आरबीआय/2017-18/103
डीजीबीए.जीबीडी.1472/31.02.007/2017-18
नोव्हेंबर 30, 2017
सर्व एजन्सी बँका
महोदय
एजन्सी बँकांकडून व्यवहारांचे अहवाल आरबीआयकडे पाठविले जाणे
आमच्या निदर्शनास आणण्यात आले आहे की, काही एजन्सी बँका, संबंधित सरकारी विभागांकडून प्राधिकृतता घेतल्याशिवाय, चालु व्यवहारांसह सरकारी व्यवहारांचा अहवाल लक्षणीय विलंबाने आरबीआयकडे सादर करत आहेत.
(2) विद्यमान सूचनांनुसार, संबंधित महिन्यानंतरचा महिन्यातील 8 तारखेनंतर कळविण्यात आलेले व त्या आधीच्या महिन्यांसाठी असलेले सरकारी व्यवहार (इलेक्ट्रॉनिक तसेच प्रत्यक्ष स्वरुपातील), संबंधित राज्य सरकारच्या सक्षम अधिकारी यांचा दुजोरा घेतल्यानंतर, लेखाकर्मासाठी, एका वेगळ्या विवरणपत्रामार्फत आरबीआयकडे सादर करणे आवश्यक आहे.
(3) आता असे ठरविण्यात आले आहे की, केंद्र सरकारच्या व्यवहारांबाबत (इलेक्ट्रॉनिक तसेच प्रत्यक्ष स्वरुपातील) ते व्यवहार किंवा त्याबाबतचे समायोजन, व्यवहार केल्याच्या तारखेपासून 90 दिवसांनंतर कळविले गेल्यास, त्या एजन्सी बँकांनी, संबंधित मंत्रालय/विभागाकडून त्यासाठी पूर्व मंजुरी घेऊन, समायोजनासाठी असे व्यवहार कळविताना, ते व्यवहार, आरबीआयकडे वेगळ्याने सादर करणे आवश्यक आहे.
(4) येथे नोंद घेण्यात यावी की, सरकारी व्यवहार कळविण्याबाबत पाळावयाच्या कालावधी संबंधीच्या सर्व सूचनांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आपला विश्वासु,
(पार्थ चौधुरी)
महाव्यवस्थापक |