आरबीआय/2019-20/219
डीओआर.क्र.बीपी.बीसी.62/21.04.048/2019-20
एप्रिल 17, 2020
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (प्रादेशिक ग्रामीण बँका सोडून)
अखिल भारतीय वित्तीय संस्था (नाबार्ड, एनएचबी, एक्झिम बँक, आणि एसआयडीबीआय),
सर्व सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट, ठेवी न स्वीकारणा-या, अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी-एनडी-एसआय) आणि ठेवी स्वीकारणा-या अबँकीय वित्तीय कंपन्या
महोदय/महोदया,
कोविड-19 विनियामक पॅकेज तणावयुक्त अॅसेट्सच्या द्रवीकरणावरील प्रुडेंशियल साचाखाली, द्रवीकरण कालरेषांचे पुनरावलोकन.
कृपया, बँकिंग पर्यवेक्षणावर, बेसेल समितीने दिलेल्या जागतिक कृती कारवाईशी समन्वयित अशा, भारतामधील वित्तीय संस्थांवर व व्यवसायांवर कोविड-19 चा रेंगाळणारा प्रभाव कमी करण्यासाठी काही अतिरिक्त उपाय घोषित करणा-या, एप्रिल 17, 2020 रोजी गव्हर्नरांनी दिलेल्या निवेदनाचा संदर्भ घ्यावा. ह्या बाबत तणावयुक्त अॅसेट्सच्या द्रवीकरणावरील प्रुडेंशियल साचा, दि. जून 7, 2019 खालील द्रवीकरणाच्या कालरेषा वाढविण्यासंबंधीच्या सविस्तर सूचना खाली दिल्यानुसार आहेत.
2. ह्या प्रुडेंशियल साचाच्या परिच्छेद 11 अनुसार, 30 दिवसांचा पुनरावलोकन कालावधी समाप्त झाल्यावर, धनकोंनी कसुरी करणा-या संस्थांच्या बाबतीत 180 दिवसांच्या एका द्रवीकरण योजनेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
3. पुनरावलोकनानंतर ठरविण्यात आले आहे की, मार्च 1, 2020 रोजी पुनरावलोकन कालावधीखाली असलेली खाती, ह्या पुनरावलोकन कालासाठी, मार्च 1, 2020 ते मे 31, 2020 पर्यंतचा कालावधी, 30 दिवसांचा कालावधी वाढण्यासाठी वगळला जाईल. अशा सर्व खात्यांच्या बाबतीत, अवशिष्ट पुनरावलोकन कालावधी जून 1, 2020 पासून पुनश्च सुरु होईल व तो संपल्यानंतर धनकोंना नेहमीचे 180 दिवसांचे द्रवीकरण करता येईल.
4. पुनरावलोकन कालावधी समाप्त झाला होता, परंतु मार्च 1, 2020 रोजी 180 दिवसांचा द्रवीकरण कालावधी समाप्त झाला नव्हता. अशा खात्यांच्या बाबतीत, तो 180 दिवसांचा मूळ कालावधी संपणार होता त्या तारखेपासून, द्रवीकरणाची कालरेषा 90 दिवसांनी पुढे विस्तारित केली जाईल.
5. या नुसार प्रुडेंशियल साच्याच्या परिच्छेद 17 मध्ये विहित केलेल्या अतिरिक्त तरतुदी करण्याची आवश्यक्ता ही, वर निर्देशित केल्याप्रमाणे विस्तारित ठराव कालावधी संपल्यानंतर तातडीने सुरु केली जाईल.
6. इतर सर्व खात्यांच्या बाबतीत प्रुडेंशियल साच्याच्या तरतुदीत कोणताही बदल न करता जारी होत राहतील.
7. कर्जदायी संस्थांनी सप्टेंबर 30, 2020 रोजी संपणा-या सहामाही साठी तसेच वित्तीय वर्षे एफवाय 2020 आणि एफवाय 2021 साठी त्यांची वित्तीय विवरणपत्रे तयार करतांना ‘नोट्स टु अकाउंट्स’ मध्ये ज्यांक्या बाबतीत ठराव कालावधी विस्तारित केला गेला. अशा खात्यांच्या बाबतीत संबंधित प्रकटीकरणे द्यावीत.
आपला विश्वासु,
(सौरव सिन्हा)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक |