आरबीआय/2019-20/39
एफआयडीडी.सीओ.प्लान.बीसी.7/04.09.01/2019-20
ऑगस्ट 13, 2019
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक व सीईओ
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
(प्रादेशिक ग्रामीण बँका व लघु वित्त बँका सोडून)
महोदय/महोदया,
प्राधान्य क्षेत्रातील कर्ज - बँकांनी एनबीएफसींना पुढे कर्ज देण्यासाठी कर्ज देणे.
कर्जदारांच्या गरजू क्षेत्रांना कर्ज देण्यात वाढ होण्यासाठी, ठरविण्यात आले आहे की, पंजीकृत एनबीएफसींना (एमएफआय सोडून इतर) पुढे कर्ज देण्यासाठी बँकांनी दिलेले कर्ज, पुढील अटींवर, संबंधित वर्गाखालील प्राधान्य क्षेत्रातील कर्ज म्हणून वर्गीकृत करण्यास पात्र असेल.
(1) कृषी :- एनबीएफसींनी, कृषीखाली मुदत कर्ज घटकाखाली पुढे दिलेले, प्रति कर्जदार रु.10 लाखांपर्यंतचे कर्ज
(2) सूक्ष्म व लघु व्यवसाय/उद्योग :- एनबीएफसींकडून पुढे देण्यासाठीचे प्रति कर्जदार रु.20 लाखांचे कर्ज
(3) गृहनिर्माण :- प्राधान्य क्षेत्रातील कर्जांवरील आमच्या महानिर्देशाच्या परिच्छेद 10.5 अन्वये एचएफसीद्वारा पुढे देण्यात येणा-या कर्जावरील विद्यमान मर्यादित, प्रति कर्जदार रु.10 लाख पासून, प्रति कर्जदार रु.20 लाख अशी वाढ.
(2) वरील पुढे कर्ज देण्याच्या मॉडेल खाली, ह्या परिपत्रकाच्या तारखेस किंवा त्यानंतर, एनबीएफसींनी बँकांकडून घेतलेल्या कर्जांमधून केवळ नवीन घेतलेली कर्जेच बँका वर्गीकृत करु शकतील. तथापि, विद्यमान ऑनलेंडिंग मार्गदर्शक तत्वांखाली एचएफसींनी दिलेली कर्जे, बँकांकडून प्राधान्य क्षेत्राखाली वर्गीकृत केली जाणे सुरुच राहील.
(3) पुढे देण्यासाठी एनबीएफसींना दिलेल्या कर्जांना, सातत्याने वैय्यक्तिक बँकेच्या एकूण प्राधान्य क्षेत्रातील कर्जाच्या पाच टक्के ह्या मर्यादेपर्यंत असण्याची मर्यादा असेल. ह्याशिवाय, वरील सूचना, चालु वित्तीय वर्षासाठी, मार्च 31, 2020 पर्यंतच वैध असतील व त्यानंतर त्यांचे पुनरावलोकन केले जाईल. तथापि, ऑनलेंडिंग मॉडेलखाली देण्यात आलेली कर्जे, परतफेड/परिपक्वतेच्या तारखेपर्यंत प्राधान्य क्षेत्रात वर्गीकृत केली जाणे सुरुच राहील.
(4) प्राधान्य क्षेत्रातील कर्जावरील महानिर्देशाच्या परिच्छेद 19 मध्ये, ऑनलेंडिंगखाली एमएफआयना द्यावयाच्या कर्जांवरील विद्यमान मार्गदर्शक तत्वे, एनबीएफसी-एमएफआयनाही लागु असणे सुरुच राहील.
(5) हे परिपत्रक दिल्याच्या तारखेपासून ही मार्गदर्शक तत्वे जारी होतील.
आपला,
(गौतम प्रसाद बोराह)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक |