आरबीआय/2020-21/17
डीओआर.क्र.बीपी.बीसी/4/21.04.048/2020-21
ऑगस्ट 6, 2020
सर्व वाणिज्य बँका (लघु वित्त बँका, स्थानिक क्षेत्र बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचा समावेश) सर्व प्राथमिक (शहरी) सहकारी बँका / राज्य सहकारी बँका / जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अखिल भारतीय वित्तीय
संस्था सर्व बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या
महोदय/महोदया,
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र - अग्रिम राशींची पुनर् रचना करणे.
कृपया वरील विषयावरील परिपत्रक डीओआर.क्र.बीपी.बीसी.34/21.04.048/2019-20 दि. फेब्रुवारी 11, 2020 चा संदर्भ घ्यावा.
(2) कोविड-19 च्या साथीमुळे बाधित झालेल्या सफलताक्षम अशा एमएसएमई संस्थांना आधार देण्याची सातत्याने असलेली गरज विचारात घेता आणि कोविड-19 साठीच्या द्रवीकरण साचा संबंधित इतर अग्रिम राशींसाठी घोषित केलेल्या ताणतणावांशी ह्या मार्गदर्शक तत्त्वांचा मेळ घालण्यासाठी, वरील परिपत्रकानुसार असलेल्या योजनेचा विस्तार करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार ‘प्रमाणभूत’ (स्टँडर्ड) म्हणून वर्गीकृत केलेल्या, व एमएसएमई ना दिलेल्या विद्यमान कर्जांची, पुढील अटींवर, त्यांचा वर्ग कमी न करता, पुनर् रचना केली जावी.
-
मार्च 1, 2020 रोजी बँकांचे व एनबीएफसींचे, निधी आधारित नसलेल्या सुविधांसह असलेले कर्जदारांबाबतचे एकूण एक्सपोझर, रु.25 कोटींपेक्षा अधिक असू नये.
-
मार्च 1, 2020 रोजी कर्जदाराचे खाते ‘स्टँडर्ड अॅसेट्’ असावे.
-
कर्जदाराच्या खात्याची पुनर् रचना 31 मार्च, 2021 पर्यंत केली गेलेली असावी.
-
पुनर् रचना करण्याच्या/केली असलेल्या तारखेस ती कर्जदार संस्था, जीएसटीसाठी पंजीकृत झालेली असावी. हे मार्च 1, 2020 रोजी मिळालेल्या सूट-सवलत मर्यादेच्या आधारावर ठरविले जाईल.
-
स्टँडर्ड म्हणून वर्गीकृत केलेले, कर्जदारांचे अॅसेट वर्गीकरण तसेच ठेवले जावे तर, मार्च 2, 2020 व पुनर् रचनेची अंमलबजावणी करण्याची तारीख ह्या दरम्यान एनपीए मध्ये गेलेल्या खात्यांना ‘स्टँडर्ड अॅसेट’ म्हणूनबढती दिली जाऊ शकते. अॅसेट वर्गीकरणाचे लाभ हे, केवळ ह्या परिपत्रकानुसार पुनर् रचना केल्यासच उपलब्ध होतील.
-
पूर्वीप्रमाणेच, ह्या मार्गदर्शक तत्त्वांखाली पुनर् रचना केलेल्या खात्यांसाठी, बँका, त्यांनी आधीच ठेवलेल्या तरतुदींच्या 5% अधिक तरतुद ठेवतील.
(3) परिपत्रक दि. फेब्रुवारी 11, 2020 मध्ये विहित केलेल्या इतर सर्व सूचनांमध्ये कोणताही बदल नाही.
आपला विश्वासु,
(सौरव सिन्हा)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक |