सार्वभौम सुवर्णरोखे योजना, अधिसूचना क्र. 4 (25) - डब्ल्यु अँड एम/2017 मध्ये सुधारणा |
भारत सरकार,
वित्त मंत्रालय,
आर्थिक कार्य विभाग
नवी दिल्ली, दि. ऑक्टोबर 25, 2017
अधिसूचना
सार्वभौम सुवर्णरोखे योजना, अधिसूचना क्र. 4 (25) - डब्ल्यु अँड एम/2017 मध्ये सुधारणा
(1) जीएसआर : सरकारी प्रतिभूती अधिनियम 2006 च्या (2006 चा 38) कलम 3 च्या खंड (3) ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, केंद्र सरकार, येथे अधिसूचना क्र. एफ.4 (25)- डब्ल्यु अँड एम /2017 दि. ऑक्टोबर 6, 2017 [अधिसूचना क्र. जीएसआर 1225 (ई)] अन्वये अधिसूचित केलेल्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या खंड 13 मध्ये विहित केलेल्या अटींमध्ये सुधारणा करत आहे.
(2) मूळ अधिसूचनेतील खंड 13 ऐवजी पुढील मजकुर देण्यात आला आहे.
’13. वैधानिक तरलता गुणोत्तरासाठी पात्रता : केवळ लिएन/तारण/प्लेज ची प्रक्रिया आवाहित करुन बँकांनी मिळविले रोखेच, वैधानिक तरलता गुणोत्तरासाठी ग्राह्य समजले जातील’ |
|