आरबीआय/2019-20/256
डीपीएसएस.सीओ.ओडी.क्र.1934/06.08.005/2019-20
जून 22, 2020
अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक / मुख्य कार्यकारी अधिकारी
अधिकृत देयक प्रणाली ऑपरेटर (बँका आणि नॉन-बँका) /
पेमेंट सिस्टम (बँका आणि नॉन-बँका) चे सहभागी
महोदय/महोदया,
प्रदान फसवणुकीमधील वाढत्या घटना - बहुविध वाहिन्यांच्या द्वारे जनतेमध्ये निर्माण करण्याच्या मोहिमा वाढविणे
आपणास माहितच आहे की, डिजिटल व्यवहारांची सुरक्षा व सुरक्षितता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रिझर्व बँक, तिच्या ई-बात कार्यक्रमांमधून जाणीव वाढविण्यासाठी आणि पिन, ओटीपी, पासर्वड्स इत्यादि महत्त्वाची वैय्यक्तिक माहिती शेअर करणे टाळण्यासाठी डिजिटल प्रदान रीतींच्या सुरक्षित वापरावरील कार्यक्रम व मोहिमा राबवित आहे.
(2) असे पुढाकार घेण्यात आले असले तरीही डिजिटल रीतींचा वापर करणारांबाबत फसवणुकीच्या घटना आणि त्यामधील रीतींबाबत सावधानतेचा इशारा देऊनही वाढतच आहेत. जसे, महत्त्वाची प्रदान माहिती देण्यासाठी अमिष दाखविणे, सिम कार्ड्सची अदलाबदल करणे, संदेश व मेल्समध्ये मिळालेल्या लिंक्स ओपन करणे इत्यादि. अशाही काही घटना घडल्या आहेत की, ज्यात उपकरणांमधील महत्त्वाची माहिती अॅक्सेस करणारे खोटे अॅप्स डाऊनलोड करण्यास युजर्सना फसवून सांगितले जाते. ह्यासाठी, सर्व प्रदान प्रणाली चालक व सहभागींनी - बँका व बिगर बँक संस्थांनी डिजिटल सुरक्षिततेसाठीची जाणीव प्रसारित करण्यासाठीचे प्रघटन जोरात सुरु ठेवावेत.
(3) सर्व प्राधिकृत प्रदान प्रणाली चालकांना व सहभागींना येथे सांगण्यात येते की त्यांनी, त्यांच्या युजर्सना डिजिटल प्रदानांचा सुरक्षित व सुरक्षापूर्ण उपयोग करण्याबाबत शिक्षित करण्यासाठी एसएमएस, वर्तमानपत्रे व दृश्य माध्यमांमधील जाहिरातींद्वारा बहुभाषीय मोहिमा सुरु कराव्यात.
(4) कृपया पोच द्यावी.
आपला विश्वासु,
(पी. वासुदेवन)
मुख्य महाव्यवस्थापक |