Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (137.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 23/05/2020
माल पाठवण्यापूर्वीचे व माल पाठविल्यानंतरचे निर्यात कर्ज - अग्रिम राशींच्या कालावधीचा विस्तार/मुदतवाढ

आरबीआय/2019-20/246
डीओआर.डीआयआर.बीसी.क्र.73/04.02.002/2019-20

मे 23, 2020

सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी वगळता)
सर्व प्राथमिक नागरी सहकारी बँका1
सर्व लघु वित्त बँका

महोदय/महोदया,

माल पाठवण्यापूर्वीचे व माल पाठविल्यानंतरचे निर्यात कर्ज - अग्रिम राशींच्या कालावधीचा विस्तार/मुदतवाढ

कृपया डीबीआर.क्र.डीआयआर.बीसी.14/04.02.002/2015-16 दि. जुलै 1, 2015 रोजी देण्यात आलेल्या, व ‘रुपये/विदेशी मुद्रा निर्यात कर्ज व निर्यातदारांसाठीची ग्राहक सेवा’ वरील महापरिपत्रकाचा व ह्याच विषयावरील इतर संबंधित परिपत्रकांचा संदर्भ घ्यावा.

2. कोविड-19 च्या देशव्यापी साथीचा विचार करता, निर्यातदारांना, ऑर्डरीमधील विलंब/पुढे ढकलल्या जाणे, बिले मिळण्यामधील विलंब इत्यादींसारख्या वास्तविक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ह्या बाबत, जुलै 31, 2020 पर्यंत करण्यात आलेल्या निर्यातींबाबतची वसुली व प्रत्यावर्तन ह्यासाठीचा काल, निर्यातीच्या तारखेपासून नऊ महिन्यांपासून 15 महिन्यांपर्यंत वाढविण्यास आरबीआयने आधीच परवानगी दिली आहे. ह्या सवलतीला अनुसरुन, जुलै 31, 2020 पर्यंत केलेल्या वाटपासाठी बँकांनी मंजुर केलेला, माल पाठविण्यापूर्वीच्या व माल पाठविल्या नंतरच्या निर्यात कर्जांचा कमाल परवानगीप्राप्त कालावधी एक वर्षापासून, 15 महिन्यांपर्यंत वाढविण्याचे ठरविण्यात आले आहे.

आपला विश्वासु,

(डॉ एस. के. कार)
मुख्य महाव्यवस्थापक


1 एडी वर्ग 1 परवाना धारण करणा-या अनुसूचित बँक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä