आरबीआय/2019-20/41
डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.377/02.10.002/2019-20
ऑगस्ट 14, 2019
प्रादेशिक ग्रामीण बँकांसह सर्व अनुसूचित बँका/
नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका/
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका/लघु वित्त बँका/
पेमेंट्स बँका/व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स
महोदय/महोदया,
एटीएम्सचा निःशुल्क एटीएम व्यवहार - स्पष्टीकरणे
कृपया वरील विषयावरील आमची परिपत्रके डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र. 316/02.10.002/2014-2015 दि. ऑगस्ट 14, 2014 आणि डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.659/02.10.002/2014-2015 दि. ऑक्टोबर 10, 2014 चा संदर्भ घ्यावा.
(2) आमच्या असे नजरेस आले आहे की, तांत्रिक कारणांनी, एटीएम्समध्ये नोटा उपलब्ध नसणे इत्यादींमुळे होऊ न शकलेले व्यवहारही निःशुल्क एटीएम व्यवहारांमध्ये समाविष्ट केले जातात.
(3) येथे स्पष्ट करण्यात येते की, हार्डवेअर, सॉफ्टवेअर संपर्काचे प्रश्न, एटीएममध्ये चलनी नोटा उपलब्ध नसणे ह्यासारखी तांत्रिक कारणे, आणि बँक/सेवादाता ह्यांचीच जबाबदारी असलेली इतर कारणे व अवैध पिन/सत्यांकन इत्यादींमुळे यशस्वी होऊ न शकलेले व्यवहार, ग्राहकांसाठी वैध व्यवहार म्हणून मोजले जाऊ नयेत. परिणामी त्यासाठी कोणतेही आकार लावले जाऊ नयेत.
(4) रोख रक्कम न काढण्याचे व्यवहार, (जसे शिल्लकेबाबत चौकशी, चेकबुकची विनंती, करांचे प्रदान, निधी हस्तांतरण) की जे ‘आमच्यावरील’ व्यवहार (म्हणजे, ज्या बँकेने कार्ड दिले आहे त्याच बँकेच्या एटीएमवर कार्डाचा उपयोग केल्यास) असतात, ते व्यवहार देखील, निःशुल्क एटीएम व्यवहार-संख्येचा भाग असणार नाहीत.
(5) हे निर्देश, प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम 2007 च्या (2007 चा 51) कलम 18 सह वाचित कलम 10(2) खाली देण्यात आले आहेत.
आपला
(पी. वासुदेवन)
मुख्य महाव्यवस्थापक |