आरबीआय/2019-20/206
ए.पी.(डीआयआर मालिका) परिपत्रक क्र. 27
1 एप्रिल, 2020
प्रति,
सर्व अधिकृत विक्रेता श्रेणी – I बँका
महोदय / महोदया,
माल व सेवांची निर्यात –
निर्यात उत्पन्नाची वसुली व प्रत्यवर्तन - शिथीलीकरण
कोविड-19 च्या देशव्यापी प्रसार विचारात घेऊन, निर्यात व्यापार संस्थांकडून, निर्यात उत्पन्न वसुलीचा कालावधी वाढविण्याबाबत केलेली सादरीकरणे, केंद्र सरकार व रिझर्व बँकेकडे येत आहेत. ह्यासाठी, भारत सरकारशी सल्लामसलत करुन ठरविण्यात आले आहे की, जुलै 31, 2020 रोजी किंवा पर्यंत केलेल्या निर्यातींसाठी, निर्यात केलेला माल किंवा सॉफ्टवेअर किंवा सेवा ह्यांचे संपूर्ण निर्यात मूल्य वसुल करण्यासाठीचा व भारतात अत्यावर्तन करण्याचा कालावधी, निर्यात केल्याच्या तारखेपासून नऊ महिन्यांपासून पंधरा महिने पर्यंत असा वाढविण्यात यावा.
(2) भारताबाहेरील वेअर हाऊसेसना निर्यात केलेल्या मालाचे संपूर्ण निर्यात मूल्य वसुल करण्यासाठी व त्याचे भारतात प्रत्यावर्तन करण्यासाठीच्या कालावधीमध्ये कोणताही बदल नाही.
(3) एडी वर्ग-1 बँकांनी ह्या परिपत्रकातील मजकुर त्यांच्या संबंधित शाखा/संस्थांच्या नजरेस आणावा.
(4) ह्या परिपत्रकातील निर्देश, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 च्या (1999 चा 42) कलम 10(4) व 11(1) खाली आणि अन्य कोणत्याही कायद्याखाली असलेल्या परवानग्या/मंजुरींच्या विपरीत नाहीत.
आपला विश्वासु,
(अजय कुमार मिस्रा)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक |