठेवीदारांना द्यावयाचे व्याज त्यांनी ठरलेल्या तारखेसच द्यावयाचे आहे. प्रदान केल्यानंतर, आरबीआय (सीएएस, नागपुर) मार्फत बँका सरकारकडे दावा सादर करु शकतात.
आपला विश्वासु,
(डी जे बाबु)
उप-महाव्यवस्थापक |