आरबीआय/2019-20/250
एफआयडीडी.सीओ.एफएसडी.बीसी.क्र.25/05.02.001/2019-20
जून 4, 2020
अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील अनुसूचित वाणिज्य बँका
महोदय/महोदया,
कोविड-19 मुळे, पशुपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन ह्यासह, शेतीसाठीच्या लघु मुदत कर्जांच्या विस्तारित कालावधीसाठी व्याज अर्थसहाय्य (आय एस) व जलद परतफेड प्रोत्साहन (पीआरआय)
कृपया, मे 31, 2020 किंवा परतफेडीची तारीख ह्यापैकी जे आधी असेल त्या तारखेपर्यंत परतफेडीच्या विस्तारित/वाढीव कालावधीसाठी, शेतक-यांना, 2% आयएस व 3% पीआरआय उपलब्ध करणे सुरु ठेवण्याबाबतचा सरकारचा निर्णय बँकांना कळविणारे आमचे परिपत्रक एफआयडीडी.सीओ.एफएसडी.बीसी.क्र.24/05.02.001/2019-20 दि. एप्रिल 21, 2020 चा संदर्भ घ्यावा.
(2) लॉकडाऊन काल वाढविल्याने व कोविड-19 मुळे खंड पडणे सुरु असल्याने, आरबीआयने परिपत्रक दि. मे 23, 2020 अन्वये, सर्व कर्जदायी संस्थांना, हा मोराटोरियम कालावधी आणखी तीन महिन्यांनी म्हणजे ऑगस्ट 31, 2020 पर्यंत वाढविण्याची परवानगी दिली होती. ह्या वाढीव मोराटोरियम कालावधीत, शेतक-यांना उच्चतर व्याज द्यावे लागु नये ह्याची खात्री करुन घेण्यासाठी, ऑगस्ट 31, 2020 किंवा परतफेडीची तारीख ह्यापैकी जी आधी असेल तोपर्यंत, शेतक-यांना 2% आयएस व 3% पीआरआय उपलब्ध करत राहण्याचे सरकारने ठरविले आहे. हा लाभ, शेती व पशुपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन (एएचडीएफ) साठीच्या सर्व लघु मुदत कर्जांसाठी, प्रति शेतकरी रु.3 लाख (एएचडीएफ शेतक-यांसाठी रु.2 लाख) पर्यंत लागु असेल.
(3) इतर सर्व अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.
आपली विश्वासु,
(सोनाली सेन गुप्ता)
मुख्य महाव्यवस्थापक |